छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक १३ ते १७ नोव्हेंबर २०२४ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान स्वच्छ ते ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३०.० ते ३१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १६.० ते १७.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४० ते ६६ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०५ ते ०७ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. १७ ते २३ नोव्हेंबर २०२४ दरम्यान आकाश स्वच्छ राहील. तसेच पर्जन्यमान व कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषी हवामान सल्ला आद्रक कंद वाढीची अवस्था आद्रक पिकामध्ये गरजेनुसार सुक्ष्म सिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन करावे. तसेच अद्रक पिकामध्ये कंदसडीचा प्रादुर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी मेटॅलॅक्झील ४ टक्के + मॅन्कोझेब ६४ टक्के २५ ग्रॅम प्रति १० पाण्यात मिसळुन आळवणी करावी. हळद कंद वाढीची अवस्था हळद पिकामध्ये गरजेनुसार सुक्ष्म सिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन करावे. तसेच हळद पीकावर करपा रोगाचा प्रा...