छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक १० ते १४ नोव्हेंबर २०२३ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान कोरडे राहून आकाश स्वच्छ ते ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३२.० ते ३३.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १४.० ते १७.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ३१ ते ६१ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १० ते ११ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती
संभाजीनगर जिल्हयात दिनांक १२ ते १८ नोव्हेंबर २०२३ दरम्यान हवामान कोरडे तर आकाश
स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी तर कमाल व किमान
तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषि
हवामान सल्ला
ऊस
बेणे प्रक्रिया व लागवड
पुर्वहंगामी
ऊसाची लागवड करण्यापुर्वी बेणे मॅलॅथीऑन ३०० मिली + बावीस्टीन १०० ग्रॅम
बुरशीनाशके १०० लीटर पाण्याच्या द्रावणात १० ते १५ मिनिटे बुडवून घ्यावे रासायनिक
बेने प्रक्रिया झाल्यावर त्यानंतर ॲसिटोबॅक्टर ५ किलो + स्फुरद विद्राव्य जिवाणू २.५ किलो + ट्रायकोडर्मा १ किलो प्रती
१०० लीटर पाण्याचे द्रावण तयार करुन बेणे प्रक्रिया करावी व नंतर लागवड करावी.
कापुस
बोंड धरणे ते वेचणी अवस्था
कापुस
पीकातील गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी हेक्टरी ५ याप्रमाणात गुलाबी
बोंडअळीचे कामगंध सापळे लावावेत. कापूस पीकातील डोमकळ्या वेचून नष्ट कराव्यात.
प्रादूर्भाव जास्त प्रमाणास दिसून येत असल्यास प्रोफेनोफॉस ५० ईसी ३० मिली किंवा
प्रोफेनोफॉस ४० टक्के + सायपरमेथ्रीन ४ टक्के ईसी १० मिली किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन
५ ईसी ६ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन आलटून पालटून फवारणी करावी. तसेच वेचणीस
तयार असलेल्या कापूस पिकाची वेचणी करून घ्यावी.
तुर
फुलधारणा अवस्था
तुर
पिकामध्ये गरजेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. तसेच तुर पिकावरील शेंगा पोखरणा-या
अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पिक कळी अवस्थेत असताना हेक्टरी पाच कामगंध सापळे
लावावेत व ५ टक्के निंबोळी अर्काची
फवारणी करावी.
रब्बी
ज्वारी
रोप अवस्था
वेळेवर
पेरणी केलेल्या ज्वारी पिकामध्ये पहिली कोळपणी करून घ्यावी.
करडई
पेरणी
बागायती
करडई पिकाची पेरणी १५ नोव्हेंबर पूर्वी करून घ्यावी. करडई पिकामध्ये करडई + जवस ( ३:३ ) हरभरा + करडई, ज्वारी + करडई (
४:२ ) हि अंतर पिके घेता येतात.
मका
(रब्बी)
बिजप्रक्रिया व पेरणी
मका
पिकाच्या पेरणीसाठी १५ किलो प्रती हेक्टर बियाणे वापरावे व ६० x ३० से.मी. ओळीतील अंतर
ठेवुन पिकाची पेरणी करावी. पेरणी/लागवडपूर्वी सायएन्ट्रीनिलीप्रोल + थायोमिथॉक्झाम १९.८० टक्के ४.० मिली
प्रति किलो बियाण्यास बीजप्रक्रिया
करावी यामुळे लष्करी अळीचे व्यवस्थापन
होते व नंतर २५० ग्रॅम प्रति १० किलो
बियाण्यास अॅझोटोबॅक्टर आणि पीएसबी या जिवाणू संवर्धकाची बिजप्रक्रीया करावी तसेच
ट्रायकोडर्मा ५.० ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावावे त्यानंतर बीयाणे सावलीमध्ये
वाळवून पेरणी करावी.मका पिकाची जोमदार वाढ होण्यासाठी पेरणीच्या वेळी हेक्टरी
७५ किलो नत्र ७५ किलो स्फुरद व ७५ किलो
पालाश दयावे.
गहू
बिजप्रक्रिया व पेरणी
गहू
पिकाच्या पेरणीसाठी बियाण्याची मात्रा १०० ते १२० किलो प्रती हेक्टर घ्यावी आणि
दोन ओळीतील अंतर २२.५ सेमी ठेवावे. पेरणीपुर्वी बियाण्यास कॅप्टन किंवा थायरम ३०
ग्रॅम व द्रवरूप जैवीक खत १०० मिलि
प्रती १० किलो बियाणे याप्रमाणात बिजप्रक्रीया करून पेरणी करावी.गहू पिकासाठी १२०:६०:४० कि/हे.याप्रमाणे नत्र, स्फुरद
व पालाश शिफारशीत खतमात्रा आहे. यापैकी पेरणीच्या वेळी नायट्रोजनची अर्धी तर
स्फुरद व पालाशची पूर्ण मात्र द्यावी.
कांदा
पुनर्लागवड
कांदा
पिकाची पुनर्लागवड १०
X १० सेंमी.
अंतरावर करावी. लागवडीपूर्वी कार्बेन्डाझिम १० ग्रॅम व प्रोफेनोफॉस किंवा
फिप्रोनिल १० मिलि. १० लिटर पाण्यात मिसळून द्रावण करावे व रोपाचे शेंडे कापून या द्रावणात बुडवून लागवड करावी. कांदा
पिकासाठी १००:५०:५० कि/हे. याप्रमाणे नत्र, स्फुरद व पालाश शिफारशीत खतमात्रा आहे.
यापैकी पेरणीच्या वेळी नायट्रोजनची अर्धी तर स्फुरद व पालाशची पूर्ण मात्र द्यावी.
सिताफळ
काढणी अवस्था
काढणीस
तयार असलेल्या सिताफळांची काढणी केल्यानंतर प्रतवारी करुन बाजारपेठेत विक्रीस
पाठवावीत.
पेरू
फळ वाढीची अवस्था
पेरू फळबागेत
फळांची जास्त संख्या असलेल्या फांदयांना बांबूचा आधार दयावा. जेणेकरुन फळांच्या
वजनाने झाडांचे नुकसान होणार नाही.
आंबा
बहार धरणे
आंबा बागेत
फुलधारणा व्यवस्थित होण्यासाठी १३:००:४५ विद्राव्य खताची १५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
भाजीपाला
फुलधारणा ते फळधारणा
भेंडी
पिकामध्ये शेंडा व फळ पोखरणा-या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असून याच्या
व्यवस्थापनासाठी सायपरमेथ्रीन २५ ईसी ४ मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट ५ एसजी ३
ग्रॅम किंवा लॅमडा सायहॅलोथ्रीन ५ ईसी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून
फवारणी करावी. तसेच भाजीपाला पिकात रस शोषण करणाऱ्या किडीच्या व्यवस्थापनासाठी
पिवळे व निळे चिकट सापळे (छोट्या आकाराची) एकरी २५ ते ३० या प्रमाणात लावावेत.
तसेच नवीन लागवड केलेल्या भाजीपाला पिकामध्ये तणनियंत्रणाची कामे करून पाणी व्यवस्थापन
करावे.
पशुसंवर्धन
पशुपालकांनी
जनावरांचे रोगबाधा टाळण्याकरीता नियमित रोगप्रतिबंधात्मक लसीकरण करणे गरजेचे आहे.
जेणेकरुन जनावरांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती तयार होवून जनावरे आजारी पडण्याचे प्रमाण
कमी होईल.
इतर
जमिनीमध्ये ओलावा कमी असल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांची पेरणी बाकी
असल्यास शेतकरी बांधवानी ओलीत करूनच पेरणी करावी.
Comments
Post a Comment