छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०८ ते १२ जुलै २०२६ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर
जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या
पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २८.० ते ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान
२३.० ते २४.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ७९ ते ९७ टक्के राहील
तर वाऱ्याचा वेग १७ ते २३ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार
(ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक १२ ते १८ जुलै २०२६ दरम्यान हवामान ढगाळ
राहून पर्जन्यमान, कमाल तापमान व
किमान तापमान सरासरीऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषी हवामान सल्ला
पिकाचे नाव
सोयाबीन
पेरणी व अंतर पिक
सोयबिन पिकाची पेरणी बाकी
असल्यास लवकरात लवकर करून घ्यावी. सोयबिन पिकाची पेरणी १५ जुलै पर्यंत करता येते. तसेच पिकात अंतरपीक म्हणून सोयबिन + तूर
(४:२) याप्रमाणे घेता येते.
खरीप ज्वारी
पेरणी
ज्वारी पिकाची पेरणी बाकी असल्यास
लवकरात लवकर करून घ्यावी.
बाजरी
पेरणी व अंतर पिक
बाजरी पिकाची पेरणी बाकी असल्यास
लवकरात लवकर करून घ्यावी. बाजरी पिकाची पेरणी २० जुलै पर्यंत करता येते. तसेच पिकात अंतरपीक म्हणून बाजरी + तूर
(४:२, २:१ & ३:३ ) याप्रमाणे घेता येते.
खरिप भुईमुग
पेरणी
भुईमुग पिकाची पेरणी बाकी
असल्यास लवकरात लवकर करून घ्यावी.
आद्रक
लागवड
आद्रक पिकाची लागवड बाकी असल्यास लवकरात लवकर करून घ्यावी.
हळद
लागवड
हळद पिकाची लागवड बाकी असल्यास
लवकरात लवकर करून घ्यावी.
मोसंबी
फळ वाढीची अवस्था
मागील आठवड्यातील पाऊस व
ढगाळ वातावरणामुळे मोसंबी बागेमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन फळगळ
होण्याची शक्यता असते, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन कार्बेनडेझीम २० ग्रॅम
प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
डाळिंब
फळ वाढीची अवस्था
मागील आठवड्यातील पाऊस व
ढगाळ वातावरणामुळे डाळिंब बागेमध्ये रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसुन
येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी सायंट्रानिलिप्रोल १०.२३ टक्के ओ. डी. ७.५ मिली
किंवा थायोमिथोक्झाम २५ टक्के डब्ल्यू जी ०५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन
स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
भाजीपाला
वाढीची अवस्था
मागील आठवड्यातील ढगाळ व
दमट वातावरणामुळे मिरची पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या
व्यवस्थापनासाठी कॉपर ऑक्झिक्लोराईड ५० टक्के
३० ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.
तुती रेशीम
पावसाळयात ढगाळ हवामानात
रेशीम किटक संगोपन गृहातील आर्द्रता ९५ ते ९९ टक्के पर्यंत राहते. अशा वेळी बाल्य
ते प्रौढ किटक संगोपन गृहात अनुक्रमे तापमान २८
व २६ अंश सें. व आर्द्रता अनुक्रमे ८५ व ६५ टक्क्यांच्या वर गेली तर ग्रासरी
व प्लॅक्चरी या रोगांची बाधा किटकांना होते. त्यामुळे संगोपन गृहात स्वच्छता
राखणे. शेडनेटच्या आजुबाजुला व दरवाज्यासमोर ०.३ टक्के चुना + २ टक्के ब्लिचिंग
पावडरचे द्रावण करुन शिंपडावे. संगोपन साहित्य ट्रे स्वच्छता जाळया,आच्छादन जाळया
२ टक्के फॉरमॅलीन मध्ये निर्जंतुकीकरण करुन उन्हात वाळवुन वापरावे.
पशुसंवर्धन
सध्यस्थितीत कुक्कुटपालन
करणाऱ्या शेतकऱ्यांनी शेडमध्ये नवीन भुसा टाकून घ्यावा. तसेच शेडमध्ये ओलावा
राहणार नाही याची काळजी घ्यावी. त्याचप्रमाणे शेडच्या भोवताली चुना टाकून घ्यावा
जेणेकरून रोगांचा प्रादुर्भाव टाळता येईल.
इतर
सर्व शेतकरी बांधवांकरीता त्यांच्या
शेतातील पीकांवरील बुरशींचे तसेच पीकातील खत व्यवस्थापनासाठी आवश्यक असणारे जैविक
बुरशीनाशके (बायोमिक्स) व जैविक खते (बायोफर्टीलायझर) निविष्ठा कृषि विज्ञान
केंद्र, पैठण रोड, छत्रपती संभाजीनगर येथे विक्रीकरीता
उपलब्ध आहेत.
सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments
Post a Comment