छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक २३ ते २७ सप्टेंबर २०२६ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला


 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश अंशतः ढगाळ ते ढगाळ राहून तुरळक ठिकाणी अतिशय हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३३.० ते ३५.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२.० ते २४.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४० ते ७८  टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ९ ते २१ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.  

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक २७ सप्टेबर ते ०३ ऑक्टोबर २०२६ दरम्यान हवामान ढगाळ राहून पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी तसेच कमाल तापमान व किमान तापमान सरासरी पेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे.

कृषी हवामान सल्ला

पिकाचे नाव

सोयाबीन

शेंगा वाढीची अवस्था

सोयाबीन पिकावर शेंगा पोखरणारी अळीचा प्रादूर्भाव ‍दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी फ्लूबेन्डामाईड ३९.३५ एस सी ०३ मिली किंवा क्लोरँट्रनिलीप्रोल १८.५ एससी ०३ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच चक्री भुंग्याचा प्रादुर्भाव दिसुन येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी प्रोफेनोफॉस ५० टक्के ईसी २० मिली किंवा क्लोरँट्रनिलीप्रोल १८.५ एससी ०३ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.  

खरीप ज्वारी

दाणे भरणे अवस्था

पक्षांपासुन ज्वारी पिकाच्या कणसाचे संरक्षण करण्याकरिता ( उदा. रिळ लावणे, आवाज करणारी पंख्यासारखी स्वयंचलित यंत्रे बसविणे, बुजगावणे उभे करणे इत्यादी) उपाययोजना कराव्यात.

बाजरी

दाणे भरणे अवस्था

पक्षांपासुन बाजरी पिकाच्या कणसाचे संरक्षण करण्याकरिता ( उदा. रिळ लावणे, आवाज करणारी पंख्यासारखी स्वयंचलित यंत्रे बसविणे, बुजगावणे उभे करणे इत्यादी) उपाययोजना कराव्यात.

खरिप भुईमुग

काढणी अवस्था

काढणीस तयार असलेल्या भुईमुग पीकाची काढणी लवकरात लवकर करुन घ्यावी. काढणीनंतर शेंगाना ऊन द्यावे व सुरक्षित ठिकाणी साठवणुक करावी.

आद्रक

फुटवे ते कंद धरणे अवस्‍था

आद्रक पीकाच्या कंदवाढीकरीता २.५ किलो १९:१९:१९ लगेच व ३ दिवसांनी २.५ किलो १३:४०:१३ याप्रमाणे ७ दिवसानंतर परत वरीलप्रमाणे विद्राव्य खतांची प्रतिएकर याप्रमाणात आळवणी करावी.तसेच पिकस गरजेनुसार पानी व्यवस्थापन करावे.  

हळद

फुटवे ते कंद धरणे अवस्‍था

हळद पीकाच्या कंदवाढीकरीता २.५ किलो १९:१९:१९ लगेच व ३ दिवसांनी २.५ किलो १३:४०:१३ याप्रमाणे ७ दिवसानंतर परत वरीलप्रमाणे विद्राव्य खतांची प्रतिएकर याप्रमाणात आळवणी करावी. तसेच पिकस गरजेनुसार पानी व्यवस्थापन करावे.   

मोसंबी

फळ वाढीची ते काढणी अवस्‍था

काढणीस तयार असलेल्या मोसंबी फळांची काढणी करून योग्य प्रतवारी नंतर विक्रीसाठी बाजारपेठेत पाठवावीत.

डाळिंब

काढणी अवस्‍था

काढणीस तयार असलेल्या डाळिंब फळांची काढणी करून योग्य प्रतवारी नंतर विक्रीसाठी बाजारपेठेत पाठवावीत.

भाजीपाला

फुल ते फळ धारणा अवस्था

मागील काही दिवसांमधील वाढलेली आर्द्रता यामुळे टोमॅटो पिकावर लवकर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सीस्ट्रॉबीन २३ टक्के एससी १० मीली किंवा कॅप्टन (५० टक्के डब्लूपी) २५ ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

तुती रेशीम

रेशीम कीटकांना खाद्य देत असताना फांदया, तुती पाने पातळ एका थरात दयावे.जास्तीचे खादय देऊ नये फांदया खादय दिवसातून तीन वेळा दयावे.रेशीम कीटक कात अवस्थेत बसताना चुना पावडर रॅकवर धुरळणी करावी. यामळे बेडवरील आर्द्रता कमी होण्यास मदत मिळते.कीटक कातेवरून बाहेर पडते वेळी अर्धा तास अगोदर विजेता निर्जंतुक पावडर बरोबर डायथेन एम-४५ बुरशीनाशक २० ग्रॅम प्रति किल्लो मिसळून रॅकवर धुरळणी करावी. पाऊस चालू असेल तर फांदया खाऊ घालण्या अगोदर अर्धा ते एक तास पानावरील पाणी निचरून जाऊ दयावे व नंतर अळयांना खादय दयावे.

पशुसंवर्धन

जनावरांमध्ये बाह्य परजीवी कीटकांचा (ऊवा, पिसवा, गोचीड व चावणाऱ्या कीटकवर्गीय माशा) प्रादुर्भाव दिसून येत आहे. म्हणून पशुपालकांनी ५% निंबोळी अर्क किंवा वनस्पतीजन्य कीटकनाशक (कडुनिंब तेल १५ मिली + कारंज तेल १५ मिली  + २ ग्रॅम मऊ साबण + १ लिटर पाणी) हे द्रावण आठवड्याच्या अंतराने पशुधनावर, गोठ्यामध्ये सभोवताली साचलेल्या पाण्याचे डबके, खच खळगे/नाली व शेणाच्या ढिगाऱ्यावर फवारावे

इतर

सध्यस्थितीत पिके वाढीच्या ते परिपक्वतेच्या अवस्थेत असल्यामुळे तसेच पावसाने खंड दिल्यामुळे खरीप पिकांना संरक्षित पाण्याची गरज आहे. त्यामुळे शेतकरी बांधवानी उपलब्धतेनुसार संरक्षित (तुषार किंवा ठिबक इत्यादि) सिंचन पद्धतीने पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. तसेच पिकांना ताण बसत असल्यास पोटॅशियम नायट्रेट (१३:००:४५:)  ची १% (१०० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून ) फवारणी करावी.

सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे. 


Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ जुन २०२६ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक २६ ते ३० जून २०२६ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०४ ते ०८ ऑक्टोंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला