छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक ११ ते १५ सप्टेंबर २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान ढगाळ राहून तुरळक ठीकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३०.० ते ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २१.० ते २२.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ७० ते ८५ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १९ ते २२ किमी/तास राहण्याची शक्यता आहे. सतर्कता: छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. १० व ११ सप्टेंबर २०२४ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे. विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. १६ ते २२ सप्टेंबर २०२४ दरम्यान आकाश अंशत:ढगाळ ते ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच पर्जन्यमान सरासरी ऐवढे, कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी तर किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे. कृषी हवामान सल्ला सोयाबीन शेंगा लागणे ते दाणे भरणे अवस्था मागील आठवड्यातील पाऊस व ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकामध्ये शेंगा कर...