छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक १४ ते १८ सप्टेंबर २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान ढगाळ राहून दि. १४,१५ व १८ सप्टेंबर २०२४ रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान २९.० ते ३१.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २१.० ते २२.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ७० ते ८५ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १९ ते २२ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती
संभाजीनगर जिल्हयात दिनांक १८ ते २४ सप्टेंबर २०२४ दरम्यान हवामान अंशतःढगाळ ते ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान
सरासरीपेक्षा कमी तर कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त व किमान तापमान सरासरी ऐवढे
राहण्याची शक्यता आहे.
कृषि
हवामान सल्ला
ऊस
वाढीची ते कांडे धरणे अवस्था
ऊस
पिकामध्ये हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी
फिप्रोनील ४० टक्के + इमिडाक्लोप्रिड ४० टक्के डब्ल्यू जी ४ ग्रॅम प्रति १०
लिटर पाण्यात मिसळून आळवणी करावी.
कापूस
पाते लागणे ते बोंड धरणे
मागील
आठवड्यातील ढगाळ व दमट वातावरणामुळे कापुस पिकामध्ये पातेगळ दिसुन येत असुन याच्या
व्यवस्थापनासाठी नॅप्थॅलिक ॲसिटीक ॲसिड (एनएए) २ ते २.५ मिली प्रति १० लिटर पाण्यात
मिसळुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच कापुस पीकावरील गुलाबी/शेंदरी
बोंडअळीच्या प्रादूर्भावावर लक्ष
ठेवावे. त्यासाठी प्रति हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावेत. कापुस पिकातील डोमकळया
दिसल्यास वेचून नष्ट कराव्यात. तसेच कापुस पीकामधील तणव्यवस्थापनाची कामे
करुन घ्यावीत.
मका
कणसे धरणे
मागील
आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे मका पिकामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत
असून सध्यस्थितीत मका पिकाची वाढ झालेली असल्यामुळे व्यवस्थापनासाठी रासायनिक
फवारणी करण्याऐवजी जैविक पध्दतीने किडव्यवस्थापन करण्याकरीता मेटारायझियम
ऍनिसोपली ५० ग्रॅम किंवा नोमुरीया रिलाई ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून
स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
तूर
फांद्या लागणे अवस्था
मागील
आठवडयामधील ढगाळ वातावरण व वाढलेली आर्द्रता यामुळे तूर पीकामध्ये पाने खाणा-या
अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी प्रोफेनोफॉस ५० टक्के
ईसी २० मीली किंवा फ्लुबेंडामाईड ३९.३५ टक्के एससी २.५
मीली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल १८.५ एससी ३ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून
स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
मूग/उडीद
काढणी अवस्था
काढणीस
तयार असलेल्या मुग/उडीद पीकाची काढणी करावी. तसेच काढणी केलेल्या शेंगा कोरडया व
सुरक्षित ठिकाणी वाळविल्यानंतर मळणी करुन घ्याव्यात.
सिताफळ
फळ वाढीची अवस्था
मागील
आठवडयामधील पाऊस व वाढलेली आर्द्रता यामुळे सिताफळ बागेत फळसड दिसुन येत असुन
याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब २० ग्रॅम + कार्बेन्डाझिम १० ग्रॅम प्रति १०
लिटर पाण्यात मिसळुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच सिताफळ बागेतील तणव्यवस्थापनाची कामे करुन
घ्यावीत.
भाजीपाला
फुलधारणा ते फळधारणा
मागील
आठवडयामधील पाऊस व वाढलेली आर्द्रता यामुळे टोमॅटो व वांगी भाजीपाला पिकावर करपा
रोगाचा प्रादूर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी अझोक्सीस्ट्रॉबीन २३
टक्के एससी १० मिली किंवा कॅप्टन ५० टक्के २५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस
तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करावी.
पशुसंवर्धन
सद्यस्थितीत
पावसामुळे झालेली जनावरांच्या गोठयांची खराब अवस्था व अस्वच्छता तसेच वाढलेली
आर्द्रता यामुळे गोचीड, उवा व पिसवा यांसारख्या परोपजिविंचा प्रादुर्भाव होवून
जनावरांना जंतुसंसर्ग होण्याची शक्यता असते. हे टाळण्याकरीता शेतकरी बांधवांनी आपले
पशुधन उन्हात व हवेशीर बांधावे. त्याचप्रमाणे पशुवैद्यकाच्या सल्ल्याने परोपजीविंकरीता
फवारणी तसेच जनावरांचे लसीकरण करुन घ्यावे.
इतर
शेतकरी
बांधवांनी खरीप हंगामातील पीकांच्या काढणी व रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणी/
लागवड करण्याच्या दृष्टीने आवश्यक असणा-या काढणी, मळणी तसेच पेरणी यांसारख्या
यंत्राची दुरुस्तीची कामे लवकरात लवकर करुन घ्यावीत.
Comments
Post a Comment