छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १५ ते १९ जुलै २०२६ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला
प्रादेशिक
हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त
झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश अंशतःढगाळ
राहून तुरळक ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल
तापमान ३३.० ते ३५.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २३.० ते २४.० अंश सेल्सिअस
दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ५४ ते ९७ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १७ ते २१ किमी/तास
राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक १९ ते
२५ जुलै २०२६ दरम्यान हवामान अंशतःढगाळ राहून
पर्जन्यमान, कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषी हवामान सल्ला
पिकाचे नाव सोयाबीन
पेरणी ते रोप अवस्था
उगवुन आलेल्या सोयाबीन पिकामध्ये झाडांची संख्या योग्य राखण्यासाठी तुट
भरावी.
खरीप ज्वारी
पेरणी ते रोप अवस्था
उगवुन आलेल्या ज्वारी पिकामध्ये झाडांची संख्या योग्य राखण्यासाठी तुट
भरावी. तसेच ज्वारी पिकाची पेरणी/लागवड झाली नसल्यास पेरणी करून घ्यावी.
बाजरी
पेरणी ते रोप अवस्था
उगवुन आलेल्या बाजरी पिकामध्ये झाडांची संख्या योग्य राखण्यासाठी तुट
भरावी. तसेच बाजरी पिकाची पेरणी/लागवड झाली नसल्यास पेरणी करून घ्यावी.
खरिप भुईमुग
पेरणी ते रोप अवस्था
उगवुन आलेल्या खरीप भुईमुग पिकामध्ये झाडांची संख्या योग्य राखण्यासाठी
तुट भरावी. तसेच खरीप भुईमुग पिकाची लागवड झाली नसल्यास या आठवड्यामध्ये लागवड
करून घ्यावी.
आद्रक
रोप अवस्था
आद्रक पिकामध्ये तण व्यवस्थापन करावे व शेतामध्ये वापस असल्यास बेडला हलकी
भर द्यावी.
हळद
रोप अवस्था
हळद पिकामध्ये तण व्यवस्थापन करावे व शेतामध्ये वापस असल्यास बेडला हलकी
भर द्यावी.
मोसंबी
फळ वाढीची अवस्था
मागील आठवड्यातील पाऊस व ढगाळ वातावरणामुळे मोसंबी बागेमध्ये बुरशीजन्य
रोगांचा प्रादुर्भाव होऊन फळगळ होण्याची शक्यता असते, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय
म्हणुन कार्बेनडेझीम २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात
फवारणी करावी.
डाळिंब
फळ वाढीची अवस्था
मागील आठवड्यातील पाऊस व ढगाळ वातावरणामुळे डाळिंब बागेमध्ये रस शोषण
करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी
सायंट्रानिलिप्रोल १०.२३ टक्के ओ. डी. ७.५ मिली किंवा थायोमिथोक्झाम २५ टक्के
डब्ल्यू जी ०५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
भाजीपाला
फुल ते फळ धारणा अवस्था
मागील आठवड्यातील पाऊस व ढगाळ वातावरणामुळे टोमॅटो पिकावर
नाग अळीच्या प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी
सायनॅन्ट्रीनिलिप्रॉल १०.२६ टक्के ओडी
१८ मिली किंवा थायमिथॉक्झाम २५ टक्के डब्ल्यूपी
४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
तुती रेशीम
पावसाळयात ढगाळ हवामानात रेशीम किटक संगोपन गृहातील आर्द्रता ९५ ते ९९
टक्के पर्यंत राहते. अशा वेळी बाल्य ते प्रौढ किटक संगोपन गृहात अनुक्रमे तापमान
२८ व २६ अंश सें. व आर्द्रता अनुक्रमे ८५
व ६५ टक्क्यांच्या वर गेली तर ग्रासरी व प्लॅक्चरी या रोगांची बाधा किटकांना होते.
त्यामुळे संगोपन गृहात स्वच्छता राखणे. शेडनेटच्या आजुबाजुला व दरवाज्यासमोर ०.३
टक्के चुना + २ टक्के ब्लिचिंग पावडरचे द्रावण करुन शिंपडावे. संगोपन साहित्य ट्रे
स्वच्छता जाळया,आच्छादन जाळया २ टक्के फॉरमॅलीन मध्ये निर्जंतुकीकरण करुन उन्हात
वाळवुन वापरावे.
पशुसंवर्धन
सद्यस्थितीत शेळ्यांच्या प्रवेशद्वाराजवळ तसेच शेडमध्ये चुना टाकावा
जेणेकरून बाहेरून येणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होईल. तसेच शेळ्या
व शेळ्यांची पिले खनिजाच्या अभावामुळे माती चाटतात त्यामुळे त्यांना हगवण सदृष्य
यासारखे आजार होतात ते टाळण्यासाठी शेळ्यांना व पिल्लाना पावसाळ्यातसुद्धा खनिज
मिश्रण किंवा चाटण वीट चालू ठेवावे.
इतर
सर्व शेतकरी बांधवांकरीता त्यांच्या शेतातील पीकांवरील
बुरशींचे तसेच पीकातील खत व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारे जैविक बुरशीनाशके
(बायोमिक्स) व जैविक खते (बायोफर्टीलायझर) निविष्ठा कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथे विक्रीकरीता
उपलब्ध आहेत.
सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments
Post a Comment