छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक ०६ ते १० जुलै २०२४ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला

 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३३.० ते ३५.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २४.० ते २५.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ६० ते ८० टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १८ ते २८ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.

सतर्कता: छत्रपती संभाजीनगर जिल्हयात ०५ ते ०८ जुलै २०२४ रोजी तुरळक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे. 

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दिनांक १० ते १६ जुलै २०२४ दरम्यान हवामान अंशत:ढगाळ ते ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.

कृषि हवामान सल्ला

ऊस

पुर्वमशागत व वाणांची निवड

आडसाली ऊस लागवडीसाठी पूर्वमशागतीचे कामे पूर्ण करूंन रान बांधणी व आखणी करून घ्यावी. आडसाली ऊस लागवडीसाठी को-८६०३२, कोएम-०२६५, व्हीएसआय-८००५ या सुधारित जातीची निवड करावी.

कापूस

रोप ते वाढीची अवस्था

कापूस पिकामध्ये कोळपणी व खुरपणीची कामे स्वच्छ वातावरणात करावीत. तसेच उगवून आलेल्या कापुस पिकामध्ये झाडांची संख्या योग्य राखण्यासाठी तुट भरावी.

का

रोप ते वाढीची अवस्था

मका पिकामध्ये कोळपणी व खुरपणीची कामे स्वच्छ वातावरणात करावीत. तसेच उगवून आलेल्या मका पिकामध्ये झाडांची संख्या योग्य राखण्यासाठी तुट भरावी.

तूर

रोप ते वाढीची अवस्था

तुर पिकामध्ये कोळपणी व खुरपणीची कामे स्वच्छ वातावरणात करावीत. तसेच उगवून आलेल्या तुर पिकामध्ये झाडांची संख्या योग्य राखण्यासाठी तुट भरावी व दाटवा झाला असल्यास विरळणी करावी.

मूग/उडीद

रोप ते वाढीची अवस्था

मूग/उडीद पिकामध्ये कोळपणी व खुरपणीची कामे स्वच्छ वातावरणात करावीत.

सिताफळ

वाढीची अवस्था

सिताफळ बागेतील सूत्रकृमींचा व मातीतून होणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी पेंड ५०० ग्रॅम प्रति झाडास द्यावे. तसेच जमिनीची सुपीकता व उत्पादनात वाढ होण्याकरीता बागेमध्ये हिरवळीच्या (ज्यूट, बरू आणि ढेंचा) पिकांची पेरणी करावी.

आंबा

वाढीची अवस्था

आंबा फळबागेतील खोड किडीच्या व्यवस्थापनासाठी प्रौढ भुंगे हाताने गोळा करून नष्ट करावेत व हेक्टरी २-३ प्रकाश सापळ्यांचा वापर करावा. तसेच आंबा फळपिकांमध्ये जमिनीची सुपीकता व उत्पादनात वाढ होण्याकरीता हिरवळीच्या (ज्यूट, बरू आणि ढेंचा) पिकांची पेरणी करावी.

भाजीपाला

फुलधारणा ते फळधारणा

ढगाळ वातावरणामुळे टोमॅटो पिकावर शेंडा व फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसुन येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी  ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी जर प्रादुर्भाव जास्त असल्यास सायपरमेथ्रीन १० टक्के ई.सी.०६ मिली किंवा डेल्टामेथ्रीन २.८ टक्के ई.सी. १० मिली किंवा इमामेक्टिन बेन्झोएट ५ टक्के एस सी ०३ ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

चारा पिके

वाढीची अवस्था

चारा पिकामध्ये आंतरमशागतीची कामे स्वच्छ वातावरणात करुन घ्यावीत. 

पशुसंवर्धन

पशुपालकांनी आपल्या जनावरांच्या असणारे बाह्य परजीवींचे (गोचीड, डास, गोमाशी इत्यादी) नियंत्रण करावे. पावसामुळे गोठ्यात पाणी साचून राहिल्यास जनावरांमध्ये रोग वाढण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे पशुपालकांनी गोठा सर्व बाजूने समतोल करून पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी.

इतर

आगामी काळातील पिकांवरील किड व किटकांच्या प्रतिबंधात्मक व्यवस्थापनासाठी लागणारे निंबोळी अर्क तयार करण्यासाठी शेतकरी बांधवानी कडुलिंबाच्या निंबोळयांची साल व गर काढुन त्याच्या बिया वाळवुन, सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवाव्यात.

सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला