छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक ०२ ते ०६ डिसेंबर २०२३ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश स्वच्छ ते ढगाळ राहुन दि. ०२ डिसेंबर २३ रोजी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३०.० ते ३१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १६.० ते २०.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ६२ ते ९३ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०९ ते १२ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.  

सर्तकता : छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ०१ डिसेंबर २३ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास ) राहण्याची शक्यता आहे.

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक ०६ ते १२ डिसेंबर २०२३ दरम्यान आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान व कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.

कृषि हवामान सल्ला

ऊस

फुटवे अवस्था

मागील तीन ते चार दिवसात झालेल्या पावसामुळे ऊस पिकातील अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा व पावसाची शक्यता असल्यामुळे पिकामध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच लागवड करून सहा आठवडे झाले असल्यास ऊस ‍पिकामध्ये नत्र खताची दुसरी मात्रा १२० किलो प्रति हेक्टर प्रमाणात शेतात वापसा असताना द्यावी.

कापुस

बोंड धरणे ते वेचणी अवस्था

मागील तीन ते चार दिवसात झालेल्या पावसामुळे कापुस पिकातील अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. तसेच पाऊसाने भिजलेल्या कापसाची वेचणी कापूस वाळल्यानंतर करावी व वेचलला कापूस वेगळा साठवावा.

तुर

शेंगा धरणे

मागील तीन ते चार दिवसात झालेल्या पावसामुळे तुर पिकातील अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा व पावसाची शक्यता असल्यामुळे पिकामध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.

रब्‍बी ज्‍वारी

वाढीची अवस्‍था

मागील तीन ते चार दिवसात झालेल्या पावसामुळे रब्‍बी ज्‍वारी पिकातील अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा व पावसाची शक्यता असल्यामुळे पिकामध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.

करडई

वाढीची अवस्‍था

मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे करडई पिकातील अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा व पावसाची शक्यता असल्यामुळे पिकामध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.

मका (रब्बी)

वाढीची अवस्‍था

मागील तीन ते चार दिवसात झालेल्या पावसामुळे मका (रब्बी) पिकातील अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. तसेच शेतकरी बांधवानी खरीप हंगामातील मका पिकाची कणसाची ढिगारे पावसाने भिजले असल्यास त्यास पसरवुन ऊन द्यावे.

गहू   

पेरणी  ते वाढीची अवस्था

मागील तीन ते चार दिवसात झालेल्या पावसामुळे गहू पिकातील अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा व पावसाची शक्यता असल्यामुळे पिकामध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी.तसेच शेतात वापसा येताच गहू पिकाची पेरणी लवकरात लवकर करून घ्यावी.

कांदा

वाढीची अवस्था

मागील तीन ते चार दिवसात झालेल्या पावसामुळे कांदा पिकातील अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा.

पेरू

फळ वाढीची ते परीपक्वता अवस्था

मागील तीन ते चार दिवसात झालेल्या पावसामुळे पेरू बागेतील अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. तसेच पेरु बागेतील फळमाशीचा प्रादूर्भाव ओळखण्यासाठी व त्याच्या नियंत्रणासाठी मिथाईल युजेनॉलचे सापळे लावावेत.

आंबा

वाढीची अवस्था

मागील तीन चार दिवसात झालेल्या पावसामुळे नवीन लागवड केलेली आंब्याची रोपे कोलमडली असल्यास त्यास काठीच्या साहाय्याने आधार द्यावा.

भाजीपाला

फुलधारणा ते फळधारणा

मागील तीन ते चार दिवसात झालेल्या पावसामुळे भाजीपाला पिकातील अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा व पावसाची शक्यता असल्यामुळे पिकामध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच गळून पडलेली, नासलेली फळे जमा करुन नष्ट करावीत व पडलेल्या रोपांना दोरी व काठीच्या सहाय्याने आधार दयावा व भाजीपाला पीकांमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी बांधवांनी आंतरप्रवाही बुरशीनशकांची प्रतिबंधात्मक फवारणी पावसाची उघाड बघुन करावी.  

पशुसंवर्धन

मागील तीन ते चार दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे जनावरांकरीता साठवणूक केलेला कडबा, सोयाबीन पीकाचा भुसा व इतर कोरडा चारा भिजला असल्यास त्यास उघडे करुन ऊन दयावे.

इतर

वातावरणातील आर्द्रता व तापमानातील फरकामुळे पीकांमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादूर्भाव होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी बांधवांनी आंतरप्रवाही बुरशीनशकांची प्रतिबंधात्मक फवारणी करावी.

सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, औरंगाबाद-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला