छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक २९ नोव्हेंबर ते ०३ डिसेंबर २०२३ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्लापत्रिका

 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश अंशत:ढगाळ ते ढगाळ राहुन दि. ०३ डिसेंबर २०२३ वगळता इतर दिवशी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २५.० व ३०.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १६.० ते १९.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ५४ ते ९३ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०९ ते १२ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. 

सर्तकता : छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. २९ व ३० नोव्हेंबर २०२३ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास ) राहण्याची शक्यता आहे.

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ०३ ते ०९ डिसेंबर २०२३ दरम्यान आकाश अंशत:ढगाळ ते ढगाळ राहून पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान सरासरी पेक्षा कमी व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.

कृषी हवामान सल्ला

आद्रक

कंद वाढीची अवस्‍था

मागील दोन दिवसात झालेल्या पावसामुळे आद्रक पिकातील अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. तसेच पुढील दोन दिवस पावसाची शक्यता असल्यामुळे पिकामध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.

हळद

कंद वाढीची अवस्‍था

मागील दोन दिवसात झालेल्या पावसामुळे हळद पिकातील अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा.तसेच पुढील दोन दिवस पावसाची शक्यता असल्यामुळे पिकामध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.

हरभरा

रोप ते वाढीची अवस्था

मागील दोन दिवसात झालेल्या पावसामुळे हरभरा पिकातील अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा.तसेच पुढील दोन दिवस पावसाची शक्यता असल्यामुळे पिकामध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.

जवस

रोप ते वाढीची अवस्था

मागील दोन दिवसात झालेल्या पावसामुळे जवस पिकातील अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा.

बटाटा

वाढीची अवस्था

मागील दोन दिवसात झालेल्या पावसामुळे बटाटा पिकातील अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा व पुढील दोन दिवस पावसाची शक्यता असल्यामुळे पिकामध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.तसेच फवारणीचे कामे पुढे ढकलावीत.

मोसंबी

वाढीची अवस्था

मागील दोन दिवसात वादळीवा-यासह झालेल्या पावसामुळे मोसंबी बागेतील गळून पडलेली फळे व फांदया जमा करुन बागेबाहेर काढाव्यात. जेणेकरुन बुरशीजन्य रोगांचा प्रादूर्भाव टाळता येईल. तसेच बागेतील अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा.

डाळिंब

वाढीची अवस्था

मागील दोन दिवसात वादळीवा-यासह झालेल्या पावसामुळे डाळींब बागेतील गळून पडलेली फळे व फांदया जमा करुन बागेबाहेर काढाव्यात. जेणेकरुन बुरशीजन्य रोगांचा प्रादूर्भाव टाळता येईल. तसेच बागेतील अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा.

भाजीपाला

फुल ते फळ धारणा अवस्था

मागील दोन दिवसात वादळीवा-यासह झालेल्या पावसामुळे टोमॅटो, मिरची, वांगी इत्यादी भाजीपाला पीकातील गळून पडलेली फळे वेचून नष्ट करावीत व       वादळीवा-यामुळे खाली पडलेल्या रोपांना दोरी व काठीच्या सहाय्याने आधार दयावा. तसेच भाजीपाला पिकातील अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा व पुढील दोन दिवस पावसाची शक्यता असल्यामुळे पिकामध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. त्याचप्रमाणे फवारणीचे कामे पुढे ढकलावीत.

तुती रेशीम

वातावरणातील बदल, ढगाळ हवामानात रेशीम कीटक संगोपनगृहातील तापमान २० अंशच्या खाली असेल तर कीटक तुती पाने खात नाहीत तसेच २५ ते २८ अंश सें. मर्यादित ठेवण्यासाठी संगोपनगृहात कोळसा शेगडी किंवा इलेकट्रीक रूम हिटरचा वापर करावा.तापमान मर्यादित असल्यास रेशीम कीटक तुती पाने खातात व त्यांची चांगली वाढ होते.

पशुसंवर्धन

तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन सर्व शेतकरी बांधवानी पाऊस चालू असताना जनावरे बाहेर चरावयास सोडू नये व जनावरांना बाहेर न बांधता गोठ्यात सुरक्षित ठिकाणी बांधावे. तसेच वादळीवारा व विजेचा कडकडाट चालू असताना जनावरे झाडाखाली बांधणे टाळावे.

इतर

शेतकरी बांधवांनी आपल्या भागातील हवामानाचा अंदाज व कृषीसल्लापत्रिका मिळविण्याकरीता मेघदूत ॲप व आपल्या भागात पडणा-या विजेच्या अचूक अंदाजाकरीता दामिनी ॲप गुगल प्लेस्टोअर वरुन डाऊनलोड करुन त्याचा वापर करावा.

सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, औरंगाबाद-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक १९ ते २३ ऑक्टोंबर २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १५ ते १९ जानेवारी २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला