छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक १३ ते १७ डिसेंबर २०२३ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच कमाल तापमान २९.० व ३०.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १४.० ते १६.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४१ ते ६८ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०८ ते ११ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.  

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. १७ ते २३ डिसेंबर २०२३ दरम्यान आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहून पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान सरासरी पेक्षा कमी व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.

कृषी हवामान सल्ला

आद्रक

कंद वाढीची अवस्‍था

मागील आठवड्यातील ढगाळ वातावरण व साचलेल्या पाण्यामुळे आद्रक पिकामध्ये कंदसडीचा प्रादुर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी मेटॅलॅक्झील ४ टक्के + मॅन्कोझेब  ६४ टक्के २५ ग्रॅम प्रति १० पाण्यात मिसळुन आळवणी करावी.

हळद

कंद वाढीची अवस्‍था

मागील आठवड्यातील ढगाळ वातावरण व साचलेल्या पाण्यामुळे हळद पिकामध्ये कंदसडीचा प्रादुर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी मेटॅलॅक्झील ४ टक्के + मॅन्कोझेब  ६४ टक्के २५ ग्रॅम प्रति १० पाण्यात मिसळुन आळवणी करावी. तसेच हळद पीकावर करपा रोगाचा प्रादूर्भाव वाढण्याची शक्यता असुन याच्या व्यवस्थापनासाठी अझॉक्सीस्ट्रॉबीन १८.२ टक्के + डायफेनकोनॅझोल ११.४ टक्के एससी १० मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

हरभरा

वाढीची ते फांदया धरणे

मागील आठवड्यातील ढगाळ व दमट वातावरणामुळे हरभरा पीकामध्ये मर रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशकाची ४० मिली/ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून जमीनीवर फवारणी किंवा आळवणी करावी.

जवस

वाढीची अवस्था

मागील आठवड्यामध्ये ढगाळ वातावरण असल्यामुळे जवस पिकामध्ये भुरी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी  मॅन्कोझेब २५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

बटाटा

वाढीची अवस्था

मागील आठवड्यातील ढगाळ व दमट वातावरणामुळे बटाटा पिकामध्ये लवकर येणारा करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असुन, याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब ७५ टक्के डब्ल्यूपी २५ ते ३० ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झीक्लोराईड ३० ग्रॅम किंवा प्रोपीनेब ७० टक्के डब्ल्यूपी ३० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच बटाटा पीकामध्ये रस शोषन करणा-या किडींच्या व्यवस्थापनासाठी निळे व पिवळे चिकट सापळे प्रत्येकी २५ याप्रमाने प्रतिएकरी लावावेत.

मोसंबी

आंबिया बहार व्यवस्थापन

आंबिया बहार : आंबिया बहारासाठी झाडांना ५ डिसेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत ताण दयावा. फळ काढणीनंतर वाळलेल्या फांदया तसेच बागेतील खाली पडलेली फळे जमा करुन नष्ट करावीत व बाग स्वच्छ करावी आणि त्यानंतर १ टक्का कार्बेन्डाझीम या बुरशीनाशकाची फवारणी घ्यावी.

डाळिंब

वाढीची अवस्था

मागील आठवड्यातील ढगाळ व दमट वातावरणामुळे डाळींब फळबागेमध्ये साल पोखरणा-या अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास प्रादूर्भावग्रस्त खोड किंवा फांदीवरील छिद्रामध्ये क्लोरिपायरीफॉस २० टक्के ईसी ३० मीली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून इंजेक्शनच्या सहाय्याने सोडावे व नंतर छिद्रे चिखलाने बंद करावीत.

भाजीपाला

फुल ते फळ धारणा अवस्था

मागील आठवड्यातील ढगाळ व दमट वातावरणामुळे टोमॅटो पीकामध्ये करपा रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब ७५ टक्के किंवा क्लोरोथॅलोनील ७५ टक्के २५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच मिरची पिकावरील रस शोषण करणा-या (फुलकीडे, मावा ) किडीच्या व्यवस्थापनासाठी फिप्रोनिल ५ टक्के एससी २० मिली  प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

तुती रेशीम

तुती बागेत रोपांची लागवड केल्यानंतर ३ महिण्यात तुतीची पाने उपलब्ध होतात व कोषाचे पीक घेता येते. पहिल्या वर्षात ५० अंडीपुंजाचे २ पिके निघतात. दुस-या वर्षापासून ५ ते ६ कोषाची पिके दिड महिण्याच्या अंतराने मिळतात.  १०० अंडीपुंजासाठी ९ ते १० क्विंटल तुतीची पाने लागतात. वर्षासाठी एकरी ३०० अंडीपुंजासाठी ६ पिके निघायला हवी म्हणजे एकरी १८०० अंडीपुंज शेतक-यांना घेता यावीत. 

पशुसंवर्धन

सद्यस्थितीत तापमानात घट होत असल्याने शेतक-यांना जनावरांची अतिरिक्त  उर्जेची गरज पुर्ण करण्याकरीता जनावरांच्या आहारात जास्त उर्जा देणा-या तसेच खनिज मिश्रणांच्या खाद्याचा समावेश करावा.

इतर

पडलेल्या पावसाच्या ओलाव्याचा फायदा घेत शेतक-यांनी ज्वारी व मका यासारख्या चारा पीकाची पेरणी करुन घ्यावी.

सदर कृषि सल्ला पत्रिका जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU) कृषि विज्ञान केंद्र, औरंगाबाद-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशीवरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments