छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक ०३ ते ०७ मे २०२३ साठी हवामान अंदाज
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान अंशत:ढगाळ ते ढगाळ राहुन तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३४.० ते ३७.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २०.० ते २१.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ३५ ते ७७ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ११ ते १४ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
सर्तकता
: छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ०२,
०४ व ०५ मे २०२३ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम
स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहण्याची
शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती
संभाजीनगर जिल्हयात दि. ०७ ते १३ मे २०२३ दरम्यान आकाश स्वच्छ ते अंशतःढगाळ राहून
पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. तर कमाल तापमान मध्यम
प्रमाणात सरासरी पेक्षा कमी तर किमान तापमान सरासरी पेक्षा कमी राहण्याची शक्यता
आहे.
कृषी हवामान सल्ला
उन्हाळी मका
कणसे धरणे अवस्था
मागील
आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे मका पिकामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत
असून याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के एसजी ४ ग्रॅम किंवा
स्पिनेटोरम ११.७ एससी ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात
मिसळून पावसाची उघाड बघून स्वच्छ व शांत वातावरणात फवारणी करावी. फवारणी करत
असताना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.
मोसंबी
फळवाढीची अवस्था
मागील
आठवडयातील वादळीवा-यासह झालेल्या पावसामुळे मोसंबी फळबागेतील तुटून पडलेली फळे व फांद्या
वेचून जमा करुन नष्ट कराव्यात. तसेच वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यामुळे नवीन
लागवड केलेल्या रोपांना काठीचा साहाय्याने आधार द्याव्या.
डाळिंब
फळवाढीची अवस्था
मागील
आठवडयातील वादळीवा-यासह झालेल्या पावसामुळे डाळींब फळबागेतील तुटून पडलेली फळे व फांद्या
वेचून जमा करुन नष्ट कराव्यात. तसेच वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यामुळे नवीन
लागवड केलेल्या रोपांना काठीचा साहाय्याने आधार द्यावा. तसेच डाळींब बागेमध्ये
फळांचा आकारामध्ये वाढ होण्याकरिता सूक्ष्म अन्नद्रव्याची १.० ते १.५ किलो प्रति हेक्टर या प्रमाणात
पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघून स्वच्छ व शांत वातावरणात फवारणी करावी.
भाजीपाला
फुलधारणा ते फळधारणा अवस्था
मागील
आठवडयातील वादळीवा-यासह झालेल्या पावसामुळे गळून पडलेले टोमॅटो जमा करुन नष्ट
करावीत. तसेच फळधारणा झालेल्या टोमॅटो पिकामध्ये काठी व दोरीच्या सहाय्याने आधार
दयावा. वादळीवाऱ्यासह पावसाची शक्यता असल्यामुळे काढणीस तयार असलेल्या भाजीपाला
पिकाची काढणी करून घ्यावी जेणेकरून संभाव्य नुकसान टाळता येईल.
तुती रेशीम
रेशीम किटक
संगोपन गृहातील तापमान व आर्द्रता मर्यादित (२२ ते २८ सें.ग्रे.) ठेवावे जेणेकरून
कोष उत्पादन चांगले येईल. परंतु ३५ सें.ग्रे. च्या वर तापमान गेल्यास रेशीम किटक
पाने खात नाहीत यामुळे उत्पादनात घट होते.
पशुसंवर्धन
तुरळक
ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता
असुन सर्व शेतकरी बांधवानी पाऊस चालू असताना जनावरे बाहेर चरावयास सोडू नये व
जनावरांना बाहेर न बांधता गोठ्यात सुरक्षित ठिकाणी बांधावे. तसेच
वादळीवारा व विजेचा कडकडाट चालू असताना जनावरे झाडाखाली बांधणे टाळावे. तसेच
कोंबडयांना उघडयांवर सोडू नये.
इतर
वादळीवाऱ्यासह पावसाची
शक्यता असल्यामुळे काढणीस तयार असलेल्या आंबा फळाची लवकरात लवकर काढणी करून
घ्यावी. तसेच काढणी केलेले कांदा पिक शेतात पडू न देता सुरक्षित ठिकाणी साठवणूक
करावी.
Comments
Post a Comment