औरंगाबाद जिल्ह्याकरिता दिनांक १२ ते १६ ऑगष्ट २०२३ साठी हवामान अंदाज व कृषि हवामानसल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार औरंगाबाद जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश अंशत:ढगाळ ते ढगाळ राहून तुरळक ठिकाणी अतीशय हलक्या ते हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३०.० ते ३१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २०.० ते २१.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ५२ ते ८३ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १९ ते २३ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) औरंगाबाद
जिल्हयात दिनांक १६ ते २२ ऑगष्ट २०२३ दरम्यान आकाश अंशत:ढगाळ ते ढगाळ राहील. तसेच
पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान
सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषि
हवामान सल्ला
ऊस
वाढीची अवस्था
ऊस पीकावरील पांढ-या माशीच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट ३०
टक्के ईसी ३६ मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच
ऊस पिकामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी
फिप्रोनील ४० टक्के + इमिडाक्लोप्रिड ४० टक्के डब्ल्युजी १५० ग्रॅम आणि
डेल्टामेथ्रीन १०० इसी ११ टक्के २५० मिली प्रति एकर पाण्यात मिसळुन आळवणी करावी.
कापूस
वाढीची अवस्था
मागील
आठवडयातील ढगाळ वातावरणामुळे कापुस पिकावर रस शोषण करणाऱ्या किडींचा (मावा, फुलकिडे, पांढरी माशी)
प्रादूर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी ८ ते १० पिवळे व निळे चिकट
सापळे प्रति एकर प्रमाणात लावावेत. तसेच ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. प्रादुर्भाव जास्त असल्यास ॲसीटामिप्रीड २० टक्के ३० ग्रॅम किंवा थायमिथॉक्झाम २५ टक्के ४० ग्रॅम किंवा
फलोनिकॅनीड ५० टक्के ६० ग्रॅम प्रति एकर स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
मका
वाढीची अवस्था
मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव
ओळखन्यासाठी एकरी २० कामगंध सापळे लावावेत. तसेच मका पिकामध्ये स्फुरद या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पिकाची पाने जांभळी
पडत असून याच्या व्यवस्थापनासाठी १९:१९:१९ किंवा ००:५२:३४ या विद्राव्य खताची १००
ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
तुर
वाढीची अवस्था
तुर पिकामध्ये कोळपणी व तण नियंत्रणाची कामे करावीत.
मुग/उडीद
वाढीची ते कळी अवस्था
ढगाळ वातावरणामुळे मुग/उडीद पिकावर पाने खाना-या अळींचा प्रादुर्भाव दिसून
येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी क्विनॉलफॉस २५ ईसी ३० मिली प्रति १० लिटर पाण्यात
मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
सिताफळ
फुल ते फळ धारणा अवस्था
वातावरणातील वाढलेल्या आर्द्रतेमुळे सिताफळाच्या झाडांवरील फुले काळी पडून
गळून जात असुन याच्या व्यवस्थापनासाठी कार्बेन्डाझिम + मॅन्कोझेब २० ग्रॅम प्रति १० लिटर
पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी
करावी. तसेच सिताफळ
बागेत पिठ्या ढेकूण किटकावर प्रतिबंधक उपाय करण्यासाठी बागेतील सर्व झाडाच्या
जमिनीलगत बुडावर चिकट बँड किंवा प्लास्टिकच्या टेपचा वापर करावा व प्लास्टिक टॅपवर चिकट वंगण (ग्रीस) पसरवावे.
भाजीपाला
फुलधारणा ते फळधारणा
ढगाळ
वातावरणामुळे वांगी तसेच टोमॅटो पिकावर शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव
दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी जर
प्रादुर्भाव जास्त असल्यास सायपरमेथ्रीन १० टक्के ई.सी.०६ मिली किंवा
डेल्टामेथ्रीन २.८ टक्के ई.सी. १० मिली किंवा इमामेक्टिन बेन्झोएट ५ टक्के एस सी
०३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
पशुसंवर्धन
सध्यस्थितीत
मावा या विषाणूजन्य आजारापासुन शेळया व मेंढयाचे संरक्षण करण्याकरीता त्याच्या
तोंड व ओठांवरील जखमा सकाळी व सायंकाळी पोटॅशियम परमॅग्नेटने धुवून साफ कराव्यात व
जखमांवर हळद, लोणी किंवा दुधाची साय यासारखे मऊ पदार्थ
लावावेत. यामुळे जखमा लवकर बऱ्या होतात. तसेच खादयामध्ये मऊ, लुसलुसीत
चारा, कोथींबीर, मेथी घास याचा समावेश
करावा.
इतर
शेतकरी बांधवांनी पिकातील
आंतरमशागतीची कामे करुन घ्यावीत. जेणेकरुन पीकांच्या मुळाभोवती जमीन भुसभुसीत
होवून हवा खेळती राहील व पीकाची वाढ जोमाने होण्यास मदत होईल.
शेतकरी बांधवांनी फवारणी करताना
नेहमी अंगरक्षक कपडे, हातमोजे, चष्मा, मास्क, टोपी, गनबूट, इत्यादीचा वापर करावा व संपूर्ण शरीर झाकले जाईल
याची काळजी घ्यावी.
Comments
Post a Comment