छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०६ ते १० डिसेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त
झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान कोरडे व
आकाश स्वच्छ
ते अंशत:ढगाळ राहील. तसेच
कमाल तापमान २८.० ते ३०.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान ११.० ते १४.० अंश
सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४३
ते ६३ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०६ ते ०९ किमी/तास राहण्याची शक्यता
आहे.
विस्तारित
अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. १० ते १६ डिसेंबर २०२५ दरम्यान हवामान कोरडे व आकाश स्वच्छ
राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी तसेच कमाल तापमान व किमान तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी राहण्याची
शक्यता आहे.
कृषि
हवामान सल्ला
पिकांचेनाव
ऊस
फुटवे अवस्था ते कांडे धरणे
तापमानातील चढउतारामुळे ऊस पिकामध्ये खोडकिडीचा
प्रादुर्भाव दिसुन येत असुन, याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरोपायरीफॉस २० ईसी २० ते
२५ मिली किंवा फिप्रोनील ५ एससी ३० मिली
प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन फवारणी करावी. तसेच लागवड करून सहा आठवडे झाले असल्यास ऊस पिकामध्ये
नत्र खताची दुसरी मात्रा १२० किलो प्रति हेक्टर प्रमाणात द्यावी.
कापूस
वेचणी
वेचणीस तयार
असलेल्या कापूस पिकाची वेचणी करून घ्यावी. पहिल्या आणि दुसऱ्या वेचणीचा चांगला व
कवडी कापूस वेगळा साठवावा.
तूर
शेंगा धरणे अवस्था
सध्यस्थितीत वातावरणामध्ये धुकं पडुन तूर
पिकामध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, याच्या
व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट (५ एसजी) ४.४ ग्रॅम किंवा इंडोक्झाकार्ब
(१५.८ इसी) ६.६ मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच तूर
पिकावरील शेंगमाशीच्या व्यवस्थापनासाठी लॅमडा सायहॅलोथ्रीन ५ ईसी ०८ मिली किंवा
ल्युफेनुरॉन ५.४ टक्के १२ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
रब्बी ज्वारी
वाढीची अवस्था
सद्यस्थितीत रब्बी ज्वारी पीकामध्ये रस शोषण
करणाऱ्या किडीचा प्रादूर्भाव होवून चिकटयाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. यासाठी
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निबोळी अर्क १०००० पीपीएम १० मिली किंवा डायमिथोएट २०
मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून
फवारणी करावी.
मका (रब्बी)
वाढीची अवस्था
मका पिकावरील लष्करी अळीच्या सर्वेक्षणासाठी
एकरी ०५ कामगंध सापळे लावावेत. तसेच प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५ टक्के निंबोळी
अर्क किंवा अझाडीरॅक्टीन १५०० पीपीएम ५० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी
करावी.
करडई
वाढीची अवस्था
मागील
आठवडयातील तापमानातील चढउतारामुळे करडई पीकामध्ये रस शोषण करणा-या (काळा मावा) किडीचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता
असुन याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट ३० ईसी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी. तसेच पिवळे चिकट सापळे प्रति हेक्टरी ५० या प्रमाणात
लावावेत.
गहू
वाढीची अवस्था
गहू पीकाची पेरणी करुन २० ते ३० दिवस झालेल्या
फुटवे अवस्थेतील गहू पीकास नत्राचा दुसरा हप्ता ५० किलो याप्रमाणे प्रतिहेक्टरी
दयावा. सद्यस्थितीत गहू पिकामध्ये मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या
व्यवस्थापनासाठी निबोळी अर्क (१०००० पीपीएम) १० मिली किंवा डायमिथोएट २० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कांदा
वाढीची अवस्था
सद्यस्थितीत कांदा पिकामध्ये रस शोषण करणा-या (मावा, तुडतुडे व फुलकिडीं) किडींचा प्रादुर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी ५ टक्के
निंबोळी अर्काची फवारणी करावी तसेच पिवळे व निळे चिकट सापळे (छोट्या आकाराची) एकरी
२५ ते ३० या प्रमाणात लावावेत. तसेच कांदा पिकामध्ये करपा रोगाचा प्रादुर्भाव
दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा डायथेन एम-४५ २५
ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून १० ते १५ दिवसाच्या अंतराने आलटून पालटून
फवारणी करावी
पेरू
काढणी अवस्था
काढणीस तयार असलेल्या
पेरु फळांची काढणी करून प्रतवारी करावी व बाजारपेठेत विक्रीसाठी पाठवावीत.
आंबा
बहार धरणे
सध्यस्थितीत वातावरणामध्ये धुकं पडून आंबा फळबागेत
भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असुन याच्या व्यवस्थापनासाठी प्रोपीओनेट
१० मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच आंबा बागेत फुलधारणा व्यवस्थित होण्यासाठी
१३:००:४५ विद्राव्य खताची १५० ग्रॅम प्रति
१० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
भाजीपाला
फुलधारणा ते फळधारणा
मागील आठवडयातील तापमानातील चढउतारामुळे टोमॅटो
पिकावर लवकर येणार करपा रोगाच्या प्रादुर्भाव दिसून येत आहे याच्या
व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्झीक्लोराईड (५० %
डब्लूपी) २५ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब ( ७५ %
डब्लूपी) २५ ग्रॅम प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पशुसंवर्धन
सद्यस्थितीत तापमानात घट होत असल्यामुळे शेळ्या व
मेंढ्या मध्ये विषाणूजन्य तोंडाचा मावा या रोगाचा प्रादूर्भाव आढळून येत असून
याकरीता १० ग्रॅम बोरिक पावडर २० मिली ग्लिसरीन मध्ये मिसळून तोंडास लावावे. तसेच प्रादुर्भाव झालेल्या शेळ्या व मेंढ्याना
बी-कॉम्प्लेक्स पशुवैद्यांच्या सल्याने द्यावे.
इतर
शेतक-यांनी रब्बी
हंगामातील पीकांना त्यांच्या वाढीच्या
संवेदनशील अवस्थेत गरजेनुसार पाणीव्यवस्थापन करावे, जेणेकरुन ओलाव्यामुळे जमीनीतील
अन्नद्रव्यांचा कार्यक्षम वापर होवून ताण कमी राहिल्याने किडींचे प्रमाण कमी
होण्यास मदत होते व उत्पन्नात लक्षणीय वाढ होते.
सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments
Post a Comment