छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक १५ ते १९ मे २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान अंशत:ढगाळ ते ढगाळ राहून तुरळक ठिकाणी अतिशय हलक्या ते हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३९.४ ते ४३.३ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२.० ते २५.६ अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ११ ते ४५ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १२ ते २० किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
सर्तकता :
छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. १४ व १५ मे २०२४ रोजी तुरळक
ठिकाणी वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह
हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची तसेच गारपीट होण्याची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (५० ते ६० किमी/तास)
राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती
संभाजीनगर जिल्हयात दि. १९ ते २५ मे २०२४ दरम्यान आकाश स्वच्छ ते अंशत:ढगाळ
राहण्याची शक्यता आहे. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी तसेच कमाल तापमान व किमान
तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषी हवामान सल्ला
उन्हाळी मका
परिपक्वता ते काढणी अवस्था
पुढील दोन दिवस वादळीवा-यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता
असल्यामुळे शेतकरी बांधवांनी काढणीस तयार असलेल्या मका पिकाची काढणी दोन दिवस पुढे
ढकलावी तसेच काढणी केलेल्या पीकाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
मोसंबी
वाढीची अवस्था
मागील आठवड्यातील ढगाळ वातावरण व तापमानातील चढउतारामुळे मोसंबी बागेत
रसशोषन करणा-या किडींच्या प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी
डायमिथोएट ३० टक्के ईसी १३ मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८ टक्के ३ मिली प्रति १०
लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत वातावरणात फवारणी करावी. फवारणी शक्यतो सकाळी किंवा सायंकाळी करावी.
डाळिंब
वाढीची अवस्था
मृग बहार लवकर घेण्याचे नियोजन असल्यास बाग ताणावर असताना मे महिन्याच्या
शेवटी इथेफोन ३९ % एस एल ची फवारणी करून पानगळ करून घ्यावी व नंतर हलकी छाटणी करून
घ्यावी. छाटणी
करताना पेन्सिल आकाराच्या काड्या शेंड्याकडून १० ते १५ सेमी पर्यंत छाटाव्यात तसेच
वाळलेल्या फांद्या छाटाव्यात व बागेत पडलेला काडीकचरा वेचून बाग स्वच्छ ठेवावी. तसेच नवीन
लागवड केलेल्या बागेमधील रोपांना सावली करावी जेणेकरून लहान रोपांचे प्रखर
उन्हापासून संरक्षण होईल.
भाजीपाला
फुलधारणा ते फळधारणा अवस्था
टोमॅटो पिकावरील फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या
व्यवस्थापनासाठी फिप्रोनील १५ मिली + करंज
तेल २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ व शांत वातावरणात फवारणी
करावी. पुढील दोन दिवस वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या
पावसाची तसेच गारपीट होण्याची शक्यता असुन शेतकरी बांधवांनी काढणीस तयार असलेल्या
भाजीपाला पिकाची काढणी लवकरात लवकर करुन घ्यावी.
तुती रेशीम
रेशीम किटक
संगोपन गृहातील तापमान व आर्द्रता मर्यादित (२२ ते २८ सें.ग्रे.) ठेवावे जेणेकरून
कोष उत्पादन चांगले येईल. परंतु ३५ सें.ग्रे. च्या वर तापमान गेल्यास रेशीम किटक
पाने खात नाहीत यामुळे उत्पादनात घट होते.
पशुसंवर्धन
पुढील दोन दिवस वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या
पावसाची तसेच गारपीट होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकरी बांधवांनी जनावरांना बाहेर
चरावण्यास घेवून जावू नये तसेच जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधावे. तसेच जंतांच्या व विविध आजारांच्या नियंत्रणासाठी पशुवैद्याच्या सल्ल्याने लसीकरण करून घ्यावे. तसेच जनावरांना नेहमी स्वच्छ पाणी पिण्यास द्यावे.
इतर
पुढील दोन
दिवस वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची तसेच
गारपीट होण्याची शक्यता असुन शेतकरी बांधवांनी काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची
काढणी करावी, जेणेकरुन होणारे संभाव्य नुकसान टाळता येईल.
Comments
Post a Comment