छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ११ ते १५ जुलै २०२६ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला

 


प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान अंशतःढगाळ ते ढगाळ राहून तुरळक ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३२.० ते ३३.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २३.० ते २४.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ६३  ते ८९ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १६  ते २२ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.  

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. १५ ते २१ जुलै २०२६ दरम्यान आकाश अंशतःढगाळ ते ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान, कमाल तापमान व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.

कृषि हवामान सल्ला

पिकांचेनाव

ऊस

बेणेप्रक्रिया व लागवड

आडसाली ऊस लागवडीसाठी को-८६०३२, कोएम-०२६५, व्हीएसआय-८००५ या सुधारित जातीची निवड करावी. तसेच बेणे प्रक्रिया करताना १०० ग्रॅम कार्बेनडेझीम आणि डायमेथोएट ३०० मिली प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून बेणे १०-१५ मिनिट द्रावणात बुडवावे. रासायनिक प्रक्रिया झाल्यानंतर ऍसिटोबॅक्टर १० किलो + स्फुरद विरघळणारे जिवाणू २.५ किलो + १ किलो ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक १०० लिटर पाण्यात द्रावण करून त्यामध्ये १५-२० मिनिटे बेणे बुडवुन ठेवावे व त्यानंतर लागवड करावी. 

कापूस

लागवड  व आंतर पीके

कापूस पिकाची लागवड बाकी असल्यास लवकरात लवकर करून घ्यावी. तसेच कापूस पिकामद्ये कापूस + तूर (४ : १ ६:१ किंवा ६ :२,८:२),कापूस + सोयाबीन (१:१), ही आंतरपीक पध्दती घेतल्यास फायदेशीर ठरते.

का

पेरणी  व बीजप्रक्रिया 

मका पिकाच्या लागवडीसाठी १५ किलो प्रती हेक्टर बियाणे वापरावे व लागवडीतील अंतर ६०X ३० ठेवावे. पेरणी/लागवडपूर्वी ट्रायकोडर्मा ०५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावावे. तसेच सायन्ट्रीनिलीप्रोल + थायोमिथॉक्झाम १९.८० टक्के ४.० मिली प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावे. बीजपक्रियेनंतर बियाणे सावलीमध्‍ये वाळवून जमीनीमध्ये पेरणीयोग्य ओलावा असताना लागवड/पेरणी करावी. पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी पेरणीच्या वेळी हेक्टरी ७५ किलो नत्र ७५ किलो स्फुरद व ७५ किलो पालाश दयावे. मका पिकाची लागवड झाल्याबरोबर त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी ऊगवणीपूर्व तणनाशक (अट्राझिन ५० डब्ल्यू पी) १.५ किलो प्रति हेक्टर ७५० ते १००० लिटर पाण्यात मिसळून हातपंपाने फवारणी केल्यास तणव्यवस्थापन होते. तूर

लागवड  व आंतर पीके

तूर पिकाची पेरणी बाकी असल्यास लवकरात लवकर करून घ्यावी. तसेच तुरीचे उत्पादन वाढविण्यासाठी व जमिनीची आरोग्य राखण्यासाठी तुर + बाजरी (२:४), तुर + सोयाबीन (१:२ किंवा २:४) असे ओळीचे प्रमाण ठेवून आंतरपीक पध्दतीणे पेरणी करावी.

मूग/उडीद

वाढीची अवस्था

 मुग/उडीद पिकातील तण व्यवस्थापनाची कामे करावीत.

सिताफळ

कळी अवस्था

सिताफळ बागेत तण व्यवस्थापन करावे. तसेच पिठ्या ढेकूण किटकावर प्रतिबंधक उपाय करण्यासाठी बागेतील सर्व झाडाच्या जमिनीलगत बुडावर चिकट बँड किंवा प्लास्टिकच्या टेपचा वापर करावा व प्लास्टिक टॅपवर चिकट वंगण (ग्रीस) पसरवावे. 

भाजीपाला

पुर्नलागवड

टोमॅटोची रोपे लावताना टोमॅटो पिकाच्या बाजूने ने व टोमॅटोच्या १६ ओळींनंतर एक ओळ झेंडूची लावावी त्यामुळे फळ पोखरणारी अळी झेंडूकडे आकर्षित होऊन पिकाचे रक्षण होते.

पशुसंवर्धन

शेतकरी बांधवानीं गोठयात होणा-या बाहय व आंतरपरजीवी जंतूचा जसे की, गोचीड, गोमाश्या, मच्छर, डास, चिलटे यांच्या प्रादूर्भावापासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी गोठयामध्ये भरपूर हवा व सुर्यप्रकाश येईल याची काळची घ्यावी. तसेच गोठयात पडलेले खड्डे मुरुम व रेतीने भरुन घ्यावेत जेणेकरून गोठ्यात कोरडेपणा टिकून राहील.

इतर

आगामी काळातील पिकांवरील किड व किटकांच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी लागणारे निंबोळी अर्क तयार करण्यासाठी शेतकरी बांधवानी कडुलिंबाच्या निंबोळयांची साल व गर काढुन त्याच्या बिया वाळवुन, सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवाव्यात.

सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ जुन २०२६ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला