छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ११ ते १५ डिसेंबर २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान अंशत:ढगाळ राहील. तसेच कमाल तापमान ३.० ते ३.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान ११.० ते १४.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४५ ते ६८ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ते किमी/तास राहण्याची शक्यता आहे.

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक १५ ते २१ डिसेंबर २०२४ दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.

कृषी हवामान सल्ला

आद्रक

कंद वाढीची अवस्था

आद्रक पिकामध्ये कंद वाढीसाठी ००:००:५० या विद्राव्य खताची मात्रा ५ किलो प्रति एकर दोन वेळा विभागुन ठिबक सिंचनाद्वारे द्यावी.

हळद

कंद वाढीची अवस्था

हळद पिकामध्ये कंद वाढीसाठी ००:००:५० या विद्राव्य खताची मात्रा ५ किलो प्रति एकर दोन वेळा विभागुन ठिबक सिंचनाद्वारे द्यावी.

हरभरा

फांद्या लागणे ते फुलधारणा अवस्था

मागील आठवडयात झालेला पाऊस व वाढलेली आर्द्रता यामुळे हरभरा पीकामध्ये मर रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशकाची ४० मिली/ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून जमीनीवर फवारणी किंवा आळवणी करावी. तसेच घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी ५ कामगंध सापळे प्रति हेक्टरी जमिनीपासून एक मीटर उंचीवर लावावेत व पीक एक महिन्याचे झाल्यावर पिकापेक्षा एक ते दिड फूट उंचीचे T अक्षराच्या आकाराचे ५० पक्षी थांबे प्रति हेक्टरी लावावेत. मर

जवस

वाढीची अवस्था

जवस तण नियंत्रणासाठी पहिली कोळपणी करावी.

बटाटा

वाढीची अवस्था

मागील आठवड्यातील ढगाळ व दमट वातावरणामुळे बटाटा पिकामध्ये लवकर येणारा करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असुन, याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब ७५ टक्के डब्ल्यूपी २५ ते ३० ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झीक्लोराईड ३० ग्रॅम किंवा प्रोपीनेब ७० टक्के डब्ल्यूपी ३० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मोसंबी

आंबिया बहार व्यवस्थापन

 

आंबिया बहार : मागील आठवडयात झालेल्या पावसामुळे भारी जमीनीत असलेल्या मोसंबी बागेतील ताण तुटुन नवती येण्याची शक्यता असुन त्यासाठी लीहोसीन ०४ मीली प्रती 10 लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

वाढीची अवस्था : नवीन लागवड केलेल्या मोसंबी बागेमध्ये मावा किडीचा प्रादूर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी डायमेथोएट १५ मिली किंवा इमिडाक्लोप्रीड ५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

डाळिंब

वाढीची अवस्था

डाळींब फळबागेमध्ये साल पोखरणा-या अळीचा प्रादूर्भाव दिसुन येत असल्यास प्रादूर्भावग्रस्त खोड किंवा फांदीवरील छिद्रामध्ये क्लोरिपायरीफॉस २० टक्के ईसी ३० मीली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून इंजेक्शनच्या सहाय्याने सोडावे व नंतर छिद्रे चिखलाने बंद करावीत. तसेच काढणीस तयार असलेल्या फळांची काढणी करावी.

भाजीपाला

फळ धारणा ते

फळवाढीची अवस्था

मागील आठवड्यातील ढगाळ व दमट वातावरणामुळे भाजीपाला पीकामध्ये भुरी रोगाचा प्रादर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी अझाक्सीस्ट्रॉबीन २३ टक्के एससी १० मीली  किंवा कॅप्टन ५० टक्के डब्ल्यू पी २०.५ ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भाजीपाला पिकातील तणनियंत्रणाची कामे करुन घ्यावीत.

तुती रेशीम

सद्यस्थितीमध्ये  थंडीत वाढ होत असुन रेशीम कीटक संगोपनगृहातील तापमान २० अंशच्या खाली असेल तर कीटक तुती पाने खात नाहीत तसेच २५ ते २८ अंश सें. मर्यादित ठेवण्यासाठी संगोपनगृहात कोळसा शेगडी किंवा इलेकट्रीक रूम हिटरचा वापर करावा.तापमान मर्यादित असल्यास रेशीम कीटक तुती पाने खातात व त्यांची चांगली वाढ होते.

पशुसंवर्धन

सद्यस्थितीत थंडी मध्ये वाढ होत असुन कुकुट पालन करणाऱ्या शेतकरी बांधवानी कोंबड्यांच्या आहारात इलेक्ट्रोलाईटस व ब  जीवनसत्वाचा वापर करावा जेणेकरुन थंडीमूळे येणार ताण कमी होण्यास मदत होईल.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ,परभणी यांनी विकसित केलेले बायोमिक्स जैविक बुरशीनाशक व कीडनाशक तसेच जैविक संघ (NPK) कृषी विज्ञान केंद्र पैठण रोड छत्रपती संभाजीनगर येथे विक्रीस उपलब्ध आहे.

सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला