छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक २५ ते २९ जुलै २०२६ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई
येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात
हवामान ढगाळ राहून तुरळक ठिकाणी
हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २९.० ते ३२.० अंश
सेल्सिअस आणि किमान तापमान २२.० ते २४.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष
आर्द्रता ८४ ते ९५ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १५ ते १९ किमी/तास राहण्याची
शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार
(ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. २९ जुलै ०४ ऑगस्ट २०२६ दरम्यान आकाश ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान, कमाल तापमान व किमान
तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषि
हवामान सल्ला
पिकांचेनाव
ऊस
बेणेप्रक्रिया व लागवड
आडसाली ऊस लागवडीसाठी को-८६०३२, कोएम-०२६५,
व्हीएसआय-८००५ या सुधारित जातीची निवड करावी. तसेच बेणे प्रक्रिया करताना १००
ग्रॅम कार्बेनडेझीम आणि डायमेथोएट ३०० मिली प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून बेणे
१०-१५ मिनिट द्रावणात बुडवावे. रासायनिक प्रक्रिया झाल्यानंतर ऍसिटोबॅक्टर १० किलो
+ स्फुरद विरघळणारे जिवाणू २.५ किलो + १ किलो ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक १००
लिटर पाण्यात द्रावण करून त्यामध्ये १५-२० मिनिटे बेणे बुडवुन ठेवावे व त्यानंतर
लागवड करावी.
कापूस
वाढीची अवस्था
मागील आठवडयातील ढगाळ वातावरणामुळे कापुस
पिकावर रस शोषण करणाऱ्या किडींचा (मावा, फुलकिडे, पांढरी
माशी) प्रादूर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी ८ ते १० पिवळे व निळे
चिकट सापळे प्रति एकर प्रमाणात लावावेत व ५ टक्के निंबोळी अर्काची
फवारणी करावी. तसेच कापुस पिकामध्ये लागवडीच्या वेळी खताची पहिली मात्रा दिली नसल्यास, ६०:६०:६०
किलो नत्र, स्फुरद व पालाश प्रति हेक्टर आळे पद्धतीने
किंवा पेरून द्यावा.
मका
वाढीची अवस्था
मका पिकामध्ये कोळपणी व खुरपणीचे कामे करून
घ्यावीत. मजुरांची कमतरता असल्यास तण नियंत्रणासाठी पीक २५ ते ३० दिवसाचे झाले
असल्यास हॅलोसल्फुरॉन मिथाइल ७५ टक्के डब्ल्यूजी २.४ ग्रॅम किंवा टेम्बोट्रिओन ३४.४ टक्के एससी ५.७ मिली
या तणनाशकांची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघुन फवारणी करावी
तुर
वाढीची अवस्था
तुर पिकामध्ये कोळपणी व खुरपणीचे कामे करून घ्यावीत. मजुरांची कमतरता
असल्यास तण नियंत्रणासाठी पीक २० ते २५ दिवसाचे झाले असल्यास इमॅझीथापर ३५ टक्के
+ इमाझामॉक्स ३५ टक्के २.५ ग्रॅम या
तणनाशकांची प्रति १० लिटर पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघुन फवारणी करावी.
मूग/उडीद
वाढीची अवस्था
मुग/उडीद पिकामध्ये कोळपणी व खुरपणीचे कामे करून घ्यावीत. तसेच मागील ढगाळ वातावरणामुळे
मुग/उडीद पिकावर पाने खाना-या अळींचा प्रादुर्भाव दिसून येत असुन याच्या
व्यवस्थापनासाठी क्विनॉलफॉस २५ ईसी ३० मिली किंवा थायोडिकार्ब ७५ डब्ल्यू. पी. १.५
ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात
पावसाची उघाड बघुन फवारणी करावी.
सिताफळ
कळी अवस्था
सिताफळ बागेत तण व्यवस्थापन करावे. तसेच पिठ्या
ढेकूण किटकावर प्रतिबंधक उपाय करण्यासाठी बागेतील सर्व झाडाच्या जमिनीलगत बुडावर
चिकट बँड किंवा प्लास्टिकच्या टेपचा वापर करावा व प्लास्टिक टॅपवर चिकट वंगण
(ग्रीस) पसरवावे.
भाजीपाला
फुलधारणा ते फळधारणा
मागील आठवड्यातील रिमझिम पाऊस व ढगाळ वातावरणामुळे मिरची पिकावरील रस शोषण करणा-या (फुलकीडे,मावा)
किडींचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी फिप्रोनिल ५ टक्के
एससी २० मिली प्रति १० लिटर पाण्यात
मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
पशुसंवर्धन
शेतकरी बांधवानीं गोठयात होणा-या बाहय व आंतरपरजीवी जंतूचा जसे की, गोचीड, गोमाश्या, मच्छर, डास, चिलटे यांच्या प्रादूर्भावापासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी
गोठयामध्ये भरपूर हवा व सुर्यप्रकाश येईल याची काळची घ्यावी. तसेच गोठयात पडलेले
खड्डे मुरुम व रेतीने भरुन घ्यावेत जेणेकरून गोठ्यात कोरडेपणा टिकून राहील.
इतर
सर्व शेतकरी बांधवांकरीता त्यांच्या शेतातील पीकांवरील
बुरशींचे तसेच पीकातील खत व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारे जैविक बुरशीनाशके
(बायोमिक्स) व जैविक खते (बायोफर्टीलायझर) निविष्ठा कृषि विज्ञान केंद्र, पैठण
रोड, छत्रपती संभाजीनगर येथे विक्रीकरीता उपलब्ध आहेत.
सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments
Post a Comment