छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक २८ मार्च ते ०१ एप्रिल २०२६ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला

 


प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहून दि. ३१ मार्च व ०१ एप्रिल २०२६ रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३७.० ते ३८.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २०.० ते २३.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता २३ ते ५९ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०७  ते १५ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.  

सतर्कता:  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता असून वाऱ्याचा वेग जास्त (५०-६० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे.

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ०१ ते ०७ एप्रिल २०२६ दरम्यान हवामान कोरडे व आकाश स्वच्छ ते अंशतःढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी तसेच कमाल तापमान किमान तापमान सरासरीऐवढे राहण्याची शक्यता आहे.

 कृषि हवामान सल्ला

पिकांचेनाव

ऊस

फुटवे अवस्था ते कांडे धरणे

मागील आठवड्यातील ढगाळ वातावरण व तापमानातील चढउतारामुळे ऊस पिकात पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरीपायरीफॉस २० टक्के ३० मिली किंवा फिप्रोनील ५ टक्के ३० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत वातावरणात फवारणी करावी.

गहू   

काढणी अवस्‍था

काढणीस तयार असलेल्या गहू पिकाची काढणी/कापणी करुन घ्यावी. तसेच काढणी झालेल्या पिकाची मळणी करून धांन्यास ऊन देऊन सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

उन्हाळी बाजरी

फुटवे अवस्था

बाजरी पिकामध्ये तण व्यवस्थापन करावे व पिकास पेरणी करून एक महिन्याचा कालावधी झाला असल्यास नत्राचा दुसरा हप्ता द्यावा. तसेच तापमानातील होणारी वाढ लक्षात घेता पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

कांदा

काढणी अवस्‍था

काढणीस तयार असलेल्या कांदा पिकाची काढणी करून घ्यावी. काढणीनंतर कांदा शेतातच पातीसह सुकू द्यावा. कांद्याच्या ओळी अशा तऱ्हेने लावाव्यात, की जेणेकरून पहिल्या ओळीतील कांदा दुसऱ्या ओळीतील पातीने झाकला जाईल. अशा प्रकारे कांदा शेतात चार दिवस सुकू द्यावा. त्यानंतर चार सें.मी. लांब मान ठेवून पात कापावी. चिंगळी, जोड कांदा आलेले व खराब कांदे वेगळे काढावेत. राहिलेला कांदा सावलीत ढीग करून १५ दिवस सुकवावा. या काळात कांद्याच्या माना वाळून पिरगळतात, वरचा पापुद्रा वाळून कांद्याला घट्ट चिकटतो. अशा प्रकारे वाळलेला कांदा अधिक काळ चांगला टिकतो.

आंबा

फळ वाढीची अवस्‍था

आंबा बागेमध्ये फळ गळ दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी तसेच फळांची प्रत सुधारण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट  १०० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच तापमानातील होणारी वाढ लक्षात घेता बागेस गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

भाजीपाला

फुलधारणा ते फळधारणा अवस्था

भाजीपाला पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. तसेच तापमानातील चढउतारामुळे टोमॅटो पिकावर नाग अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी फिप्रोनील १५ मिली किंवा सायंट्रानिलीप्रोल १०.२६ टक्के ओ.डी. ५ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पशुसंवर्धन

वातावरणातील अचानक बदलांमुळे कोंबडयांच्या पिल्लांवर अतिरिक्त ताण निर्माण होवून आजारी पडण्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांची विशेष काळजी घ्यावी. पिण्यासाठी स्वच्छ व मुबलक पाणी द्यावे व गरज भासल्यास पशुवैद्यकाच्या सल्ल्याने लसीकरण करुन घ्यावे.

इतर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दिनांक ३१ मार्च २०२६ रोजी वादळीवारासह तुरळक ठिकाणी गारपीट व हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून वाऱ्याचा वेग जास्त राहण्याची शक्यता आहे.  तरी शेतकरी बांधवानी काढणीस तयार असलेल्या पिकाची काढणी लवकरात लवकर करून घ्यावी. तसेच काढणी केलेल्या पिकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला