छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०४ ते ०८ जुलै २०२६ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई
येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात
हवामान ढगाळ राहून तुरळक ठिकाणी
हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २८.० ते २९.०
अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२.० ते २३.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष
आर्द्रता ६७ ते ९५ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १४ ते २० किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
सतर्कता : छत्रपती
संभाजीनगर जिल्ह्यात दि. ०४ ते ०६ जुलै २०२६ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या
कडाकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त
(३० ते ४० किमी/तास) राहील.
विस्तारित अंदाजानुसार
(ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ०९ ते १५ जुलै २०२६ दरम्यान आकाश ढगाळ राहील.
तसेच पर्जन्यमान, कमाल तापमान व किमान
तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषि
हवामान सल्ला
पिकांचेनाव
ऊस
बेणेप्रक्रिया व लागवड
आडसाली ऊस लागवडीसाठी को-८६०३२, कोएम-०२६५,
व्हीएसआय-८००५ या सुधारित जातीची निवड करावी. तसेच बेणे प्रक्रिया करताना १००
ग्रॅम कार्बेनडेझीम आणि डायमेथोएट ३०० मिली प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून बेणे
१०-१५ मिनिट द्रावणात बुडवावे. रासायनिक प्रक्रिया झाल्यानंतर ऍसिटोबॅक्टर १० किलो
+ स्फुरद विरघळणारे जिवाणू २.५ किलो + १ किलो ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक १००
लिटर पाण्यात द्रावण करून त्यामध्ये १५-२० मिनिटे बेणे बुडवुन ठेवावे व त्यानंतर
लागवड करावी.
कापूस
लागवड व आंतर पीके
कापूस पिकाच्या लागवडीसाठी ३.० ते ४.० किलो प्रती हेक्टर बियाणे वापरावे व
लागवडीतील अंतर ९०X६० किंवा ६०X६० किंवा ६० X ३०
किंवा ४५ X ३० सेमी ठेवावे. लागवडीपूर्वी थायरम किंवा कॅप्टन ३.०
ग्रॅम व नंतर १० मिली प्रति किलो बियाण्यास
अॅझोटोबॅक्टर आणि पीएसबी या
जिवाणू संवर्धकाची बिजप्रक्रीया करूनच
आगवाड करावी. तसेच कापूस
पिकामद्ये कापूस + तूर (४ : १ ६:१ किंवा ६ :२,८:२),कापूस + सोयाबीन (१:१), कापूस + मूग (१: १) रुंद ओळींमध्ये
कापूस + मूग (१:२), कापूस उडीद (१:१)
ही आंतरपीक पध्दती घेतल्यास फायदेशीर ठरते.
मका
पेरणी व बीजप्रक्रिया
मका पिकाच्या लागवडीसाठी १५ किलो प्रती हेक्टर बियाणे वापरावे व लागवडीतील
अंतर ६०X ३० ठेवावे.
पेरणी/लागवडपूर्वी ट्रायकोडर्मा ०५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावावे. तसेच सायन्ट्रीनिलीप्रोल + थायोमिथॉक्झाम १९.८० टक्के ४.० मिली प्रति किलो
बियाण्यास बीजप्रक्रिया करावे. बीजपक्रियेनंतर बियाणे सावलीमध्ये वाळवून जमीनीमध्ये पेरणीयोग्य ओलावा असताना लागवड/पेरणी करावी. पिकाची जोमदार वाढ
होण्यासाठी पेरणीच्या वेळी हेक्टरी ७५ किलो नत्र ७५ किलो स्फुरद व ७५ किलो पालाश
दयावे. मका पिकाची लागवड झाल्याबरोबर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी ऊगवणीपूर्व
तणनाशक (अट्राझिन ५० डब्ल्यू पी) १.५ किलो प्रति हेक्टर ७५० ते १००० लिटर पाण्यात
मिसळून हातपंपाने फवारणी केल्यास तणव्यवस्थापन होते.
तूर
लागवड व आंतर पीके
तूर पिकाच्या पेरणीसाठी १२ ते १५ किलो प्रती हेक्टर बियाणे वापरावे.
