छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याकरिता दिनांक २१ ते २५ सप्टेंबर २०२४ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान अंशत:ढगाळ ते ढगाळ राहून दि. २१ सप्टेंबर २०२४ वगळता इतर दिवशी तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३१.० ते ३२.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २३.० ते २४.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ५४ ते ९० टक्के राहील तर वाऱ्याचा वेग १३ ते १८ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.
सतर्कता: छत्रपती संभाजीनगर जिल्हयात २३ व २४ सप्टेंबर २०२४ रोजी तुरळक ठिकाणी
वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन
वा-याचा वेग जास्त (३० ते ४० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे.
विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती
संभाजीनगर जिल्हयात दिनांक २५ ते ३१ सप्टेंबर २०२४ दरम्यान हवामान अंशतःढगाळ ते ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान
सरासरीपेक्षा जास्त तर कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी किमान तापमान सरासरी ऐवढे
राहण्याची शक्यता आहे.
कृषि
हवामान सल्ला
ऊस
वाढीची ते कांडे धरणे अवस्था
मागील
आठवड्यातील दमट वातावरणामुळे ऊस पिकामध्ये पिठ्या ढेकूण किडीचा प्रादुर्भाव दिसुन
येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी मोनोक्रोटोफॉस ३६ एस एल १० मिली प्रति १० लिटर
पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
कापूस
पाते लागणे ते बोंड धरणे
मागील
आठवड्यातील ढगाळ व दमट वातावरणामुळे कापुस पिकामध्ये पातेगळ दिसुन येत असुन याच्या
व्यवस्थापनासाठी नॅप्थॅलिक ॲसिटीक ॲसिड (एनएए) २ ते २.५ मिली प्रति १० लिटर पाण्यात
मिसळुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच कापुस पीकावरील गुलाबी/शेंदरी
बोंडअळीच्या प्रादूर्भावावर लक्ष
ठेवावे. त्यासाठी प्रति हेक्टरी ५ कामगंध सापळे लावावेत. कापुस पिकातील डोमकळया
दिसल्यास वेचून नष्ट कराव्यात. तसेच कापुस पीकामधील तणव्यवस्थापनाची कामे
करुन घ्यावीत.
मका
कणसे धरणे
मागील
आठवड्यातील ढगाळ व दमट वातावरणामुळे मका पिकामध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून
येत असून सध्यस्थितीत मका पिकाची वाढ झालेली असल्यामुळे व्यवस्थापनासाठी रासायनिक
फवारणी करण्याऐवजी जैविक पध्दतीने किडव्यवस्थापन करण्याकरीता मेटारायझियम
ऍनिसोपली ५० ग्रॅम किंवा नोमुरीया रिलाई ५० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून
स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
तूर
फांद्या लागणे अवस्था
मागील
आठवडयामधील ढगाळ वातावरण व वाढलेली आर्द्रता यामुळे तूर पीकामध्ये पाने खाणा-या
अळीचा प्रादूर्भाव दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी प्रोफेनोफॉस ५० टक्के
ईसी २० मीली किंवा फ्लुबेंडामाईड ३९.३५ टक्के एससी
२.५ मीली किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल १८.५ एससी ३ मिली प्रति १० लिटर पाण्यात
मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.
सिताफळ
फळ वाढीची अवस्था
मागील
आठवडयामधील पाऊस व वाढलेली आर्द्रता यामुळे सिताफळ बागेत फळसड दिसुन येत असुन
याच्या व्यवस्थापनासाठी मॅन्कोझेब २० ग्रॅम + कार्बेन्डाझिम १० ग्रॅम प्रति १०
लिटर पाण्यात मिसळुन स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच सिताफळ बागेतील तणव्यवस्थापनाची कामे करुन
घ्यावीत.
भाजीपाला
फुलधारणा ते फळधारणा
मागील
आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे मिरची पिकावरील रस शोषण करणा-या (फुलकीडे,मावा)
किडीच्या व्यवस्थापनासाठी फिप्रोनिल ५ टक्के एससी २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात
फवारणी करावी.
पशुसंवर्धन
सध्यस्थितीत
शेळ्यांमध्ये जुलाब/हगवण लागल्याचे दिसत असुन याच्या व्यवस्थापनासाठी २ चमचे
ग्लुकोज, २ चमचे मीठ, २ चमचे खाण्याचा सोडा, २ चमचे
लिंबाचा रस २ लिटर पाण्यामध्ये मिसळून द्रावण तयार करून आजारी शेळ्यांना पाजावे.
इतर
शेतकरी
बांधवांनी खरीप हंगामातील पीकांच्या काढणी व रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणी/
लागवड करण्याच्या दृष्टीने आवश्यक असणा-या काढणी, मळणी तसेच पेरणी यांसारख्या
यंत्राची दुरुस्तीची कामे लवकरात लवकर करुन घ्यावीत.
Comments
Post a Comment