छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १४ ते १८ मे २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान अंशत:ढगाळ ते ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३७.० ते ३९.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २५.० ते २६.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ५२ ते ६५ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०८ ते १२ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.

सर्तकता : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दिनांक १३ व १४ मे २०२५ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडाकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३०-४० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे.

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक १८ ते २४ मे २०२५ दरम्यान हवामान स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहण्याची शक्यता असुन पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तसेच कमाल तापमान व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

कृषी हवामान सल्ला

उन्हाळी मका

परिपक्वता ते काढणी अवस्था

पुढील दोन दिवस वादळीवा-यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे शेतकरी बांधवांनी काढणीस तयार असलेल्या मका पिकाची काढणी दोन दिवस पुढे ढकलावी तसेच काढणी केलेल्या पीकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

मोसंबी

वाढीची अवस्था

मागील आठवड्यातील ढगाळ वातावरण व तापमानातील चढउतारामुळे मोसंबी बागेत रसशोषन करणा-या किडींच्या प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट ३० टक्के ईसी १३ मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के ३ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत वातावरणात फवारणी करावी. फवारणी शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी करावी.

डाळिंब

वाढीची अवस्था

मृग बहार लवकर घेण्याचे नियोजन असल्यास बाग ताणावर असताना मे महिन्याच्या शेवटी इथेफोन ३९ % एस एल ची फवारणी करून पानगळ करून घ्यावी व नंतर हलकी छाटणी करून घ्यावी. छाटणी करताना पेन्सिल आकाराच्या काड्या शेंड्याकडून १० ते १५ सेमी पर्यंत छाटाव्यात तसेच वाळलेल्या फांद्या छाटाव्यात व बागेत पडलेला काडीकचरा वेचून बाग स्वच्छ ठेवावी.

भाजीपाला

फुलधारणा ते फळधारणा अवस्था

टोमॅटो पिकावरील फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी फिप्रोनील १५ मिली  + करंज तेल २० मिली  प्रति १० लिटर  पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

तुती रेशीम

वाढीची अवस्था

रेशीम किटक संगोपन गृहातील तापमान व आर्द्रता मर्यादित (२२ ते २८ सें.ग्रे.) ठेवावे जेणेकरून कोष उत्पादन चांगले येईल. परंतु ३५ सें.ग्रे. च्या वर तापमान गेल्यास रेशीम किटक पाने खात नाहीत यामुळे उत्पादनात घट होते.

पशुसंवर्धन

दिनांक १३ व १४ मे २०२५ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडाकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन शेतकरी बांधवांनी जनावरांना बाहेर उघडयावर न बांधता सुरक्षित ठिकाणी किंवा गोठयातच बांधावे.

इतर

शेतकरी बांधवानी जमिनीची मशागत समतल किंवा मुख्य उताराला आडवी करावी त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होते.

सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला