छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १७ ते २१ ऑक्टोबर २०२६ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई
येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात
हवामान कोरडे व अंशतःढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३३.० ते ३५.०
अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २०.० ते २२.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष
आर्द्रता ३६ ते ५६ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ३ ते ६ किमी/तास राहण्याची शक्यता
आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. २१ ते २७ ऑक्टोबर २०२६ दरम्यान आकाश स्वच्छ ते अंशतःढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषि हवामान सल्ला
पिकांचेनाव
ऊस
कांडे अवस्था
ऊस पिकामध्ये लोकरी मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून
येत असून याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस (२० टक्के इ.सी.) १० ते १५ मिली किंवा ॲसिफेट २०
ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच पिकास उपलब्धतेनुसार पाणी व्यवस्थापन
करावे.
कापूस
बोंड धरणे ते वेचणी
वेचणीस तयार असलेल्या कापुस पिकात वेचणी करून
घ्यावी. मागील काही दिवसातील तापमानातील
चढ उतारामुळे कापुस पिकाची पाने लालसर दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी
डीएपी २०० ग्रॅम + मॅग्नेशियम सल्फेट १०० ग्रॅम किंवा पोटॅशिअम नायट्रेट १०० ग्रॅम
प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
तुर
फांद्या लागणे
तुर पिकास उपलब्धतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. तसेच
तुर पिकामध्ये अंतरमशागतीचे कामे करून घ्यावीत.
रब्बी ज्वारी
बीजप्रक्रिया ते पेरणी
पाण्याच्या उपलब्धतेनुसार व सिंचनाची व्यवस्था असल्यास
ज्वारी पिकाची पेरणी करावी. रब्बी ज्वारी पेरणीसाठी १० किलो प्रती हेक्टर बियाणे
घ्यावे.तसेच पेरणीचे अंतर ४५ x १५ सेंमी ठेवावे व पेरणीपूर्वी ३०० मेस गंधक ०४
ग्रॅम आणि इमेडाक्लोप्राइड ४ मिलि प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीज प्रक्रिया
करावी त्यानंतर अझॅटोबॅक्टर + पीएसबी २५ मिलि प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीज
प्रक्रिया करावी. उतार जमीनीत ज्वारी पीकाची पेरणी उतारास आडवी करावी.
कोरडवाहूसाठी ४०: २०:२० याप्रमाणे नत्र स्फुरद
व पालाश संपूर्ण खतमात्रा पेरणीच्या वेळेस दयावी.
मका (रब्बी)
बिजप्रक्रिया व पेरणी
पाण्याच्या उपलब्धतेनुसार व सिंचनाची व्यवस्था असल्यास
मका पिकाची पेरणी करावी. मका पिकाच्या पेरणीसाठी १५ किलो प्रती हेक्टर बियाणे
वापरावे व ६० x
३० से.मी.
ओळीतील अंतर ठेवुन पिकाची पेरणी करावी. पेरणी/लागवडपूर्वी सायएन्ट्रीनिलीप्रोल + थायोमिथॉक्झाम १९.८० टक्के ४.० मिली
प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया
करावी यामुळे लष्करी अळीचे व्यवस्थापन होते व नंतर २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाण्यास अॅझोटोबॅक्टर आणि
पीएसबी या जिवाणू संवर्धकाची बिजप्रक्रीया करावी तसेच ट्रायकोडर्मा ५.० ग्रॅम
प्रति किलो बियाण्यास लावावे त्यानंतर बीयाणे सावलीमध्ये वाळवून पेरणी करावी.मका
पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी पेरणीच्या वेळी हेक्टरी ७५ किलो नत्र ७५ किलो स्फुरद व ७५ किलो पालाश
दयावे.
करडई
बीजप्रक्रिया ते पेरणी
जमिनीत ओलावा बघून व पाण्याच्या उपलब्धतेनुसार व सिंचनाची
व्यवस्था असल्यास करडई पिकाची पेरणी करावी करडई पिकाच्या पेरणीसाठी १२-१५ किलो
प्रती हेक्टर बियाणे वापरावे व ४५ x २० किंवा ३० x १० जमीनिच्या प्रकारानुसार ओळीतील अंतर ठेवुन करडई
पिकाची पेरणी करावी. पेरणीपूर्वी बियाण्यास थायरम ४ ग्रॅम प्रती किलो किंवा
कार्बेन्डॅझिम २ ग्रॅम प्रती किलो
बियाणे याप्रमाणात बिजप्रक्रीया करावी त्यानंतर अँझोटोबॅक्टर अथवा ॲझोस्पीरीलम
+ पीएसबी २० ते २५ मिलि प्रती किलो बियाणे याप्रमाणात बीज प्रक्रिया करावी. कोरडवाहूसाठी २०: २०: ०० याप्रमाणे नत्र, स्फुरद
व पालाश संपूर्ण खतमात्रा पेरणीच्या वेळेस दयावी.
कांदा
रोपवाटीका तयार करणे
पाण्याच्या उपलब्धतेनुसार व सिंचनाची व्यवस्था असल्यास
कांदयाची रोपे तयार करण्यासाठी गादी वाफे १ मी रुंद, ३ मी लांब आणि १५ सेमी उंच तयार करावा. वाफयाच्या रुंदीशी समांतर अशा
५ सेमी बोटाने रेषा पाडाव्यात आणि यामध्ये बियाणे ओळीत पातळ पेरुन नंतर मातीने
झाकुन टाकावे. कांदा लागवडीसाठी ॲग्रीफाउंड डार्क
रेड, ॲग्रीफाउंड लाईट रेड, भिमा रेड, भिमा किरण (लाल
कांदा) आणि भिमा स्वेत, भिमा सफेद (पांढरा कांदा) या वाणांचा वापर करावा.
सिताफळ
फळवाढीची अवस्था
सीताफळ बागेतील तण व्यवस्थापन करावे. तसेच
पाण्याच्या उपलब्धते नुसार पाणी
व्यवस्थापन करावे.
भाजीपाला
फळधारणा ते फळवाढीची अवस्था
भाजीपाला पिकात रस शोषण करणाऱ्या किडीच्या
व्यवस्थापनासाठी पिवळे व निळे चिकट सापळे (छोट्या आकाराची) एकरी २५ ते ३० या
प्रमाणात लावावेत. तसेच नवीन लागवड केलेल्या भाजीपाला पिकामध्ये तणनियंत्रणाची
कामे करून पाणी व्यवस्थापन करावे.
पशुसंवर्धन
सध्यस्थितीत शेळ्यांमध्ये जुलाब/हगवण लागल्याचे
दिसत असुन याच्या व्यवस्थापनासाठी २ चमचे ग्लुकोज, २ चमचे मीठ, २ चमचे
खाण्याचा सोडा, २ चमचे लिंबाचा रस २ लिटर पाण्यामध्ये मिसळून
द्रावण तयार करून आजारी शेळ्यांना पाजावे.
इतर
सद्यस्थितीत वातावरणातील
तापमानवाढीमुळे फळपिकांवर पाण्याचा अतिरिक्त ताण येण्याची शक्यता असल्यामुळे
शेतकरी बांधवांनी फळबागामध्ये झाडाचा पालापाचोळा झाडाच्या बुडाला टाकावा तसेच झाडांच्या
फांद्याची हलकी छाटणी करावी व झाडांवरील फळे काढून मार्केटमध्ये विक्रीस पाठवावीत.
जेणेकरुन फळबागातील बाष्पीभवनाचा वेग कमी होवून पीकांवरील अतिरिक्त पाण्याचा ताण
कमी होईल.
सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments
Post a Comment