छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १९ ते २३ फेब्रुवारी २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान मुख्यत: कोरडे व स्वच्छ राहील. तसेच कमाल तापमान ३४.० ते ३६.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १५.० ते १७.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता १६ ते ४९ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०५ ते ०७ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक २३ ते २९ फेब्रुवारी २०२५ दरम्यान आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा अधिक तर कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

कृषी हवामान सल्ला

आद्रक

काढणी

आद्रक पिकाची काढणी करत असताना ७० ते ८० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाने सुकल्यानंतर पाला कापून काढावा. त्यासाठी पेट्रोलचलित ब्रश कटर चा वापर करावा. अन्यथा तो गोळा करावा. पाला कापल्यानंतर हलकेसे पाणी देऊन आद्रक पिकाची काढणी करावी. गादीवाफ्यावर लागवड असल्यास ट्रॅक्‍टरचलित यंत्राद्वारे आद्रक पिकाची काढणी करता येते. यामुळे इंधन, वेळ आणि मजूर यांची बचत होते. काढणी केल्यानंतर त्यास चिकटलेली माती स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावी आणि योग्य ठिकाणी साठवणूक करावी.

हळद

काढणी

हळद पिकाची काढणी जमिनीत योग्य ओलावा बघून करावी. कंद काढणीपूर्वी राहिलेली पाने जमिनीलगत कापून घ्यावीत. जर हळद पिकाची लागवड सरीवरंबा पद्धतीने केली असल्यास काढणी कुदळीच्या सहाय्याने करावी व लागवड गादीवाफ्यावर केली असल्यास काढणी यंत्राच्या सहाय्याने करावी. काढणी करत असताना गडडयांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. काढणी करताना जेठे गड्डे व हळकुंडे वेगळी करावीत व काढणीनंतर योग्य ठिकाणी साठवणूक करावी.

हरभरा

परिपक्वता ते काढणी अवस्था

काढणीस तयार असलेल्या हरभरा पिकाची काढणी करुन मळणी करुन घ्यावी व मळणी केलेल्या धान्याची योग्य वाळवणूक करुन सुरक्षित ठीकाणी साठवणूक करावी.

जवस

काढणी अवस्था  

काढणीस तयार असलेल्या जवस पिकाची काढणी करुन घ्यावी.

उन्हाळी मका

वाणांची निवड

उन्हाळी मका पिकाची लागवडीसाठी नवज्योत, मांजरा, डीएमएच-१०७, केएच-९४५१, डेक्कन-१०३, १०५ यासारख्या शिफारसीत वाणांची निवड करावी.

बटाटा

परिपक्वता ते काढणी अवस्था

काढणीपूर्वी बटाटा पिकास १० ते १२ दिवस पाणी देणे बंद करावे. त्यामुळे बटाट्याची साल घट्ट होते आणि बटाट्यास चकाकी येते. पाणी बंद केल्यावर झाडे जमिनीलगत बुंध्याजवळ विळयाच्या सहाय्याने कापून घ्यावीत व कापलेली झाडे काढणीपर्यंत त्याच ठिकाणी ठेवावीत. जेणेकरून बटाटे हिरवे पडण्याचे प्रमाण कमी होईल.

मोसंबी

फुलधारणा ते फळधारणा अवस्था

तापमानात किंचित वाढ होत असल्यामुळे मोसंबी बागेमध्ये फुलगळ व फळगळ दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी १ किलो युरिया + २ ग्रॅम एनएए किंवा प्लॅनोफिक्स ३ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच बागेमध्ये गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

डाळिंब

फुलधारणा ते फळधारणा अवस्था

डाळींब बागेत परागीभवन होणे महत्वाचे असते. यामध्ये मधमाश्यांची भुमिका महत्वाची असुन मधमाश्या आकर्षित करण्यासाठी २ किलो गुळ + २-३ लिटर ताक यांचे एकसमान मिश्रण करुन २०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. जेणेकरुन मधमाश्यांचे प्रमाण वाढण्यास मदत होईल.तसेच बागेमध्ये गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.  

भाजीपाला

फुलधारणा ते फळधारणा अवस्था

भाजीपाला पीकास गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. तसेच भाजीपाला पिकात रस शोषण करणाऱ्या किडीच्या व्यवस्थापनासाठी पिवळे व निळे चिकट सापळे (छोट्या आकाराची) एकरी २५ ते ३० या प्रमाणात लावावेत.

तुती रेशीम

वाढीची अवस्था

तुती बागेस गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

पशुसंवर्धन

कमाल तापमानात वाढ होत असल्यामुळे कोंबडयांच्या शेडमधील तापमान ‍नियंत्रित करुन स्वच्छ  पीण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन करावे. तसेच उष्णतेपासून त्रास होऊ नये म्हणून कोंबड्याना खाद्य सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत द्यावे.

इतर

शेतक-यांनी कापुस व तुर पिकांच्या काढणीनंतर रान तयार करुन पाण्याच्या उपलब्धतेनुसार उन्हाळी भाजीपाला पिकांची लागवड करावी.

सद्यस्थितीत चिंच परिपक्तवता ते काढणी अवस्थेत असुन चिंचेचे गुणधर्म पाहता त्यापासुन ‍चिंचेच्या गोळया, चटणी, चिंचेचा काढा, गर, चिंच पावडर, सॉस, पोळी, लोणचे, पेय, सिरप, पाचक गोळया इत्यादी मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात.

सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक १९ ते २३ ऑक्टोंबर २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १५ ते १९ जानेवारी २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला