छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १० ते १४ मे २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

 प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान अंशतः ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३७.० ते ४०.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २३.० ते २५.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता २७ ते ६२ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ०८ ते १३ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.

सर्तकता : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दिनांक ०९ ते ११ मे २०२५ दरम्यान तुरळक ठिकाणी वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असुन वा-याचा वेग जास्त (४०-५० किमी/तास) राहण्याची शक्यता आहे.

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. १४ ते २० मे २०२५ दरम्यान हवामान स्वच्छ ते अंशत:ढगाळ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीपेक्षा कमी जास्त तर कमल व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.

 कृषि हवामान सल्ला

ऊस

फुटवे अवस्था ते कांडे धरणे

सध्यस्थितीमध्ये ऊस पिकामध्ये खोडकिडा दिसून येत असुन याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरॅन्ट्रनिलीप्रोल १८.५ टक्के एस.सी. ३ - ४ मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून सकाळी किंवा सायंकाळच्या वेळेत स्वच्छ वातावरणात फवारणी करावी. तसेच ऊस पिकास योग्य वेळेच्या अंतराने गरजेनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.

उन्हाळी बाजरी

परिपक्वता ते काढणी अवस्था

काढणीस तयार असलेल्या बाजर पिकाची काढणी पावसाची उघाड बघून करून घ्यावी व काढणी केलेले बाजरी पीक सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.

आंबा

फळ वाढीची अवस्‍था

दिनांक ०९ ते ११ मे २०२५ दरम्यान वादळीवा-यासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्यामुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी काढणीस तयार असलेल्या आंबा फळांची काढणी लवकरात लवकर करुन घ्यावी. आंबा फळांची काढणी देठासहित करावी जेणेककरुन फळांचे काढणी पश्चात आयुष्य वाढून पक्वता एकावेळेस होण्यास मदत होते. तसेच आंबा पिकाचे फळ माशीपासून संरक्षण करण्यासाठी फळमाशी सापळे ०४ प्रति हेक्टर या प्रमाणात वापरावे.

भाजीपाला

फुले ते फळधारणा अवस्था

वादळीवा-यासह पावसाची शक्यता असल्यामुळे संभाव्य नुकसान लक्षात घेता काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी लवकरात लवकर करावी. तसेच मिरची पीकावरील विषाणूजन्य चूरडामुरडा रोगाच्या व्यवस्थापनासाठी प्रादूर्भावग्रस्त झाडे नष्ट करावीत. तसेच पायरीप्रोक्सीफेन १० टक्के ईसी २० मिली किंवा फेनप्रोपाथ्रीन ३० टक्के ईसी ३० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून स्वच्छ वातावरणात फवारणी करावी.

पशुसंवर्धन

दिनांक ०९ ते ११ मे २०२५ दरम्यान वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असून शेतकरी बांधवांनी जनावरांना बाहेर न बांधता गोठयात बांधावे.

इतर

पुढील पाच दिवसाचा हवामानाचा अंदाज लक्षात घेता दिनांक ०९ ते ११ मे २०२५ दरम्यान वादळीवारा व विजेच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असून शेतकरी बांधवांनी पीकातील पाण्याच्या पाळया पुढे ढकलाव्यात. तसेच काढणीस तयार असलेल्या फळे व भाजीपाला पीकांची काढणी लवकरात लवकर करुन घ्यावी. त्याचप्रमाणे वादळीवारा व ‍विजेच्या कडकडाटासह पाऊस चालू असतांना जनावरांना चरावयास बाहेर नेण्याचे टाळावे व सुरक्षित ठीकाणी बांधावे.

सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक १३ ते १७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ सप्टेंबर २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०२ ते ०६ एप्रिल २०२५ साठी हवामान अंदाज व कृषिहवामान सल्ला