छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक २२ ते २६ नोव्हेंबर २०२३ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश स्वच्छ ते ढगाळ राहुन दि. २५ व २६ नोव्हेंबर २०२३ रोजी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३०.० व ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १६.० ते १८.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ५० ते ९० टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०८ ते १५ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. 

सर्तकता : छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. २५ नोव्हेंबर २०२३ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास ) राहण्याची शक्यता आहे.

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. २६ नोव्हेंबर ते ०२ डिसेंबर २०२३ दरम्यान आकाश स्वच्छ ते अंशतःढगाळ राहून पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान सरासरी पेक्षा कमी व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.

कृषी हवामान सल्ला

आद्रक

कंद वाढीची अवस्‍था

आद्रक पिकामध्ये गरजेनुसार सुक्ष्म सिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन करावे.

हळद

कंद वाढीची अवस्‍था

हळद पिकामध्ये गरजेनुसार सुक्ष्म सिंचन पद्धतीने पाणी व्यवस्थापन करावे.

हरभरा

रोप ते वाढीची अवस्था

पाण्याच्या उपलब्धतेनुसार हरभरा पिकास तुषार सिंचनाच्या सहाय्याने पाणी व्यवस्थापन करावे.

जवस

रोप ते वाढीची अवस्था

पाण्याच्या उपलब्धतेनुसार जवस पिकास तुषार सिंचनाच्या सहाय्याने पाणी व्यवस्थापन करावे.

बटाटा

रोप ते वाढीची अवस्था

सध्यस्थितीत तापमानातील चढउतारामुळे बटाटा पीकामध्ये रसशोषण करणा-या किडींच्या प्रादुर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. तसेच पीकामध्ये निळे व पिवळे चिकट सापळे (छोट्या आकाराची) एकरी २५ ते ३० या प्रमाणात लावावेत. तसेच बटाटा पिकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

मोसंबी

वाढीची अवस्था

नवीन लागवड केलेल्या मोसंबी रोपांमध्ये जमिनीलगत अतिओलाव्यामुळे फायटोप्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव होऊन रोपांची पाने पीवळी पडुन गळत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी खोडालगत ५ ते १० सेमी पर्यंत माती लावुन लगेच कॉपर ऑक्झीक्लोराईड या बुरशीनाशकाची २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून ८ दिवसाच्या अंतराने दोन वेळा आळवणी करावी. मोसंबी फळझाडांना बोर्डो मिश्रण लावुन घ्यावे.

डाळिंब

बहार व्यवस्थापन

विश्रांती अवस्थेतील डाळिंब बागेमध्ये १ टक्के बोर्डो मिश्रण किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड ५० टक्के डब्ल्यूपी २५ ते ३० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी.

भाजीपाला

फुल ते फळ धारणा अवस्था

सध्यस्थितीत तापमानातील चढउतारामुळे कोबीवर्गीय भाजीपाला पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी डायमेथोएट ३० टक्के ईसी १३ मिली किंवा सायंट्रानिलीप्रोल १०.२६ टक्के १२ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.तसेच भाजीपाला पिकामध्ये पाणी व्यवस्थापन करावे.

तुती रेशीम

वातावरणातील बदल, ढगाळ हवामानात रेशीम कीटक संगोपनगृहातील तापमान २० अंशच्या खाली असेल तर कीटक तुती पाने खात नाहीत तसेच २५ ते २८ अंश सें. मर्यादित ठेवण्यासाठी संगोपनगृहात कोळसा शेगडी किंवा इलेकट्रीक रूम हिटरचा वापर करावा.तापमान मर्यादित असल्यास रेशीम कीटक तुती पाने खातात व त्यांची चांगली वाढ होते.

पशुसंवर्धन

वाढत्या थंडीपासुन बचाव करण्यासाठी शेळयांच्‍या तसेच कोंबडयाच्‍या शेडला बारदाण्याचे पडदे लावावेत तसेच शेडमधील तापमान उष्ण ठेवण्यासाठी शेडमध्‍ये रात्री १२ ते सकाळी ७ पर्यंत विदयुत बल्‍ब लावावेत. तसेच जनावरांच्या शरीरात उर्जा निर्माण करण्यासाठी प्रथिनेयुक्त पौष्टीक चारा दयावा. लाळ्या खुरकूत रोगासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जनावरामंध्ये पशुवैद्याच्या सल्ल्याने लसीकरण करून घ्यावे.

इतर

यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे विहिरी तसेच कुपनलिकेमधील पाण्याची पातळी कमी झालेली असुन पाण्याच्या अपव्यय टाळण्याकरिता शेतकरी बांधवानी पिकांना पाणी मोकाट पद्धतीने न देता ठिंबक आणि तुषार सिंचन पध्दतीचा वापर करावा जेणेकरून पाण्याची बचत होईल.

सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, औरंगाबाद-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक १९ ते २३ ऑक्टोंबर २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १५ ते १९ जानेवारी २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला