औरंगाबाद जिल्ह्याकरिता दिनांक ०९ ते १३ सप्टेंबर २०२३ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार औरंगाबाद जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश ढगाळ राहून दि. ०९ व १० सप्टेंबर २०२३ रोजी ब-यापैकी व्यापक प्रमाणात मध्यम तर दि. ११ ते १३ सप्टेंबर २०२३ रोजी विखुरलेल्या प्रमाणात अतीशय हलक्या ते हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २५.० ते ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २०.० ते २२.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ६६ ते ९४ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग २० ते २६ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. सतर्कता: औरंगाबाद जिल्हयात दि. ०८ सप्टेंबर २०२३ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) औरंगाबाद जिल्हयात दिनांक १३ ते १९ सप्टेंबर २०२३ दरम्यान आकाश अंशत:ढगाळ ते ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषि हवामान सल्ला ऊस वाढीची अवस्था आडसाली ऊस पिकास लागवड करून ६ ...