छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक १० ते १४ मे २०२३ साठी हवामान अंदाज

 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३८.० ते ४०.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २१.० ते २३.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता २३ ते ६४ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १४ ते ३० किमी/तास राहण्याची शक्यता आहे.

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. १४ ते २० मे २०२३ दरम्यान आकाश स्वच्छ राहून पर्जन्यमान, कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.

कृषी हवामान सल्ला

उन्हाळी मका

दाणे भरणे अवस्था

मका पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

मोसंबी

फळवाढीची अवस्था

मागील आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे मोसंबी बागेत रसशोषन करणा-या किडींचा प्रादुर्भाव वाढला असून याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट ३० टक्के ईसी १३ मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के ३ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. फवारणी शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी करावी. उन्हामध्ये फवारणी करू नये.

डाळिंब

मृग बहार

मृग बहार लवकर घेण्याचे नियोजन असल्यास बाग ताणावर असताना मे महिन्याच्या शेवटी इथेफोन ३९ % एस एल ची फवारणी करून पानगळ करून घ्यावी व नंतर हलकी छाटणी करून घ्यावी.छाटणी करताना पेन्सिल आकाराच्या काड्या शेंड्याकडून १० ते १५ सेमी पर्यंत छाटाव्यात तसेच वाळलेल्या फांद्या छाटाव्यात व बागेत पडलेला काडीकचरा वेचून बाग स्वच्छ ठेवावी.

भाजीपाला

फुलधारणा ते फळधारणा अवस्था

टोमॅटो पिकावरील फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी फिप्रोनील १५ मिली  + करंज तेल २० मिली  प्रति १० लिटर  पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच भाजीपाला पिकास पाण्याचा ताण बसणार नाही याची काळजी घ्यावी व पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. तसेच भाजीपाला पिकाची काढणी शक्यतो सकाळी व सायंकाळच्या वेळेस करावी.

तुती रेशीम

रेशीम किटक संगोपन गृहातील तापमान व आर्द्रता मर्यादित (२२ ते २८ सें.ग्रे.) ठेवावे जेणेकरून कोष उत्पादन चांगले येईल. परंतु ३५ सें.ग्रे. च्या वर तापमान गेल्यास रेशीम किटक पाने खात नाहीत यामुळे उत्पादनात घट होते.

पशुसंवर्धन

सध्यस्थितीत गाई, म्हशी व शेळ्या, मेंढ्याना पशुवैद्यकाच्या सल्ल्याने रोग प्रतिबंधात्मक लसीकरण  करून घ्यावे.

इतर

शेतकरी बांधवानी खरीप हंगामातील पीकांच्या लागवडीकरीता पुर्वमशागतीची कामे करुन घ्यावीत.

सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, औरंगाबाद-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ जुन २०२६ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक २६ ते ३० जून २०२६ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक २६ ते ३० ऑगस्ट २०२६ साठी हवामान अंदाज व कृषी हवामान सल्ला