छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०६ ते १० नोव्हेंबर २०२६ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला

 


छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०६ ते १० नोव्हेंबर २०२६ साठी हवामान अंदाज

हवामान घटक

०६/११

०७/११

०८/११

०९/११

१०/११

पाऊस (मिमी)

०.०

०.०

०.०

०.०

०.०

कमाल तापमान (अं.से.)

३५.०

३४.०

३४.०

३३.०

३३.०

किमान तापमान (अं.से.)

१७.०

१७.०

१६.०

१५.०

१५.०

ढग स्थिती (आकाश)

अंशतःढगाळ

अंशतःढगाळ

स्वच्छ

स्वच्छ

स्वच्छ

सकाळची सापेक्ष आर्द्रता (%)

७४

५५

५७

५७

६४

दुपारची सापेक्ष आर्द्रता (%)

५३

४८

४२

४२

४३

वा-याचा वेग (किमी/तास)

६

८

६

४

६

वाऱ्याची दिशा

उत्तर

पुर्व

पुर्व

पुर्व

आग्नेय


प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानूसार छत्रपती संभाजीनगर जिल्हयात पुढील पाच दिवसात हवामान कोरडे व आकाश स्वच्छ ते अंशतःढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच कमाल तापमान ३३.० ते ३५.० अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १५.० ते १७.० अंश सेल्सिअस दरम्यान राहील व सापेक्ष आर्द्रता ४२ ते ७४ टक्के राहील तर वाऱ्याचा वेग ४ ते ८ किमी/तास राहण्याची शक्यता आहे.  

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) छत्रपती संभाजीनगर जिल्हयात दि. ०४ ते १० नोव्हेंबर २०२६ दरम्यान आकाश स्वच्छ राहील. तसेच पर्जन्यमान सरासरीऐवढे तर कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरी ऐवढे राहण्याची शक्यता आहे.

 कृषि हवामान सल्ला

पिकांचेनाव

ऊस

कांडे अवस्था

ऊस पिकामध्ये लोकरी मावा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून याच्या व्यवस्थापनासाठी क्लोरपायरीफॉस (२० टक्के इ.सी.) १० ते १५  मिली किंवा ॲसिफेट २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच पिकास उपलब्धतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

कापूस

वेचणी अवस्था

वेचणीस तयार असलेल्या कापुस पिकात वेचणी करून घ्यावी.

तुर

फांद्या लागणे ते फुलधारणा

तुर पिकास उपलब्धतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे. तसेच तुर पिकामध्ये आंतरमशागतीचे कामे करून घ्यावीत.

रब्‍बी ज्‍वारी

रोप अवस्था

उगवून आलेल्या ज्वारी पिकास आवश्यकते नुसार पाणी  व्यवस्थापन करावे.

मका (रब्बी)

रोप अवस्था

उगवून आलेल्या ज्वारी पिकास आवश्यकते नुसार पाणी  व्यवस्थापन करावे.

करडई

रोप अवस्था

उगवून आलेल्या करडई पिकास आवश्यकते नुसार पाणी  व्यवस्थापन करावे.

गहू   

बिजप्रक्रिया व पेरणी

शेतकरी बांधवणी गहू पिकाची पेरणी पाण्याच्या उपलब्धतेनुसार करावी. गहू पिकाच्या पेरणीसाठी बियाण्याची मात्रा १०० ते १२० किलो प्रती हेक्टर घ्यावी आणि दोन ओळीतील अंतर २२.५ सेमी ठेवावे. पेरणीपुर्वी बियाण्यास कॅप्टन किंवा थायरम ३० ग्रॅम व द्रवरूप जैवीक खत १०० मिलि प्रती १० किलो बियाणे याप्रमाणात बिजप्रक्रीया करून पेरणी करावी.गहू पिकासाठी १२०:६०:४० कि/हे.याप्रमाणे नत्र, स्फुरद व पालाश शिफारशीत खतमात्रा आहे. यापैकी पेरणीच्या वेळी नत्राची अर्धी तर स्फुरद व पालाशची पूर्ण मात्र द्यावी.

कांदा

रोप अवस्था

पाण्याची कमतरता असल्यास शेतकरी बांधवाणी कांद्याची लागवड नर्सरीतून रोपे घेऊन लागवड करावी.

सिताफळ

फळवाढीची अवस्था

सीताफळ बागेतील तण व्यवस्थापन करावे. तसेच पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाणी  व्यवस्थापन करावे.   

पेरू

फळ वाढीची अवस्था

पेरु बागेतील फळमाशीचा प्रादूर्भाव ओळखण्यासाठी व त्याच्या नियंत्रणासाठी मिथाईल युजेनॉलचे सापळे लावावेत. तसेच पेरू फळबागेत फळांची जास्त संख्या असलेल्या फांदयांना बांबूचा आधार दयावा. जेणेकरुन फळांच्या वजनाने झाडांचे नुकसान होणार नाही.

भाजीपाला

फळधारणा ते फळवाढीची अवस्था

भाजीपाला पिकात रस शोषण करणाऱ्या किडीच्या व्यवस्थापनासाठी पिवळे व निळे चिकट सापळे (छोट्या आकाराची) एकरी २५ ते ३० या प्रमाणात लावावेत. तसेच नवीन लागवड केलेल्‍या भाजीपाला पिकामध्ये पाणी व्यवस्थापन करून तणनियंत्रणाची कामे करावीत.

पशुसंवर्धन

पशुपालकांनी जनावरांचे रोगबाधा टाळण्याकरीता नियमित रोगप्रतिबंधात्मक लसीकरण करणे गरजेचे आहे. जेणेकरुन जनावरांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती तयार होवून जनावरे आजारी पडण्याचे प्रमाण कमी होईल.

इतर

सद्यस्थितीत शेतीमध्ये पाण्याचे व्यवस्थापन हे अत्यंत महत्वाचे असुन शेतक-यांनी पीकांमध्ये पाणी व्यवस्थापन वाढीच्या अवस्था, उपलब्धता तसेच गरजेनुसार व सुक्ष्म सिंचन पध्दतीने करावे.

सदर कृषि सल्लापत्रिका वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विदयापीठ, परभणी अंतर्गत असलेल्या जिल्हा कृषि हवामान केंद्र (DAMU), कृषि विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर-१ येथील तज्ञ समितीच्या शिफारशी वरून तयार करून प्रसारित करण्यात आलेली आहे.

Comments

Popular posts from this blog

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक ०३ ते ०७ जुन २०२६ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक २६ ते ३० जून २०२६ साठी हवामान अंदाज व कृषि हवामान सल्ला

छत्रपती संभाजीनगर जिल्हयाकरिता दिनांक २६ ते ३० ऑगस्ट २०२६ साठी हवामान अंदाज व कृषी हवामान सल्ला