छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ११ ते १५ ऑक्टोंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश स्वच्छ राहील. तसेच कमाल तापमान ३३.० ते ३५.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १७.० ते १९.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४७ ते ६२ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०३ ते ०५ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. १५ ते २१ ऑक्टोंबर २०२५ दरम्यान आकाश स्वच्छ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीऐवढे,कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरीऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषि हवामान सल्ला ऊस कांडे धरणे ते कांडे वाढीची अवस्था मागील आठवड्यातील दमट वातावरणामुळे ऊस पिकामध्ये लोकरी मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी मोनोक्रोटोफॉस ३६ टक्के एस.एल. १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. कापूस बोंड लागणे/ बोंड वाढीची अवस्था मागील आठवड्यातील दमट वातावरणामुळे कापुस पिकामध्ये पातेगळ दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी नॅप्थॅलिक ॲ सिटीक ॲ सिड (एनएए) २ ते २.५ मिली प्रति...