औरंगाबाद जिल्ह्याकरिता दिनांक ०९ ते १३ सप्टेंबर २०२३ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार औरंगाबाद जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश ढगाळ राहून दि. ०९ व १० सप्टेंबर २०२३ रोजी ब-यापैकी व्यापक प्रमाणात मध्यम तर दि. ११ ते १३ सप्टेंबर २०२३ रोजी विखुरलेल्या प्रमाणात अतीशय हलक्या ते हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २५.० ते ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २०.० ते २२.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ६६ ते ९४ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग २० ते २६ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
सतर्कता:
औरंगाबाद जिल्हयात दि. ०८ सप्टेंबर २०२३ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या
कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास)
राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) औरंगाबाद
जिल्हयात दिनांक १३ ते १९ सप्टेंबर २०२३ दरम्यान आकाश अंशत:ढगाळ ते ढगाळ राहील.
तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर
कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषि
हवामान सल्ला
ऊस
वाढीची अवस्था
आडसाली ऊस
पिकास लागवड करून ६ ते ८ आठवडे झाले असल्यास शिफारसीत नत्राचा दुसरा हप्ता पावसाने
उघाड दिल्यास द्यावा. तसेच ढगाळ वातावरणामुळे ऊस पिकामध्ये पांढऱ्या माशीचा
प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता आहे यासाठी पिकात पिवळे चिकट सापळे लावावेत.
कापुस
पाते लागणे ते बोंड धरणे
पावसाचा
अंदाज लक्षात घेता कापुस पिकातील फवारणीचे कामे दोन दिवस पुढे ढकलावीत.तसेच कापुस पीकावरील गुलाबी/शेंदरी
बोंडअळीच्या प्रादूर्भावावर लक्ष
ठेवावे. त्यासाठी प्रति हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावेत. कापुस पिकातील डोमकळया
दिसल्यास वेचून नष्ट कराव्यात.
मका
कणसे धरणे
पावसाचा
अंदाज लक्षात घेता मका पिकातील
फवारणीचे कामे दोन दिवस पुढे ढकलावीत. तसेच मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव ओळखन्यासाठी एकरी २० कामगंध सापळे
लावावेत.
तुर
फांद्या लागणे अवस्था
सध्यस्थितील
वातावरणामुळे तुर पिकामध्ये मर व करपा (फायटोप्थोरा ब्लाईट) रोगाचा प्रादुर्भाव
वाढण्याची शक्यता असल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून एलिएट पावडर २५ ग्रॅम
प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन पावसाची उघाड बघुन आळवणी करावी.
मुग/उडीद
दाणे भरणे ते परिपक्वता
लवकर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या मुग/उडीद पीकाची काढणी पुढे
ढकलावी. तसेच काढणी केलेल्या शेंगा कोरडया व सुरक्षित ठिकाणी वाळविण्यासाठी
टाकाव्यात.
सिताफळ
फळवाढीची अवस्था
मागील आठवड्यातील दमट वातावरणामुळे सीताफळ बागेत पिठ्या ढेकुण या किडीचा
प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी व्हर्टिसिलियम लिकॅनी ४० ग्रॅम
प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन पावसाची उघड बघुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
भाजीपाला
फुलधारणा ते फळधारणा
पावसाचा
अंदाज लक्षात घेता भाजीपाला पिकातील फवारणीची कामे पुढे ढकलावीत. तसेच काढणीस तयार
असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी.
पशुसंवर्धन
पुढील पाच
दिवसांचा हवामानाचा अंदाज पाहता शेतकरी बांधवांनी आपले पशुधन झाडाखाली, पाणवठयाजवळ
किंवा लोखंडी अवजारांना न बांधता सुरक्षित ठिकाणी बांधावेत. तसेच जोरदार पावसाच्या
अनुषंगाने गोठयांची डागडूजी करुन घ्यावी. पाऊस चालू असतांना जनावरांना बाहेर
चरावयास सोडू नये.
गोवंशीय
पशुधनामध्ये लम्पीस्कीनचा प्रादूर्भाव दिसून येत आहे. यात लहान वयातील वासरांमध्ये
रोगाचा प्रादूर्भाव होवून मृत्युचे प्रमाण अधिक आहे. याच्या नियंत्रणासाठी व
पशुधनातील प्रतिकारशक्ती वाढविण्याकरीता लहान वासरांना चिक पाजावा, वयाच्या
सातव्या दिवशी जंतनाशक औषधींची मात्रा द्यावी व त्याप्रमाणे वेळेवर लसीकरण करावे,
जनावरांमध्ये आजारी व निरोगी जनावरे असे विलगीकरण करावे व त्यांच्या चारा पाण्याची
स्वतंत्र व्यवस्था करावी तसेच यामध्ये वरील उपायांसोबत पशुधनाची जास्तीत जास्त
काळजी घेणे गरजेचे आहे.
इतर
शेतकरी बांधवानी पावसाचा अंदाज लक्षात घेता फवारणीची व काढणीची कामे पुढे
ढकलावीत.
Comments
Post a Comment