छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक ०७ ते ११ सप्टेंबर २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २९.० ते ३१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २१.० ते २२.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ५८ ते ८७ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १८ ते २३ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
सतर्कता: छत्रपती
संभाजीनगर जिल्हयात दि. ०७ सप्टेंबर २०२४ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या
कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती
संभाजीनगर जिल्हयात दिनांक १२ ते १८ सप्टेंबर २०२४ दरम्यान हवामान अंशतःढगाळ ते ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान
सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरी ऐवढे
राहण्याची शक्यता आहे.
पिकांचेनाव
अवस्था
कृषि
हवामान सल्ला
ऊस
वाढीची अवस्था
मागील
आठवड्यात झालेल्या पावसामुळे ऊस पिकामध्ये अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा
करावा.
कापूस
पाते लागणे ते बोंड धरणे
कापुस
पिकातील अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा करावा. तसेच मागील आठवड्यामध्ये
झालेल्या पावसामुळे शेतात पाणी साचून बऱ्याच ठिकाणी कापूस पिकात आकस्मित मर दिसून
येत असून याच्या व्यवस्थापनासाठी युरिया २०० ग्रॅम + म्युरेट ऑफ पोटॅश १०० ग्रॅम +
कॉपर ऑक्सीक्लोराईड २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून तयार द्रावणाची प्रति
झाड १५० मिली प्रमाणात आळवणी करावी किंवा परभणी कृषी
विद्यापीठ निर्मित बायोमिक्स या जैविक बुरशीची ४ लिटर/किलो प्रती एकर या प्रमाणे
पाण्यात मिसळून आळवणी करावी. तसेच आळवणी केल्यानंतर सुकत असलेल्या झाडाजवळची माती
पायाने दाबून घ्यावी.
मका
कणसे धरणे
मागील
आठवड्यात झालेल्या पावसामुळे मका पिकामध्ये अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा
करावा. तसेच मागील आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे मका पिकामध्ये लष्करी अळीचा
प्रादुर्भाव दिसून येत असून सध्यस्थितीत मका पिकाची वाढ झालेली असल्यामुळे
व्यवस्थापनासाठी रासायनिक फवारणी करण्याऐवजी जैविक पध्दतीने किडव्यवस्थापन
करण्याकरीता मेटारायझियम ऍनिसोपली ५० ग्रॅम किंवा नोमुरीया रिलाई ५० ग्रॅम प्रति
१० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
तूर
फांद्या लागणे अवस्था
मागील
आठवड्यात झालेल्या पावसामुळे तूर पिकामध्ये अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा
करावा. तसेच तुर पिकामध्ये मर व करपा (फायटोप्थोरा ब्लाईट) रोगाचा प्रादुर्भाव
दिसुन येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी युरिया २०० ग्रॅम + म्युरेट ऑफ पोटॅश
१०० ग्रॅम + कॉपर ऑक्सीक्लोराईड २५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून तयार
द्रावणाची प्रति झाड १०० मिली प्रमाणात आळवणी करावी किंवा परभणी कृषी विद्यापीठ
निर्मित बायोमिक्स या जैविक बुरशीची ४ लिटर/किलो प्रती एकर या प्रमाणे पाण्यात
मिसळून आळवणी करावी.
मूग/उडीद
परिपक्वता ते काढणी अवस्था
पावसाची
उघाड बघून काढणीस तयार असलेल्या मुग/उडीद पीकाची काढणी करावी. तसेच काढणी केलेल्या
शेंगा कोरडया व सुरक्षित ठिकाणी वाळविण्यासाठी टाकाव्यात.
सिताफळ
फळ वाढीची अवस्था
मागील
आठवड्यात झालेल्या पावसामुळे सिताफळ बागेमध्ये अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा निचरा
करावा.
भाजीपाला
फुलधारणा ते फळधारणा
मागील
आठवड्यात झालेल्या पावसामुळे भाजीपाला पिक्कामध्ये अतिरिक्त साचलेल्या पाण्याचा
निचरा करावा. तसेच काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करावी.
पशुसंवर्धन
सद्यस्थितीत
सूक्ष्म जंतू व परोपजीवींच्या वाढीमुळे जनावरांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी
झालेली असते. त्यामुळे शेतकरी बांधवांनी आपल्या पशुधनास रोगप्रतिकारक लसीकरण
पशुवैद्यकांच्या सल्लयाने करुन घ्यावे. तसेच जनावरांना वास असलेला, बुरशीयुक्त
चारा खाण्यास देऊ नये.
इतर
पुढील
दोन दिवस जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता असून शेतकरी बांधवांनी शेतात पाणी
साचणार नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था
करावी.
Comments
Post a Comment