छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक २५ ते २९ नोव्हेंबर २०२३ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश अंशतः ढगाळ ते ढगाळ राहुन तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २९.० ते ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १४.० ते १८.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४३ ते ८७ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०८ ते १३ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
सर्तकता
: छत्रपती
संभाजीनगर जिल्हयात दि. २५ व २७ नोव्हेंबर २३ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा व
विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम तर दि. २६ नोव्हेंबर २३ रोजी वादळीवारा व
विजेच्या कडकडाट, गारपीटीसह जोरदार स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग
जास्त (३० ते ४० किमी/तास
) राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती
संभाजीनगर जिल्हयात दिनांक २९ नोव्हेंबर ते ०५ डिसेंबर २०२३ दरम्यान आकाश स्वच्छ
ते अंशत:ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान
सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषि
हवामान सल्ला
ऊस
फुटवे अवस्था
नवीन लागवड
केलेल्या ऊस फुटव्यांना मातीची भर द्यावी. जेणेकरुन फुटव्यांची वाढ जोमाने होवून
रासायनिक खते मातीआड होतील. तसेच पिकातील तणांचा बंदोबस्त होण्यास मदत होईल.
कापुस
बोंड धरणे ते वेचणी अवस्था
तुरळक
ठिकाणी वादळीवारा, विजेच्या
कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असुन शेतकरी बांधवानी वेचणीस
तयार असलेल्या कापूस पिकाची वेचणी लवकरत लवकर करून घ्यावी. पहिल्या आणि दुसऱ्या
वेचणीचा चांगला व कवडी कापूस वेगळा साठवावा.
तुर
शेंगा धरणे
तुरळक
ठिकाणी वादळीवारा, विजेच्या
कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असुन शेतकरी बांधवानी तुर पिकांतील
फवारणीचे कामे पुढे ढकलावीत.
रब्बी
ज्वारी
वाढीची
अवस्था
वेळेवर
पेरणी केलेल्या ज्वारी पिकात कोळपणी करून घ्यावी.
करडई
वाढीची
अवस्था
वेळेवर
पेरणी केलेल्या करडई पिकातील तणनियंत्रण व आंतरमशागत करून घ्यावी.
मका
(रब्बी)
वाढीची
अवस्था
तुरळक
ठिकाणी वादळीवारा, विजेच्या
कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असुन शेतकरी बांधवानी खरीप हंगामातील
मका पिकाची कणसाची ढिगारे ताडपत्रीच्या साहाय्याने झाकून ठेवावीत. तसेच वेळेवर
पेरणी केलेल्या मका (रब्बी) पिकातील तणनियंत्रण व
आंतरमशागत करून घ्यावी.
गहू
पेरणी ते वाढीची अवस्था
तुरळक
ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस व दिनांक २६ नोव्हेंबर
रोजी गारपीट होण्याची शक्यता असुन शेतकरी बांधवानी गहू पिकाची पेरणी पुढे ढकलावी.
तसेच वाढीच्या अवस्थेत असलेल्या गहु पिकामध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता
घ्यावी व साचलेल्या पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी.
कांदा
वाढीची अवस्था
तुरळक
ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असुन शेतकरी
बांधवानी कांदा पिकातील फवारणीची कामे पुढे ढकलावीत. तसेच पिकामध्ये पाणी साचणार
नाही याची दक्षता घ्यावी व साचलेल्या पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था करावी.
पेरू
फळ वाढीची अवस्था
तुरळक
ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस व दिनांक २६ नोव्हेंबर
रोजी गारपीट होण्याची शक्यता असुन शेतकरी बांधवानी काढणीस तयार असलेल्या पेरू
फळांची काढणी लवकरात लवकर काढणी करून घ्यावी. तसेच पेरू फळबागेत फळांची जास्त
संख्या असलेल्या फांदयांना बांबूचा आधार दयावा. जेणेकरुन फळांच्या वजनाने झाडांचे
नुकसान होणार नाही.
आंबा
बहार धरणे
तुरळक
ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असुन नवीन
लागवड केलेल्या आंबा रोपांना आधार द्यावा.
भाजीपाला
फुलधारणा ते फळधारणा
तुरळक
ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस व दिनांक २६ नोव्हेंबर
रोजी गारपीट होण्याची शक्यता असुन शेतकरी बांधवानी काढणीस तयार असलेल्या भाजीपाला
पिकाची लवकरात लवकर काढणी करून घ्यावी. तसेच टोमॅटो व मिरची रोपांना दोरी व
काठीच्या साहाय्याने आधार द्यावा.
पशुसंवर्धन
तुरळक
ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असुन सर्व शेतकरी बांधवानी
पाऊस चालू असताना जनावरे बाहेर चरावयास सोडू नये व जनावरांना बाहेर न बांधता गोठ्यात
सुरक्षित ठिकाणी बांधावे.तसेच वादळीवारा व विजेचा कडकडाट चालू असताना
जनावरे झाडाखाली बांधणे टाळावे.
इतर
तुरळक ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस व
दिनांक २६ नोव्हेंबर रोजी गारपीट होण्याची शक्यता असुन शेतकरी बांधवानी काढणीस
तयार असलेल्या भाजीपाला पिके व फळ पिकांची लवकरात लवकर काढणी करून घ्यावी. तसेच
शक्य असल्यास व उपलब्धतेनुसार भाजीपाला पिकामध्ये (टोमॅटो, कांदा)
व द्राक्ष बागेमध्ये हेलनेटचा वापर करावा.
Comments
Post a Comment