छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ११ ते १५ मार्च २०२६ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर
जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान कोरडे व आकाश स्वच्छ राहील. तसेच कमाल तापमान ३६.० ते ३८.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान
१९.० ते २०.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता १९ ते २० टक्के राहील
तर वाऱ्याचा वेग ०४ ते ०८ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार
(ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक १५ ते २१ मार्च २०२६ दरम्यान हवामान
कोरडे व आकाश स्वच्छ राहून कमाल तापमान व किमान तापमान सरासरीऐवढे राहण्याची
शक्यता आहे.
कृषी हवामान सल्ला
पिकाचे नाव हरभरा
परिपक्वता ते काढणी अवस्था
वेळेवर पेरणी केलेल्या
व काढणीस तयार असलेल्या हरभरा पिकाची काढणी करुन मळणी करुन घ्यावी व मळणी केलेल्या
धान्याची योग्य वाळवुन सुरक्षित ठीकाणी साठवणूक करावी.
उन्हाळी मका
वाढीची अवस्था
उन्हाळी
मका पिकातील आंतरमशागत व तण व्यवस्थापन करून घ्यावे. तसेच पिकास गरजेनुसार पाणी
व्यवस्थापन करावे.
बटाटा
काढणी अवस्था
काढणीस तयार असलेल्या
बटाटा पिकाची काढणी करून घ्यावी व काढणीनंतर बटाटे शेतात पडू न देता गोळा करून
आकारमानानुसार प्रतवारी करून ते जाळीदार पोत्यात भरून बाजारात विक्रीसाठी किंवा
शीतगृहात साठवणीसाठी पाठवावेत.
मोसंबी
फळवाढीची
अवस्था
सध्यस्थितीत
तापमानातील संभाव्य वाढ लक्षात घेता मोसंबी बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची
काळजी घ्यावी व बागेस गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे तसेच बागेत ओलावा टिकून राहण्यासाठी पिकांचे अवशेष, पालापाचोळा या
आच्छादनाचा वापर करावा.
डाळिंब
फळवाढीची
अवस्था
सध्यस्थितीत
तापमानातील संभाव्य वाढ लक्षात घेता डाळिंब बागेस पाण्याचा ताण बसणार नाही याची
काळजी घ्यावी व बागेस गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे तसेच बागेत ओलावा टिकून राहण्यासाठी पिकांचे अवशेष, पालापाचोळा या
आच्छादनाचा वापर करावा.
भाजीपाला
फुलधारणा ते
फळधारणा अवस्था
तापमानातील होणारी वाढ
लक्षात घेता भाजीपाला पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. तसेच टोमॅटो
पीकामधील फळ पोखरणा-या अळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी १५ ते २० कामगंध सापळे
लावावेत. तसेच भाजीपाला पिकात रस शोषण करणाऱ्या किडीच्या व्यवस्थापनासाठी पिवळे व निळे
चिकट सापळे (छोट्या आकाराची) एकरी २५ ते ३० या प्रमाणात लावावेत.
तुती रेशीम
वाढीची अवस्था
तुती बागेस गरजेनुसार
पाणी व्यवस्थापन करावे.
पशुसंवर्धन
सध्यस्थितीत
तापमानातील संभाव्य वाढ लक्षात घेता शेतक-यांनी पशुधनाचे उन्हापासून संरक्षण
करण्यासाठी दिवसा जनावरे झाडांच्या सावलीत बांधावीत. तसेच कोंबडयांच्या शेडमधील
तापमान नियंत्रित करुन पाण्याच्या भांड्यांच्या संख्या वाढवावी व पीण्यासाठी
स्वच्छ व थंड पाणी दयावे. तसेच उष्णतेपासून त्रास होऊ नये म्हणून कोंबड्याना खाद्य
सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत द्यावे.
इतर
सद्यस्थितीत
तापमानात वाढ होत असुन शेतकरी बांधवांनी पिकांना पाणी देण्याची व फवारणीची तसेच
शेतातील इतर कामे सकाळ व सायंकाळच्या वेळेस करावीत.
सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments
Post a Comment