छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ३० मे ते ०३ जून २०२६ साठी हवामान अंदाज व कृषी हवामान सल्ला

 


प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहून दि. ३१ मे ते ०३ जून २०२६ रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३८.० ते ४१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २५.० ते २६.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता २२ ते ६१ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १७ ते २२ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.  

सतर्कता: छत्रपती संभाजीनगर जिल्हयात ०१ ते ०३ जून २०२६ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (४० ते ५० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे. 

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ०३ ते ून २०२६ दरम्यान आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान तसेच कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.

 कृषि हवामान सल्ला

पिकांचेनाव

ऊस

फुटवे अवस्था ते कांडे धरणे

सध्यस्थितीमध्ये तापमानातील वाढीमुळे ऊस पिकामध्ये खोडकिडा दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरॅन्ट्रनिलीप्रोल १८.५ टक्के एस.सी. ३ - ४ मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेत फवारणी करावी. तसेच ऊस पिकास योग्य वेळेच्या अंतराने गरजेनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

कापूस

जमिनीची निवड

कापूस पिकाच्या लागवडीकरिता मध्यम ते भारी, कसदार व पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिन निवडावी. हलक्या तसेच पाण्याचा निचरा न होणाऱ्या चिबड जमिनीची निवड करू नये. कापूस पिकाच्या लागवडीसाठी जमिनीची खोली ६० ते १०० सेमी असावी व सामू ०६ ते ८.५ असावा.कोरडवाहू कापूस लागवडीसाठी पूर्व मशागतीचे कामे पूर्ण करून शेवटची वखरणी करण्यापूर्वी १० ते १२ गाड्या चांगले कुजलेले शेणखत/ कंपोस्ट खत शेतामध्ये समप्रमाणात पसरवून घ्यावे.

मका

जमिनीची निवड

मका पिकाच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी, खोल उत्तम पाण्याचा निचरा करणारी जमीन हमखास असावी. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ इतका असावा. मका पिकाच्या लागवडीसाठी पूर्व मशागतीचे कामे पूर्ण करून शेवटची वखरणी करण्यापूर्वी १२ ते १५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत/ कंपोस्ट खत शेतामध्ये समप्रमाणात पसरवून घ्यावे.

तूर

जमिनीची निवड

तूर पिकास मध्यम ते भारी पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या जमिनीची निवड करावी. चोपण, पाणथळ जमिनीत तूर चांगली येत नाही. कसदार, भुसभुसीत, पोयट्याच्या जमिनीत सुद्धा तूर चांगली येते. साधारणत: ६.५ ते ७.५ सामू असलेली जमीन या पिकास योग्य असते. तूर पिकाच्या लागवडीसाठी पूर्व मशागतीचे कामे पूर्ण करून शेवटची वखरणी करण्यापूर्वी १५ ते २० गाड्या चांगले कुजलेले शेणखत/ कंपोस्ट खत शेतामध्ये समप्रमाणात पसरवून घ्यावे.

मूग/उडीद

जमिनीची निवड

मूग/उडीद पिकाच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी, सुपीक व उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. एकदम हलक्या प्रतीच्या मुरमाड जमिनीत पीक घेऊ नये.पाणी साठून राहणाऱ्या जमिनीत हे पीक घेऊ नये. मूग /उडीद पिकाच्या लागवडीसाठी पूर्व मशागतीचे कामे पूर्ण करून शेवटची वखरणी करण्यापूर्वी १५ ते २० गाड्या चांगले कुजलेले शेणखत/ कंपोस्ट खत शेतामध्ये समप्रमाणात पसरवून घ्यावे.

सिताफळ

जमिनीची निवड

नवीन सीताफळ रोपांची लागवड कमी पावसाच्या, मुरमाड, अंत्यत हलक्या, डोंगर उताराच्या जमिनी, मध्यम खोल जमिनीत करता येते.

आंबा

फळ वाढीची अवस्‍था

काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची सकाळ व सायंकाळच्या वेळेस काढणी करुन घ्यावी. आंबा फळांची काढणी देठासहित करावी जेणेककरुन फळांचे काढणी पश्चात आयुष्य वाढून पक्वता एकावेळेस होण्यास मदत होते.

भाजीपाला

पूर्वमशागत व जमिनीची निवड

भाजीपाला पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. तसेच खरीप हंगामात भाजीपाला पिकाच्या लागवडीसाठी पूर्वमशागतीचे कामे करून घ्यावीत. खरीप हंगामात घेतल्या जाणाऱ्या भाजीपाला पिकाच्या प्रकारानुसार जमिनीची निवड करावी.

पशुसंवर्धन

शेतकरी बांधवांनी जनावरांना जंतांच्या विविध आजारांच्या नियंत्रणासाठी पशुवैद्याच्या सल्ल्याने लसीकरण करून घ्यावे. तसेच जनावरांना नेहमी स्वच्छ पाणी पिण्यास द्यावे.

इतर

शेतकरी बांधवानी निविष्ठा (बियाणे, खते, कीड व कीटकनाशके) खरेदी करत असताना पिकाचे नाव, जात, गट क्रमांक, बीज परिक्षणाची तारिक, उगवण शक्ती, शुद्धतेचे प्रमाण, निवळ वजन, विक्रेत्याचे नाव व पत्ता तसेच पक्के बिल/ पावती घ्यावी तसेच बिलावर खरेदी केलेल्या तारखेचा उल्लेख असावा.

सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०६ ते १० ऑगष्ट २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला