छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०६ ते १० जून २०२६ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला

 


प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान अंशत:ढगाळ ते ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३९.० ते ४०.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २४.० ते २५.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता २९  ते ६८ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १५ ते २३ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.  

सतर्कता: छत्रपती संभाजीनगर जिल्हयात ०५ व ०६ जून २०२६ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे. 

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. १० ते १६ जून २०२६ दरम्यान आकाश अंशत:ढगाळ ते ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान तसेच कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.

                                                   कृषि हवामान सल्ला

पिकांचेनाव

ऊस

कांडे धरणे

ऊस पिकामध्ये खोडकिडिचा प्रादुर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरॅन्ट्रनिलीप्रोल १८.५ टक्के एस.सी. ३ - ४ मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेत शांत वातावरणात फवारणी करावी. तसेच ऊस पिकास योग्य वेळेच्या अंतराने गरजेनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

कापूस

वाणांची निवड

कापूस लागवडीसाठी जमिनीचा प्रकार, कोरडवाहू किंवा बागायती,लागवडीचा प्रकार व वाणांचे गुणधर्म यानुसार कापुस पिकाच्या लागवडीकरिता आपल्या भागात उत्पनास सरस असलेल्या वाणांची निवड करावी.

का

वाणांची निवड

मका पिकाच्या लागवडीसाठी नवज्योत, मांजरा,डीएमएच-१०७, के एच-९४५१, एमएचएच, प्रभात, करवीर, डेक्कन-१०३ पिनॅकल इत्यादी या सारख्या सुधारित वाणांची निवड करावी.

तूर

वाणांची निवड

तूर पिकाच्या पेरणीसाठी बीडीएन-७११,बीडीएन २०१३-४१(गोदावरी), बीडीएन-७०८, बीएसएमआर-८५३, बीएसएमआर-७३६, बीडीएन-७१६ या सारख्या सुधारित वाणांची निवड करावी.

मूग/उडीद

वाणांची निवड

मूग लागवडीसाठी बीएम -४, कोपरगांव, बीपीएमआर-१४५, बीएम-२००२-१, बीएम-२००३-२, फुलेमुग-२, पीकेव्हीकेएम-४ या वाणांची तर उडीद लागवडीसाठी बिडीयु -१, टीएयु -१, टीपीयु -४ या वाणांची निवड करावी.

सिताफळ

लागवड पूर्व नियोजन

सिताफळाच्या नवीन  लागवडीसाठी ४५ x ४५ x ४५ सेमी आकाराचे खड्डे घेऊन त्यात दिड ते दोन घमेले शेणखत किंवा चांगले कुजलेले कंपोस्ट खत अर्धा किलो सुपर फॉस्फेट व फोलिडोल पावडर व चांगल्या मातीच्या मिश्रणाने ते खडे भरावे.

आंबा

लागवड पूर्व नियोजन

नवीन आंबा रोपे लागवडीसाठी १ x x १ आकाराचे खड्डे घेऊन त्यात अर्धा किलो सुपर फॉस्फेट ५० किलो शेणखत किंवा कंपोस्ट खत व पोयटा माती या सर्व मिश्रणाने खड्डे भरून घ्यावेत.

भाजीपाला

रोपे तयार करणे

खरीप हंगातात भाजीपाला लागवडीसाठी रोपवाटीकेत गादी वाफयावर बियाण्‍याची लागवड करून रोपे तयार करावीत.तसेच काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी सकाळी व सायंकाळच्या वेळेस करावी.  

पशुसंवर्धन

पावसाळा सुरु होण्यापूर्वी जनावरांच्या गोठ्याची दुरुस्ती करून घ्यावी तसेच पावसाळ्यातील प्राणघातक रोग जसे की, घटसर्प, फऱ्या, लाळ्या खुरकूत इत्यादी जीवघेण्या रोगापासून जनावरांच्या बचावासाठी पशुवैद्याच्या सल्ल्याने लसीकरण करून घ्यावे.

इतर

शेतकरी बांधवानी निविष्ठा (बियाणे, खते, कीड व कीटकनाशके) खरेदी करत असताना पिकाचे नाव, जात, गट क्रमांक, बीज परिक्षणाची तारिक, उगवण शक्ती, शुद्धतेचे प्रमाण, निवळ वजन, विक्रेत्याचे नाव व पत्ता तसेच पक्के बिल/ पावती घ्यावी तसेच बिलावर खरेदी केलेल्या तारखेचा उल्लेख असावा.

सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.


Comments