पेरणीपूर्वी १.५ - २.० ग्रॅम बावीस्टीन अथवा २.५ ग्रॅम थायरम व नंतर १० मिली प्रति
किलो बियाण्यास राझोबियम आणि पीएसबी या जिवाणू संवर्धकाची बिजप्रक्रीया करून लागवड
करावी. तसेच तुरीचे उत्पादन वाढविण्यासाठी व जमिनीची आरोग्य राखण्यासाठी तुर +
बाजरी (२:४), तुर + सोयाबीन/मुग/उडीद (१:२ किंवा २:४) असे ओळीचे प्रमाण ठेवून आंतरपीक
पध्दतीणे पेरणी करावी.
मूग/उडीद
आंतर पीके
आंतरपीक म्हणून मुग/उडीद
या पिकांना विशेष महत्व प्राप्त आहे,ते या पिकांच्या कालावधीमुळे, हे दोन्हीही पिके तुर,ज्वारी,कपाशीत
आंतरपीक म्हणून घेता येतात.
सिताफळ
-
नविन सिताफळ बाग लागवडीसाठी बालानगर,टिपी-७,धारुर-६,अर्कासहान इत्यादी
जातींचा वापर करावा. लागवडीसाठी शासकीय नोंदणीकृत रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी
करावी.
आंबा
-
आंबा फळबागेतील खोड किडीच्या व्यवस्थापनासाठी प्रौढ भुंगे हाताने गोळा करून
नष्ट करावेत व हेक्टरी २-३ प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. नविन आंबा बाग लागवडीसाठी पायरी, तोतापुरी, निलम,सिंधु, साईसुगंध, वनराज,लंगडा, रत्ना, परभणी भूषण,निरंजन मालीका, दोहरी इत्यादी जातीचा वापर करावा
लागवडीसाठी शासकीय नोदणीकृ रोपवाटीकेतूनच रोपांची खरेदी करावी
भाजीपाला
पुर्नलागवड
टोमॅटोची रोपे लावताना टोमॅटो पिकाच्या बाजूने ने व टोमॅटोच्या १६ ओळींनंतर
एक ओळ झेंडूची लावावी त्यामुळे फळ पोखरणारी अळी झेंडूकडे आकर्षित होऊन पिकाचे रक्षण
होते.
पशुसंवर्धन
उन्हाळयातील उष्ण तापमान संपूण अचानक झालेला वातावरणातील बदल, ओलसर व दमट वातावरणामुळे जनावरांमध्ये
रोगाचा प्रादूर्भाव वाढण्याची दाट शक्यता असते. त्यासाठी जनावराचे आरोग्य उत्तम व
निरोगी ठेवण्यासाठी खालील उपाययोजना कराव्यात जनावरे बांधणाऱ्या जागी पावसाचे पाणी
जमा होणार नाही व गोठा ओलसर होऊ नये याची काळजी घ्यावी. गोठ्यातील आर्द्रता व
दमटपणा कमी होण्यासाठी, गोठ्यामध्ये
मुबलक प्रमाणात खेळती हवा व सूर्यप्रकाश उपलब्ध करावा. पावसाळ्यात दुभत्या
जनावराची कास पोटॅशियम पॅरामॅग्नेटच्या पाण्यातील द्रावणाने स्वच्छ धूवून काढावे.
पावसाळयात मूख्यतः जनावरे झाडाखाली किंवा उघड्यावर बांधू नयेत. पावसाळयात
जनावरांना कोवळा,हिरवा चारा जास्त प्रमाणात देणे टाळावे.
इतर
आगामी काळातील पिकांवरील किड व किटकांच्या
प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी लागणारे निंबोळी अर्क तयार करण्यासाठी शेतकरी
बांधवानी कडुलिंबाच्या निंबोळयांची साल व गर काढुन त्याच्या बिया वाळवुन, सुरक्षित
ठिकाणी साठवून ठेवाव्यात.
सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments
Post a Comment