औरंगाबाद जिल्ह्याकरिता दिनांक १५ ते १९ जुलै २०२३ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार औरंगाबाद जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३०.० ते ३४.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २०.० ते २२.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ६५ ते ८२ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग २१ ते २७ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
सर्तकता :
औरंगाबाद जिल्हयात दि. १४ व १५ जुलै २०२३ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) औरंगाबाद
जिल्हयात दिनांक १९ ते २५ जुलै २०२३ दरम्यान आकाश अंशत:ढगाळ ते ढगाळ राहील. तसेच
पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान सरासरी पेक्षा कमी व किमान तापमान
सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषि
हवामान सल्ला
ऊस
बेणेप्रक्रिया व लागवड
आडसाली ऊस
लागवडीसाठी पूर्वमशागतीचे कामे पूर्ण करूंन रान बांधणी व आखणी करून घ्यावी. आडसाली
ऊस लागवडीसाठी को-८६०३२, कोएम-०२६५,व्हीएसआय-८००५ या सुधारित
जातीची निवड करावी. तसेच बेणे प्रक्रिया करताना १०० ग्रॅम कार्बेनडेझीम आणि
डायमेथोएट ३०० मिली प्रति १०० लिटर पाण्यात मिसळून बेणे १०-१५ मिनिट द्रावणात
बुडवावे. रासायनिक प्रक्रिया झाल्यानंतर ऍसिटोबॅक्टर १० किलो + स्फुरद विरघळणारे
जिवाणू २.५ किलो + १ किलो ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक १०० लिटर पाण्यात द्रावण
करून त्यामध्ये १५-२० मिनिटे बेणे बुडवुन ठेवावे व त्यानंतर लागवड करावी.
कापूस
लागवड ते रोप अवस्था
कापुस
पिकाची लागवड झाली नसल्यास लवकरात लवकर करून घ्यावी. तसेच उगवून आलेल्या कापुस
पिकामध्ये झाडांची संख्या योग्य राखण्यासाठी तुट भरावी.
मका
लागवड ते रोप अवस्था
मका पिकाची
पेरणी/लागवड झाली नसल्यास लवकरात लवकर करून घ्यावी. तसेच उगवून आलेल्या मका पिकामध्ये झाडांची संख्या योग्य राखण्यासाठी
तुट भरावी व दाटवा झाला असल्यास विरळणी करावी.
तुर
लागवड ते रोप अवस्था
तुर पिकाची
पेरणी/लागवड झाली नसल्यास लवकरात लवकर करून घ्यावी. तसेच उगवून आलेल्या तुर
पिकामध्ये झाडांची संख्या योग्य राखण्यासाठी तुट भरावी व दाटवा झाला असल्यास
विरळणी करावी.
मूग/उडीद
रोप अवस्था
उगवून
आलेल्या मुग/उडीद पिकामध्ये झाडांची संख्या योग्य राखण्यासाठी दाटवा झाला असल्यास
विरळणी करावी.
सिताफळ
वाढीची अवस्था
सिताफळ
बागेतील तण व्यवस्थापनाचे कामे शेतात वापसा असताना करून घ्यावी.
आंबा
वाढीची अवस्था
आंबा
बागेतील तण व्यवस्थापनाचे कामे शेतात वापसा असताना करून घ्यावी.
भाजीपाला
फुलधारणा ते फळधारणा
टोमॅटो
पिकावर शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या
व्यवस्थापनासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची
फवारणी करावी जर प्रादुर्भाव जास्त असल्यास सायपरमेथ्रीन १० टक्के ई.सी.०६ मिली
किंवा डेल्टामेथ्रीन २.८ टक्के ई.सी. १० मिली किंवा इमामेक्टिन बेन्झोएट ५ टक्के
एस सी ०३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
पशुसंवर्धन
सध्य
स्थितीत पशुधनास दैनंदिन आहारामध्ये हिरव्या व वाळलेल्या चा-याचे प्रमाण २:१
ठेवावे.
इतर
शेतक-यांनी
पीकांची पेरणी बीज प्रक्रिया करूनच करावी. बीजप्रक्रिया करताना प्रथम बुरशीनाशक
त्यानंतर कीटकनाशक व जैविक खते याप्रमाणे करावी.
Comments
Post a Comment