छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक ०३ ते ०७ ऑगस्ट २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर
जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान ढगाळ राहून बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या
पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २७.० ते ३१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान
२२.० ते २४.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ६४ ते ८४ टक्के राहील
तर वाऱ्याचा वेग १९ ते २६ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
सतर्कता: छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ०३
ऑगष्ट २०२४ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा व
विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम तर दि. ०४ ऑगष्ट २०२४ रोजी जोरदार स्वरुपाच्या
पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहील.
विस्तारित
अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक ०७ ते १३ ऑगस्ट २०२४
दरम्यान हवामान अंशत:ढगाळ ते ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी तर कमाल
तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषि
हवामान सल्ला
ऊस
वाढीची अवस्था
मागील आठवड्यातील पाऊस व
ढगाळ वातावरणामुळे ऊस पिकामध्ये पांढ-या माशीचा प्रादुर्भाव दिसून येत असून
याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट ३०
टक्के ईसी ३६ मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
तसेच ऊस पिकामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी
फिप्रोनील ४० टक्के + इमिडाक्लोप्रिड ४० टक्के डब्ल्युजी १५० ग्रॅम आणि
डेल्टामेथ्रीन १०० इसी ११ टक्के २५० मिली प्रति एकर पाण्यात मिसळुन आळवणी करावी.
कापूस
फांद्या लागणे अवस्था
मागील आठवडयातील ढगाळ
वातावरणामुळे कापुस पिकावर रस शोषण करणाऱ्या किडींचा (मावा, फुलकिडे, पांढरी माशी) प्रादूर्भाव
दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी ८ ते १० पिवळे व निळे चिकट सापळे प्रति एकर
प्रमाणात लावावेत. तसेच ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. प्रादुर्भाव जास्त
असल्यास ॲसीटामिप्रीड २० टक्के ३० ग्रॅम किंवा थायमिथॉक्झाम २५ टक्के ४० ग्रॅम किंवा फलोनिकॅनीड ५० टक्के ६० ग्रॅम प्रति एकर स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
मका
वाढीची अवस्था
मागील आठवड्यातील ढगाळ
वातावरणामुळे मका पिकावरील लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के
एसजी ४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ४ मिली किंवा क्लोरॅनट्रानिलीप्रोल १८.५
टक्के एससी ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
फवारणी करत असताना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.
तूर
वाढीची अवस्था
तुर पिकामध्ये कोळपणी व
तण नियंत्रणाची कामे पावसाची उघाड बघुन करावीत.
मूग/उडीद
फुल ते शेंगा धरणे
मागील ढगाळ वातावरणामुळे
मुग/उडीद पिकावर पाने खाना-या अळींचा प्रादुर्भाव दिसून येत असुन याच्या
व्यवस्थापनासाठी क्विनॉलफॉस २५ ईसी ३० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ
वातावरणात पावसाची उघाड बघुन फवारणी करावी. तसेच पिकातील तण व्यवस्थापन करावे.
सिताफळ
फळधारणा अवस्था
सिताफळ बागेत फळांच्या
वाढीसाठी १९:१९:१९ विद्राव्य खत ३ किलो प्रति एकर ड्रीपव्दारे किंवा पाण्यात मिसळून आळवणी करावी.
भाजीपाला
फुलधारणा ते फळधारणा
मागील
आठवड्यातील पाऊस व ढगाळ
वातावरणामुळे टोमॅटो फळावर
विषाणूजन्य काळे डाग किंवा काळे ठिपके दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी स्ट्रेप्टोसायक्लीन ४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात
फवारणी करावी. तसेच टोमॅटो पिकामध्ये मर रोगासाठी कॉपर
ऑक्झीक्लोराईड २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून आळवणी
करावी.
पशुसंवर्धन
छत्रपती संभाजीनगर
जिल्हयात दिनांक ०३ ऑगष्ट २०२४ रोजी तुरळक ठिकाणी
वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम तर दि. ०४ ऑगष्ट २०२४ रोजी जोरदार
पावसाची शक्यता असुन शेतकरी बांधवांनी आपले पशुधन सुरक्षित ठिकाणी बांधावेत. सध्यस्थितीत
मावा या विषाणूजन्य आजारापासुन शेळया व मेंढयाचे संरक्षण करण्याकरीता त्याच्या
तोंड व ओठांवरील जखमा सकाळी व सायंकाळी पोटॅशियम परमॅग्नेटने धुवून साफ कराव्यात व
जखमांवर हळद, लोणी किंवा दुधाची साय
यासारखे मऊ पदार्थ लावावेत. यामुळे जखमा लवकर बऱ्या होतात. तसेच खादयामध्ये मऊ, लुसलुसीत चारा, कोथींबीर, मेथी घास याचा समावेश
करावा.
इतर
छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक ०३ ऑगष्ट २०२४ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या
कडकडाटासह हलक्या ते मध्यम तर दि. ०४ ऑगष्ट २०२४ रोजी जोरदार पावसाची शक्यता असुन शेतकरी
बांधवांनी पीकात पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या पाण्याचा निचरा
होईल याची व्यवस्था करावी.
सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.
Comments
Post a Comment