औरंगाबाद जिल्ह्याकरिता दिनांक ०७ ते ११ जुन २०२३ साठी हवामान अंदाज व कृषिसल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार औरंगाबाद जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश अंशत:ढगाळ ते ढगाळ राहून दि. ०९ जून २०२३ वगळता इतर दिवशी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३९.० ते ४२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२.० ते २३.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४९ ते ९१ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १७ ते २० किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
सर्तकता : औरंगाबाद जिल्हयात दि. १० जुन २०२३ रोजी तुरळक ठिकाणी
वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता
असुन वा-याचा वेग (३० ते ४० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) औरंगाबाद
जिल्हयात दि. ११ ते १७ जून २०२३ दरम्यान आकाश स्वच्छ ते अंशतः ढगाळ राहून
पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी तर कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक व किमान तापमान सरासरी
ऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषी हवामान सल्ला
सोयाबीन
वाणांची निवड
सोयाबीन
पिकाच्या पेरणीसाठी, एमएयुएस-१५८, एमएयुएस-१६२, जेएस-३३५, एमएयुएस-७१, एमएयुएस-८१ तर भारी जमीन
व सिंचनाची सोय असल्यास एमएयुएस-६१, एमएयुएस-६१२ यासारख्या
अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित वाणांची निवड करावी.
खरीप ज्वारी
वाणांची निवड
खरीप
ज्वारी पिकाच्या पेरणीसाठी, परभणी-शक्ती, एसपीव्ही-९६०, सीएसएच-२५, परभणी- श्वेता, पीव्हीके-८०९, पीव्हीके-८०१ यासारख्या
अधिक उत्पादन देणाऱ्या सुधारित वाणांची निवड करावी.
बाजरी
वाणांची निवड
बाजरी
पिकाच्या लागवडीसाठी, धनशक्ती, परभणी संपदा, एएचबी-१२००, एएचबी -१२६९, आयसीटीपी, श्रद्धा आणि सबुरी यासारख्या सुधारित वाणांची
निवड करावी.
आद्रक
वाणांची निवड
आद्रक पिकाच्या लागवडीसाठी, माहिम, रिओ दि जानिरो, सुरुची, सुप्रभा या सुधारित वाणांची निवड करावी.
हळद
वाणांची निवड
हळद पिकाच्या लागवडीसाठी, सेलम, कृष्णा, राजापुरी, वायगाव, टेकून आणि पेंटा
यासारख्या सुधारित वाणांची निवड करावी.
मोसंबी
जातीची निवड/ वाढीची अवस्था
वनामकृवि, परभणी
विद्यापीठाने शिफारशीत केलेल्या नवीन मोसंबी बाग
लागवडीसाठी न्यूसेलर, सालगुडी, काटोल गोल्ड तर लिंबू बाग लागवडीसाठी साई सरबती, प्रमालिनी, पीकेएम-१ या वाणांची
निवड करावी. जुन्या बागेत आंतरमशागतीची कामे पुर्ण करुन घ्यावीत. बोर्डो पेस्ट लावला नसल्यास लावून घ्यावा तसेच लिंबूवर्गीय झाडाला
बांबूच्या साहाय्याने आधार द्यावा.
डाळिंब
जातीची
निवड/ वाढीची अवस्था
डाळिंब
पिकाच्या नवीन लागवडीसाठी वनामकृवि, परभणी विद्यापीठाने
शिफारशीत केलेल्या भगवा, फुले भगवा सुपर, गणेश, फुले आरक्ता इत्यादी वाणांची निवड करावी.
जुन्या बागेत आंतरमशागतीची कामे पुर्ण करुन घ्यावीत.
भाजीपाला
जातीची
निवड
मिरची पिकाच्या
लागवडीसाठी परभणी तेजस, पुसा, ज्वाला, अग्नीरेखा, फुले ज्योती, जी-४, जी-३ इत्यादी जातींची तर टोमॅटो पिकाच्या
लागवडीसाठी देवगिरी, परभणी यशश्री, एटीएच-१, पुसारुबी, धनश्री, भाग्यश्री, अर्कारक्षक इत्यादी जातींची निवड करावी.
तुती रेशीम
लागवड पुर्व तयारी
उन्हाळ्यात शक्यतो पट्टा
पद्धत तुती लागवडीत शेंद्रीय पदार्थाचे किंवा पॉलिथिन आच्छादनाचा वापर करावा.
शेंद्रीय आच्छादनात गवत, काडीकचरा पिकांचे अवशेष, झाडांची
पाने, उसाची
पाचट इत्यादी किंवा साखर कारखान्यातील मळी याचा वापर करावा. पट्टा पद्धत तुती
लागवडीत एकास आड एक पट्यात २ x २.५ x १.५ फूट आकाराची चर करून त्यात वरील शेंद्रीय
पदार्थ भरावेत.
पशुसंवर्धन
पावसाळ्यातील प्राणघातक
रोग जसे कि, घटसर्प, फऱ्या, लाळ्या
खुरकूत इत्यादी जीवघेण्या रोगापासून जनावरांच्या बचावासाठी पशुवैद्याच्या
सल्ल्याने लसीकरण करून घ्यावे.
इतर
शेतकरी बांधवानी खरीप
हंगामातील पीकांच्या लागवडीकरीता पुर्वमशागतीची कामे करुन घ्यावीत.
Comments
Post a Comment