छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक २६ ते ३० ऑगस्ट २०२६ साठी हवामान अंदाज व कृषी हवामान सल्ला

 


प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश ढगाळ राहून तुरळक ठिकाणी अतिशय हलक्या ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३१.० ते ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२.० ते २३ अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ५५ ते ८४ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १७ ते २० किमी/तास राहण्याची शक्यता आहे.  

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक ३० ऑगस्ट ते ०५ सप्टेबर २०२६ दरम्यान हवामान ढगाळ राहून पर्जन्यमान तसेच कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.

कृषी हवामान सल्ला

पिकाचे नाव

सोयाबीन

फांद्या लागणे ते फुलधारणा अवस्था

मागील आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव ‍दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी शेतात T आकाराचे पक्षीथांबे उभारावेत. तसेच इमामेक्टिन बेन्झोएट १.९ टक्के ईसी ८.५ मिलि किंवा प्रोफेनोफॉस ५० ईसी २० मिली किंवा फ्ल्युबेन्डामाईड २० टक्के डब्ल्युजी ५-६ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच सोयाबीन पिकामध्ये कोळपणी व खुरपणीचे कामे पावसाची उघाड बघुन करावी.

खरीप ज्वारी

वाढीची अवस्था

मागील आठवड्यातील ढगाळ व दमट वातावरणामुळे ज्वारी पिकामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास व्यवस्थापनासाठी निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अझाडिरॅक्टिन १५०० पीपीएम ५० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

बाजरी

वाढीची अवस्था

मागील आठवड्यातील ढगाळ व दमट वातावरणामुळे बाजरी पिकामध्ये खोड किडीचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी क्विनॉलफॉस २५ टक्के २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

खरिप भुईमुग

फुलधारणा ते आऱ्या अवस्था

मागील आठवड्यातील ढगाळ व दमट वातावरणामुळे भुईमूग पिकामध्ये टिक्का रोगाचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी हेक्साकोनाझोल ५ टक्के ईसी ३० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

आद्रक

फुटवे अवस्था

मागील आठवड्यातील ढगाळ व दमट वातावरणामुळे आद्रक पिकामध्ये बुरशीजन्य रोगांचा (कंदसड) प्रादुर्भाव टाळण्यासाठी परभणी कृषि विद्यापीठाने विकसित केलेले बायोमिक्स हे जैविक बुरशीनाशक व कीडनाशकाची ५ लिटर प्रति एकर प्रमाण २०० लिटर पाण्यात मिसळुन आळवणी करावी किंवा कॉपर ऑक्झीक्लोराईड ५० टक्के डब्ल्यूपी २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन आळवणी करावी. तसेच फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी १२:६१:०० या विद्राव्य खताची २.५ किलो प्रति एकर याप्रमाणे पाण्यात मिसळून आळवणी करावी.

हळद

फुटवे अवस्था

सध्यस्थितीत हळद पीक पिवळे पडत असुन याच्या व्यवस्थापनासाठी ०.५ ते १ टक्के फेरस सल्फेट किंवा एडिटिए चीलेटेड मिक्स मायक्रोनुट्रीएंट ग्रेड (II) ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच हळद पिकामध्ये फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी १२:६१:०० या विद्राव्य खताची २.५ किलो प्रति एकर याप्रमाणे पाण्यात मिसळून आळवणी करावी. 

मोसंबी

फळ वाढीची ते काढणी अवस्‍था

मागील आठवड्यातील मागील आठवड्यातील ढगाळ व दमट वातावरणामुळे मोसंबी बागेमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन फळगळ दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी नॅनो युरिया ४० मिली व कार्बेन्डाझिम १२ टक्के + मॅंकोझेब ६३ टक्के डब्ल्यूपी २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच फळांची प्रत सुधारण्यासाठी जिब्रेलिक ऍसिड (GA) २ ग्रॅम + पोटॅशियम नायट्रेट १.५ किलो + बोरिक ऍसिड ३०० ग्रॅम प्रति १०० लिटर पाण्यात मिसळुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

डाळिंब

फळ वाढीची अवस्‍था

मागील आठवड्यातील ढगाळ व दमट वातावरणामुळे डाळिंब बागेमध्ये रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी सायंट्रानिलिप्रोल १०.२३ टक्के ओ. डी. ७.५ मिली किंवा थायोमिथोक्झाम २५ टक्के डब्ल्यू जी ०५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच डाळिंब बागेमध्ये तेलकट डागांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असून याच्या व्यवस्थापनासाठी स्ट्रेप्टोसायक्लिन ५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

भाजीपाला

फुल ते फळ धारणा अवस्था

मागील आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे व वाढलेल्या आर्द्रतेमुळे भेंडी पिकामध्ये भुरी रोगाच्या प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी पाण्यात विरघळणारे सल्फर २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच सध्यस्थितीत फुलगोभीवर गडडा पोखरणारी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी मॅलेथीऑन ५० ईसी १५ मीली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

तुती रेशीम

रेशीम किटकांच्या वाढीच्या अवस्थेनंतर चौथी कात अवस्थेपुर्वी ढगाळ हवामानात फांदी खादय देण्यापुर्वी रॅकवर १०० अंडी पुंजासाठी १० ते १५ किलो १०-१२ दिवसात पांढरा चूना व कात पास होण्यापुर्वी विजेता निर्जंतुक ४ किग्रॅ एक दिवस आड धूरळणी करावी.    

पशुसंवर्धन

जनावरांमध्ये बाह्य परजीवी कीटकांचा (ऊवा, पिसवा, गोचीड व चावणाऱ्या कीटकवर्गीय माशा) प्रादुर्भाव दिसून येत आहे. म्हणून पशुपालकांनी ५% निंबोळी अर्क किंवा वनस्पतीजन्य कीटकनाशक (कडुनिंब तेल १५ मिली + कारंज तेल १५ मिली  + २ ग्रॅम मऊ साबण + १ लिटर पाणी) हे द्रावण आठवड्याच्या अंतराने पशुधनावर, गोठ्यामध्ये सभोवताली साचलेल्या पाण्याचे डबके, खच खळगे/नाली व शेणाच्या ढिगाऱ्यावर फवारावे

इतर

सर्व शेतकरी बांधवांकरीता त्यांच्या शेतातील पीकांवरील बुरशींचे तसेच पीकातील खत व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारे जैविक बुरशीनाशके (बायोमिक्स) व जैविक खते (बायोफर्टीलायझर) निविष्ठा कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथे विक्रीकरीता उपलब्ध आहेत.

सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.



Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ जुन २०२६ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला