छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०४ ते ०८ नोव्हेंबर२०२६ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

 


प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश अंशतःढगाळ ते ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३२.० ते ३४.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १६.० ते २१.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ३७ ते ६७ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ५ ते ९ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.  

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक ०८ ते १४ नोव्हेंबर २०२६ दरम्यान हवामान स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहून पर्जन्यमान सरासरीऐवढे जास्त तसेच कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीऐवढे राहण्याची शक्यता आहे. 

कृषी हवामान सल्ला

पिकाचे नाव आद्रक

कंदवाढीची अवस्‍था

मागील आठवडयातील वाढलेली आर्द्रता यामुळे आद्रक पीकामध्ये पानावरील ठिपके, करपा आणि कंदसडीचा प्रादूर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी परभणी कृषि विद्यापीठाने विकसित केलेले बायोमिक्स हे जैविक बुरशीनाशक व कीडनाशकाची ५ लिटर प्रति एकर प्रमाण घेऊन पाण्यात मिसळुन आळवणी करावी किंवा एजोक्सिस्ट्रोबीन १८.२ टक्के + डायफेनोकोनॅझोल ११.४ टक्के (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) १० मिली किंवा प्रोपीकोनॅझोल २५ टक्के १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

हळद

कंदवाढीची अवस्‍था

मागील आठवडयातील वाढलेली आर्द्रता यामुळे हळद पीकामध्ये पानावरील ठिपके, करपा आणि  कंदसडीचा प्रादूर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी परभणी कृषि विद्यापीठाने विकसित केलेले बायोमिक्स हे जैविक बुरशीनाशक व कीडनाशकाची ५ लिटर प्रति एकर प्रमाण घेऊन पाण्यात मिसळुन आळवणी करावी किंवा एजोक्सिस्ट्रोबीन १८.२ टक्के + डायफेनोकोनॅझोल ११.४ टक्के (पूर्वमिश्रित बुरशीनाशक) १० मिली किंवा प्रोपीकोनॅझोल २५ टक्के १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

हरभरा

पेरणी ते रोप अवस्था

पाण्याच्या उपलब्धता व सिंचनाच्या सोयीनुसार हरभरा पिकाच्या पेरणीसाठी शेतात ओलित करून शेतात वापसा येताच पेरणी करून घ्यावी. तसेच उगवून आलेल्या पिकास पाणी व्यवस्थापन करावे.

बटाटा

पेरणी ते रोप अवस्था

पाण्याच्या उपलब्धता व सिंचनाच्या सोयीनुसार बटाटा पिकाच्या लागवड शेतात ओलित करून करावी. तसेच उगवून आलेल्या पिकास पाणी व्यवस्थापन करावे.

मोसंबी

फळ वाढीची अवस्‍था

काढणीस तयार असलेल्या मोसंबी फळांची काढणी केल्यानंतर प्रतवारी करुन बाजारपेठेत विक्रीस पाठवावीत. तसेच मोसंबी बागेस पाणी व्यवस्थापन करावे.

डाळिंब

फळ वाढीची अवस्‍था

डाळिंब बागेस पाणी व्यवस्थापन करावे.

भाजीपाला

फुल ते फळ धारणा अवस्था

मागील काही दिवसांमधील वाढलेली आर्द्रता यामुळे टोमॅटो पिकावर लवकर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सीस्ट्रॉबीन २३ टक्के एससी १० मीली किंवा कॅप्टन (५० टक्के डब्लूपी) २५ ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

तुती रेशीम

रेशीम कीटकांना खाद्य देत असताना फांदया, तुती पाने पातळ एका थरात दयावे. जास्तीचे खादय देऊ नये फांदया खादय दिवसातून तीन वेळा दयावे. रेशीम कीटक कात अवस्थेत बसताना चुना पावडर रॅकवर धुरळणी करावी. यामुळे बेडवरील आर्द्रता कमी होण्यास मदत मिळते.

पशुसंवर्धन

शेळ्यांच्या व वासरांच्या गोठ्यामध्ये चाटण विटा टांगून ठेवाव्यात. जेणेकरून जनावरांच्या आहारात खनिज मिश्रणांचा पुरवठा होऊन त्यांची चांगली वाढ होते, भूक वाढते, पचन क्रिया सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढुन दूध उत्पादनातही वाढ होते. तसेच अखाद्य वस्तू चाटणे, चघळणे यासारख्या वाईट सवयी बंद होतात.

इतर

मोसंबी हा व्हिटॅमिन सी चा उत्तम स्त्रोत असुन शरीरातील पाण्याची कमतरता व इलेक्ट्रोलाईटसचे संतुलन राखते. मोसंबी पासून ज्यूस, पेय, जाम, जेली, कॅन्डी, पावडर, सालीपासून तेल व पेक्टीन यासारखी मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात.

सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ जुन २०२६ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक २६ ते ३० जून २०२६ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक २६ ते ३० ऑगस्ट २०२६ साठी हवामान अंदाज व कृषी हवामान सल्ला