छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक २७ ते ३१ मे २०२६ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहून दि. २७ ते २९ मे २०२६ रोजी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३९.० ते ४१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २६.० ते २७.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ५३ ते ७३ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १७ ते २२ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
सतर्कता: छत्रपती संभाजीनगर
जिल्हयात २६ ते २८ मे २०२६ रोजी तुरळक ठिकाणी
वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह हलक्या ते
मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (४० ते ५० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित
अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक ३१ मे ते ०६ जून २०२६
दरम्यान हवामान कोरडे व आकाश स्वच्छ ते अंशतःढगाळ राहून पर्जन्यमान, कमाल
तापमान व किमान तापमान सरासरीऐवढे राहण्याची शक्यता आहे.
पिकाचे नाव
सोयाबीन
जमिनीची निवड
सोयाबीनची
लागवड सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये करता येते परंतु अतिशय हलक्या जमिनीचा पिकाच्या
उत्पन्नावर परिणाम होतो. सोयाबीन पिकासाठी आम्लयुक्त, क्षारयुक्त,
वालुकामय चिकणमाती जमिनीमध्ये सोयाबीन पिकाची पेरणी करू नये. सोयाबीन पिकासाठी
जास्त सेंद्रीय कर्ब असलेली मध्यम ते भारी उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. जमिनीचा
सामू ६ ते ६.५ च्या आसपास असल्यास अशा जमिनीत सोयाबीनचे पिक उत्तम येते.
खरीप ज्वारी
जमिनीची निवड
खरीप
ज्वारीच्या लागवडीसाठी मध्यम ते भारी उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. जमिनीचा
सामू ५ .५ ते ८.४ असावा.
बाजरी
जमिनीची निवड
बाजरी
पिकासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम जमीन निवडावी. जमिनीचा सामु
हा ६.२ ते ७.७ असावा. हलक्या जमिनीत बाजरी हे पीक घ्यावयाचे असल्यास सरी - वरंबा
पद्धत फायदेशीर ठरते.
आद्रक
जमिनीची निवड
आद्रक
पिकाच्या लागवडीसाठी मध्यम, उत्तम निचऱ्याची
भुसभुशीत जमीन निवडावी. या पिकासाठी किंचीत आम्लयुक्त सामू असलेली जमिन (सामू ६.५
ते ७) उत्तम राहते.
हळद
जमिनीची निवड
हळद पिकाच्या लागवडीसाठी मध्यम, उत्तम निचऱ्याची
भुसभुशीत जमीन निवडावी. या
पीकासाठी जमीनीचा सामू ६.५ ते ७.५ असावा.
मोसंबी
जमिनीची निवड
मोसंबी
या पिकासाठी मध्यम काळी, उत्तम
निचऱ्याची, साधारणतः
एक मीटर खोल असलेली जमीन चांगली असते. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ च्या दरम्यान
असावा. चोपण व चुनखडीचा थर असलेल्या जमिनीत मोसंबीची लागवड करू नये. उपलब्ध
चुन्याचे प्रमाण ५ टक्क्यापेक्षा जास्त असू नये. भारी काळ्या तसेच पाण्याचा निचरा
योग्यप्रकारे न होणाऱ्या जमिनीत मोसंबीची लागवड करणे टाळावे. तसेच अंबिया बहार
धरलेल्या बागेत बोर्डो पेस्ट लावला नसल्यास लावून घ्यावा तसेच मोसंबी बागेत
फळांमुळे खाली झुकलेल्या फाद्यांना बांबूच्या साहाय्याने आधार द्यावा.
डाळिंब
जमिनीची निवड
व मृग बहार
डाळिंब
पिकाच्या नवीन लागवडीसाठी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी (३ ते ५ %) उताराची जमीन निवडावी.पिकास हलकी
परंतु सामू ७.५ असलेली जमीन योग्य असते.
मृग
बहार घेण्याचे नियोजन असल्यास
बाग ताणावर असताना मे महिन्याच्या शेवटी इथेफोन ३९ % एस एल ची फवारणी करून पानगळ
करून घ्यावी व नंतर हलकी छाटणी करून घ्यावी.छाटणी करताना पेन्सिल आकाराच्या काड्या
शेंड्याकडून १० ते १५ सेमी पर्यंत छाटाव्यात तसेच वाळलेल्या फांद्या छाटाव्यात व
बागेत पडलेला काडीकचरा वेचून बाग स्वच्छ ठेवावी.
भाजीपाला
जमिनीची निवड
खरीप
हंगामात भाजीपाला पिकाच्या लागवडीसाठी पूर्वमशागतीचे कामे करून घ्यावीत. खरीप
हंगामात घेतल्या जाणाऱ्या भाजीपाला पिकाच्या प्रकारानुसार जमिनीची निवड करावी.
तुती रेशीम
रेशीम
किटक संगोपन गृहातील तापमान व आर्द्रता मर्यादित (२२ ते २८ सें.ग्रे.) ठेवावे
जेणेकरून कोष उत्पादन चांगले येईल. परंतु ३५ सें.ग्रे. च्या वर तापमान गेल्यास
रेशीम किटक पाने खात नाहीत यामुळे उत्पादनात घट होते.
पशुसंवर्धन
जंतांच्या
व विविध आजारांच्या नियंत्रणासाठी पशुवैद्याच्या सल्ल्याने लसीकरण करून घ्यावे. तसेच जनावरांना नेहमी स्वच्छ पाणी पिण्यास द्यावे.
इतर
शेतकरी
बांधवानी जमिनीची मशागत समतल किंवा मुख्य उताराला आडवी करावी त्यामुळे पावसाचे
पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते.

Comments
Post a Comment