छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक ०७ ते ११ डिसेंबर २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान अंशत:ढगाळ ते ढगाळ राहून दि. ०७ डिसेंबर २०२४ रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २७.० ते २९.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १२.० ते १९.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४० ते ९७ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०२ ते ०८ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ११ ते १७ डिसेंबर २०२४ दरम्यान आकाश स्वच्छ ते अंशतः ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर  कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.

कृषि हवामान सल्ला

ऊस

फुटवे अवस्था ते कांडे धरणे

तापमानातील चढउतारामुळे ऊस पिकामध्ये खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन, याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस २० ईसी २० ते २५  मिली किंवा फिप्रोनील ५ एससी ३० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. तसेच लागवड करून सहा आठवडे झाले असल्यास ऊस ‍पिकामध्ये नत्र खताची दुसरी मात्रा १२० किलो प्रति हेक्टर प्रमाणात द्यावी.   

कापूस

वेचणी

वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकाची वेचणी करून घ्यावी. पहिल्या आणि दुसऱ्या वेचणीचा चांगला व कवडी कापूस वेगळा साठवावा.

तूर

शेंगा धरणे अवस्था

सध्यस्थितीत वातावरणामध्ये धुकं पडण्याची शक्यता असून तूर पिकामध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट (५ एसजी) ४.४ ग्रॅम किंवा इंडोक्झाकार्ब (१५.८ इसी) ६.६ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच तूर पिकावरील शेंगमाशीच्या व्यवस्थापनासाठी लॅमडा सायहॅलोथ्रीन ५ ईसी ०८ मिली किंवा ल्युफेनुरॉन ५.४ टक्के १२ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

रब्‍बी ज्‍वारी

वाढीची अवस्था

मागील दोन दिवसातील ढगाळ वातावरणामुळे ज्वारी पिकामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असुन, सर्वेक्षणासाठी एकरी ०५ कामगंध सापळे लावावेत. तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडीरॅक्टीन १५०० पीपीएम ५० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

मका (रब्बी)

वाढीची अवस्था

मका पिकामध्ये तण व्यवस्थापन व अंतरमशागतीचे कामे करावीत. मका पिकावरील लष्करी अळीच्या सर्वेक्षणासाठी एकरी ०५ कामगंध सापळे लावावेत. तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५ टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडीरॅक्टीन १५०० पीपीएम ५० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

करडई

वाढीची अवस्था

मागील दोन दिवसातील ढगाळ वातावरणामुळे करडई पिकात काळा मावा या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असुन याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट ३० ईसी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

गहू   

वाढीची अवस्था

गहू पिकाची पेरणी १५ डिसेंबर पर्यंत करता येते. पेरणी झाली नसल्यास लवकरात लवकर गहू पिकाची पेरणी बीजप्रक्रिया करूनच करावी. तसेच पेरणी करुन २० ते ३० दिवस झालेल्या फुटवे अवस्थेतील गहू पीकास नत्राचा दुसरा हप्ता ५० किलो याप्रमाणे प्रतिहेक्टरी दयावा.

कांदा

वाढीची अवस्था

मागील दोन दिवसातील ढगाळ वातावरण व रिमझिम पावसामुळे कांदा पिकामध्ये मावा, तुडतुडे व फुलकिडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असुन याच्या व्यवस्थापनासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची प्रतिबंधात्मक फवारणी करावी तसेच पिवळे व निळे चिकट सापळे (छोट्या आकाराची) एकरी २५ ते ३० या प्रमाणात लावावेत. तसेच कांदा पिकामध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा डायथेन एम-४५ २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून १० ते १५ दिवसाच्या अंतराने आलटून पालटून फवारणी करावी

पेरू

फळ वाढीची अवस्था

सद्यस्थितीत पेरू बागेमध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी २० ते २५ मिथाईल युजेनॉलची रक्षक सापळे लावावीत. तसेच काढणीस तयार असलेल्या पेरु फळांची काढणी करून प्रतवारी करावी व बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवावीत.

आंबा

बहार धरणे

सध्यस्थितीत वातावरणामध्ये धुकं पडण्याची शक्यता असून आंबा फळबागेत भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असुन याच्या व्यवस्थापनासाठी प्रोपीओनेट १० मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.तसेच आंबा बागेत फुलधारणा व्यवस्थित होण्यासाठी १३:००:४५ विद्राव्य खताची १५० ग्रॅम प्रति  १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

भाजीपाला

फुलधारणा ते फळधारणा

मागील दोन दिवसातील ढगाळ वातावरणामुळे टोमॅटो पिकामध्ये शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असुन याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरानट्रानिलीप्रोल १८.५  एससी ४ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

पशुसंवर्धन

नवीन जन्मलेल्या गाय व म्हेस यांच्या वासरामध्ये गोलकृमीची लागण होते यासाठी जन्मलेल्या वासरास ७ व्या दिवशी व त्यानंतर पाइपराझीन अथेलोमिटीक या जंतनाशकाची मात्र देणे गरजेचे आहे. अन्यथा वासरामध्ये घट विस्टा होते यामुळे वासराचा मृत्यू होण्याची शक्यता असते.

सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला