Posts

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक १७ ते २१ जानेवारी २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

  प्रादेशिक हवामान केंद्र , मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश स्वच्छ ते अंशतःढगाळ राहील. तसेच कमाल तापमान २८ ते ३० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान ९.० ते ११.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता २४ ते ७२ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०६ ते १० किमी/तास राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात पुढील दोन दिवस किमान तापमानात घट होऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. २१ ते २७ जानेवारी २०२४ दरम्यान आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहून पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरी पेक्षा कमी व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषी हवामान सल्ला आद्रक परिपक्वता ते काढणी आद्रक पिकाची काढणी करत असताना ७० ते ८० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पाने सुकल्यानंतर पाला कापून काढावा. त्यासाठी पेट्रोलचलित "ब्रश कटर ' चा वापर करावा. अन्यथा तो गोळा करावा. पाला कापल्यानंतर हलकेसे पाणी देऊन आद्रक पिकाची काढणी करावी. गादीवाफ्यावर लागवड असल्यास ट्रॅक्‍टरचलित यंत्र...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक १३ ते १७ जानेवारी २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवमान कोरडे व स्वच्छ राहील. तसेच कमाल तापमान २९.० ते ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १३.० ते १६.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ३३ ते ६९ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०७ ते १० किमी/ता६ राहण्याची शक्यता आहे.   विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक १७ ते २३ जानेवारी २०२४ दरम्यान हवामान कोरडे व स्वच्छ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरी ऐवढे व कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरी ऐवढे शक्यता आहे. कृषि हवामान सल्ला ऊस खोडवा व्यवस्थापन खोडवा व्यवस्थापन : शेतक-यांनी ऊस पाचट न जाळता,पाचट एक आड एक सरीत जमा करावे. पाचट जमा करतांना पट्टा पध्दतीत पाचटाचे आच्छादन करावे किंवा कुटी यंत्राच्या साह्याने पाचटाचे कुटी करावी त्यानंतर पाचटावर पाचट कुजविणारे जिवाणू १० किलो + शेणखत + युरिया ८० किलो + सुपर फॉस्फेट १०० किलो प्रति हेक्टर मिसळून टाकावे व बगला फोडाव्यात. तसेच बुडखे जमीनीलगत छाटावे व छाटलेल्या ...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक १० ते १४ जानेवारी २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश स्वच्छ ते ढगाळ राहून दि. १० व ११ जानेवारी २०२४ रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २७.० व ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १५.० ते १६.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ३० ते ६३ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०८ ते १० कि मी/तास राहण्याची शक्यता आहे.     विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. १४ ते २० जानेवारी दरम्यान आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहून पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरी पेक्षा कमी व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषी हवामान सल्ला आद्रक परिपक्वता ते काढणी काढणीस तयार असलेल्या आद्रक पिकास काढणीपूर्वी १५ दिवस पाणी देणे बंद करावे.  हळद परिपक्वता ते काढणी काढणीस तयार असलेल्या हळद पिकास काढणीपूर्वी १५ दिवस पाणी देणे बंद करावे.  हरभरा फांदया ते फुलोरा अवस्था   मागील आठवड्यातील ढगाळ हव...

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक ०६ ते १० जानेवारी २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

  प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश अंशत:ढगाळ राहून तुरळक ठिकाणी अतिशय हलक्या ते हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २९.० ते ३०.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १५.० ते १७.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४७ ते ९७ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०९ ते १२ किमी/ता६ राहण्याची शक्यता आहे.   विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक १०  ते १६ जानेवारी २०२४ दरम्यान आकाश अंशत:ढगाळ ते ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी व कमाल तापमान मध्यम प्रमाणात सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरी ऐवढे शक्यता आहे. कृषि हवामान सल्ला ऊस फुटवे अवस्था ते कांडे धरणे मागील आठवड्यातील तापमानातील चढउतारामुळे ऊस पिकामध्ये लोकरी माव्याचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी डायमिथोएट ३० टक्के १५ मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के ३० मिली किंवा क्लोरोपायरीफॉस २० टक्के ३० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी कराव...