छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक १७ ते २१ जुलै २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान ढगाळ राहून सर्वदूर हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २९.० ते ३१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २२.० ते २४.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ७५ ते ९३ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १६ ते २८ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
सतर्कता: छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. १६ जुलै २०२४ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह जोरदार तर
दि. २० जुलै २०२४ रोजी मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त
(३० ते ४० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. २१ ते २७
जुलै २०२४ दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच पर्जन्यमान, कमाल तापमान व
किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.
कृषी हवामान सल्ला
सोयाबीन
वाढीची अवस्था
सोयाबीन पिकामध्ये कोळपणी व खुरपणीचे कामे
पावसाची उघाड बघुन करावी. मजुरांची कमतरता असल्यास तण नियंत्रणासाठी पीक १५ ते २०
दिवसाचे झाले असल्यास इमॅझेथायपर ३५ टक्के + इमाझामॉक्स ३५ टक्के डब्ल्यूजी २
ग्रॅम किंवा क्लोमॅझोन ५० % ईसी ३० ते ४० मिली या तणनाशकांची प्रति १० लिटर
पाण्यात मिसळून पावसाची उघाड बघुन फवारणी करावी.
खरीप ज्वारी
वाढीची अवस्था
खरीप ज्वारी पिकामध्ये कोळपणी व तणनियंत्रणाची कामे पावसाची उघाड बघुन करावीत व खरीप ज्वारी पीकास
पेरणीनंतर ३० दिवस झाले असल्यास नत्राचा दुसरा हप्ता ४० किलो प्रति हेक्टरी युरियाव्दारे
दयावा.
बाजरी
वाढीची अवस्था
बाजरी पिकामध्ये कोळपणी व तणनियंत्रणाची
कामे पावसाची उघाड बघुन करून घ्यावीत. तसेच बाजरी पीकास पेरणीनंतर ३० दिवस झाले असल्यास नत्राचा
दुसरा हप्ता हलक्या जमिनीत २० किलो तर भारी जमिनीत ३० किलो प्रति हेक्टरी
युरियाव्दारे दयावा.
खरीप भुईमूग
वाढीची अवस्था
मागील आठवड्यातील ढगाळ
हवामान असल्यामुळे भुईमूग पिकामध्ये फुलकिडीचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या
व्यवस्थापनासाठी ५ टक्के निंबोळी अर्काची स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच
खरीप भुईमूग पिकामध्ये कोळपणी व तणनियंत्रणाचे कामे पावसाची उघाड बघून करुन
घ्यावीत.
आद्रक
वाढीची अवस्था
पावसाची उघाड बघून आद्रक
पिकामध्ये तण व्यवस्थापन करावे व बेडला हलकी भर द्यावी. तसेच
आद्रक पिकामध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन रोपे पिवळी पडत असुन याच्या
व्यवस्थापनासाठी परभणी कृषि विद्यापीठाने विकसित
केलेले बायोमिक्स हे जैविक बुरशीनाशक व कीडनाशकाची ५ लिटर प्रति एकर प्रमाण घेऊन
पाण्यात मिसळुन आळवणी करावी.
हळद
वाढीची अवस्था
पावसाची उघाड बघून हळद
पिकामध्ये तण व्यवस्थापन करावे. तसेच
हळद
पिकामध्ये माती परीक्षणानुसार अन्नद्रव्यांचा संतुलित व प्रमाणशीर योग्य वेळेस
वापर करावा. माती परीक्षण केलेली नसल्यास ६ आठवडे झालेल्या पिकास
नत्राचा शिफारसीत दुसरा हप्ता शेतात वापसा असताना देऊन बेडला हलकी भर द्यावी.
मोसंबी
फळ वाढीची
अवस्था
मोसंबी बागेमध्ये
तणनियंत्रणाची कामे पावसाची उघाड बघून करून घ्यावीत. तसेच दि. १६
जुलै २०२४ तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असुन शेतक-यांनी मोसंबी पीकात पाणी
साचणार नाही याची काळजी घ्यावी व साचलेल्या पाण्याचा निचरा करावा.
डाळिंब
वाढीची अवस्था
मागील आठवड्यातील पाऊस
व ढगाळ वातावरणामुळे डाळिंब बागेमध्ये रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी
सायंट्रानिलिप्रोल १०.२३ टक्के ओ. डी. ७.५ मिली किंवा थायोमिथोक्झाम २५ टक्के
डब्ल्यू जी ०५ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
भाजीपाला
फुल ते फळ धारणा अवस्था
मागील आठवड्यातील ढगाळ व
दमट वातावरणामुळे मिरची पिकामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी
कॉपर ऑक्झिक्लोराईड ५० टक्के ३० ग्रॅम १०
लीटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.
तुती रेशीम
पावसाळयात
ढगाळ हवामानात रेशीम किटक संगोपन गृहातील आर्द्रता ९५ ते ९९ टक्के पर्यंत राहते.
अशा वेळी बाल्य ते प्रौढ किटक संगोपन गृहात अनुक्रमे तापमान २८ व २६ अंश सें. व आर्द्रता अनुक्रमे ८५ व ६५
टक्क्यांच्या वर गेली तर ग्रासरी व प्लॅक्चरी या रोगांची बाधा किटकांना होते.
त्यामुळे संगोपन गृहात स्वच्छता राखणे. शेडनेटच्या आजुबाजुला व दरवाज्यासमोर ०.३
टक्के चुना + २ टक्के ब्लिचिंग पावडरचे द्रावण करुन शिंपडावे. संगोपन साहित्य ट्रे
स्वच्छता जाळया, आच्छादन जाळया २ टक्के फॉरमॅलीन मध्ये निर्जंतुकीकरण करुन उन्हात
वाळवुन वापरावे.
पशुसंवर्धन
पुढील पाच दिवसांचा
हवामानाचा अंदाज पाहता शेतकरी बांधवांनी आपले पशुधन झाडाखाली, पाणवठयाजवळ किंवा
लोखंडी अवजारांना न बांधता सुरक्षित ठिकाणी बांधावेत. तसेच जोरदार पावसाच्या
अनुषंगाने गोठयांची डागडूजी करुन घ्यावी. पाऊस चालू असतांना जनावरांना बाहेर
चरावयास सोडू नये.
इतर
शेतकरी
बांधवानी पुढील पाच दिवसाच्या हवामानाचा अंदाज पाहता आंतरमशागतीची व फवारणीची कामे
शेतात वापसा असतांना तसेच पावसाची उघाड बघून स्वच्छ वातावरणात करावीत. तसेच दि. १६
जुलै २०२४ तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असुन शेतक-यांनी पीकात पाणी साचणार
नाही याची काळजी घ्यावी व साचलेल्या पाण्याचा निचरा करावा.
Comments
Post a Comment