छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक २२ ते २६ जुलै २०२६ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला
प्रादेशिक
हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त
झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश ढगाळ
राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल
तापमान ३०.० ते ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २३.० ते २५.० अंश सेल्सिअस
दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ६८ ते ९२ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १६ ते २१ किमी/तास
राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक २६ जुलै
ते ०१ ऑगस्ट २०२६ दरम्यान हवामान ढगाळ राहून
पर्जन्यमान तसेच कमाल तापमान व किमान
तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषी हवामान सल्ला
पिकाचे नाव
सोयाबीन
वाढीची अवस्था
सोयाबीन पिकामध्ये कोळपणी व खुरपणीचे कामे करून घ्यावीत. मजुरांची कमतरता
असल्यास तण नियंत्रणासाठी पीक १५ ते २० दिवसाचे झाले असल्यास इमॅझेथायपर ३५ टक्के
+ इमाझामॉक्स ३५ टक्के डब्ल्यूजी २ ग्रॅम किंवा क्लोमॅझोन ५० % ईसी ३० ते ४० मिली
या तणनाशकांची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघुन फवारणी करावी.
खरीप ज्वारी
वाढीची अवस्था
खरीप ज्वारी पिकामध्ये कोळपणी व तणनियंत्रणाची कामे पावसाची उघाड बघुन
करावीत व खरीप ज्वारी पीकास पेरणीनंतर ३० दिवस झाले असल्यास नत्राचा दुसरा हप्ता
४० किलो प्रति हेक्टरी युरियाव्दारे दयावा.
बाजरी
वाढीची अवस्था
बाजरी पिकामध्ये कोळपणी व
तणनियंत्रणाची कामे पावसाची उघाड बघुन करून घ्यावीत. तसेच
बाजरी पीकास पेरणीनंतर ३० दिवस झाले असल्यास नत्राचा दुसरा हप्ता हलक्या जमिनीत २०
किलो तर भारी जमिनीत ३० किलो प्रति हेक्टरी युरियाव्दारे दयावा.
खरिप भुईमुग
वाढीची अवस्था
मागील आठवड्यातील ढगाळ हवामान असल्यामुळे भुईमूग पिकामध्ये फुलकिडीचा
प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची
स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच खरीप भुईमूग पिकामध्ये कोळपणी व
तणनियंत्रणाचे कामे पावसाची उघाड बघून करुन घ्यावीत.
आद्रक
रोप अवस्था
आद्रक पिकामध्ये तण व्यवस्थापन करावे व बेडला हलकी भर द्यावी. तसेच आद्रक
पिकामध्ये बुरशीजन्य रोगांचा (कंदसड) प्रादुर्भाव टाळण्यासाठी परभणी कृषि
विद्यापीठाने विकसित केलेले बायोमिक्स हे जैविक बुरशीनाशक व कीडनाशकाची ५ लिटर
प्रति एकर प्रमाण २०० लिटर पाण्यात मिसळुन आळवणी करावी.
हळद
रोप अवस्था
पावसाची उघाड बघून हळद पिकामध्ये तण व्यवस्थापन करावे. तसेच हळद पिकामध्ये
माती परीक्षणानुसार अन्नद्रव्यांचा संतुलित व प्रमाणशीर योग्य वेळेस वापर करावा.
माती परीक्षण केलेली नसल्यास ६ आठवडे झालेल्या पिकास नत्राचा शिफारसीत दुसरा हप्ता
शेतात वापसा असताना देऊन बेडला हलकी भर द्यावी.
मोसंबी
फळ वाढीची अवस्था
मागील आठवड्यातील पाऊस व ढगाळ वातावरणामुळे मोसंबी बागेमध्ये बुरशीजन्य
रोगांचा प्रादुर्भाव होऊन फळगळ दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी नॅनो युरिया
४० मिली व कार्बेन्डाझिम १२ टक्के + मॅंकोझेब ६३ टक्के डब्ल्यूपी २० ग्रॅम प्रति
१० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
डाळिंब
फळ वाढीची अवस्था
मागील आठवड्यातील पाऊस व ढगाळ वातावरणामुळे डाळिंब बागेमध्ये रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन
याच्या व्यवस्थापनासाठी सायंट्रानिलिप्रोल १०.२३ टक्के ओ. डी. ७.५ मिली किंवा
थायोमिथोक्झाम २५ टक्के डब्ल्यू जी ०५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन स्वच्छ
वातावरणात फवारणी करावी.
भाजीपाला
फुल ते फळ धारणा अवस्था
मागील आठवड्यातील पाऊस व ढगाळ वातावरणामुळे टोमॅटो पिकावर
नाग अळीच्या प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी
सायनॅन्ट्रीनिलिप्रॉल १०.२६ टक्के ओडी
१८ मिली किंवा थायमिथॉक्झाम २५ टक्के डब्ल्यूपी
४ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
तुती रेशीम
पावसाळयात ढगाळ हवामानात रेशीम किटक संगोपन गृहातील आर्द्रता ९५ ते ९९
टक्के पर्यंत राहते. अशा वेळी बाल्य ते प्रौढ किटक संगोपन गृहात अनुक्रमे तापमान
२८ व २६ अंश सें. व आर्द्रता अनुक्रमे ८५
व ६५ टक्क्यांच्या वर गेली तर ग्रासरी व प्लॅक्चरी या रोगांची बाधा किटकांना होते.
त्यामुळे संगोपन गृहात स्वच्छता राखणे. शेडनेटच्या आजुबाजुला व दरवाज्यासमोर ०.३
टक्के चुना + २ टक्के ब्लिचिंग पावडरचे द्रावण करुन शिंपडावे. संगोपन साहित्य ट्रे
स्वच्छता जाळया,आच्छादन जाळया २ टक्के फॉरमॅलीन मध्ये निर्जंतुकीकरण करुन उन्हात
वाळवुन वापरावे.
पशुसंवर्धन
सद्यस्थितीत शेळ्यांच्या प्रवेशद्वाराजवळ तसेच शेडमध्ये चुना टाकावा
जेणेकरून बाहेरून येणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होईल. तसेच शेळ्या
व शेळ्यांची पिले खनिजाच्या अभावामुळे माती चाटतात त्यामुळे त्यांना हगवण सदृष्य
यासारखे आजार होतात ते टाळण्यासाठी शेळ्यांना व पिल्लाना पावसाळ्यातसुद्धा खनिज
मिश्रण किंवा चाटण वीट चालू ठेवावे.
इतर
सर्व शेतकरी बांधवांकरीता त्यांच्या शेतातील पीकांवरील
बुरशींचे तसेच पीकातील खत व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारे जैविक बुरशीनाशके (बायोमिक्स)
व जैविक खते (बायोफर्टीलायझर) निविष्ठा कृषि विज्ञान केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथे विक्रीकरीता
उपलब्ध आहेत.
सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments
Post a Comment